दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 215, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८० श्रीदासबोध. [ दशक रोगियास पाहिजे रोग-। हरती मात्रा ॥ ४३ ॥ कवीस पाहिजे प्रबंध १ । तार्किकास पाहिजे तर्कवाद । भाविकास संवाद २ । गोड वाटे ॥ ४४ ॥ पंडि- तास पाहिजे व्युत्पत्ती । विद्वानास अध्ययनप्रीती । कलावंता आवडती । नाना कळा ॥ ४५ ॥ हरदासां आवडे कीर्तन । शुचिर्भूतास संध्यास्नान । कर्मनिष्ठा विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६ ॥ प्रेमळास पाहिजे करुणा । दक्षता पाहिजे विचक्षणा । चातुर्य पाहे शाहाणा । आदरेंसी ॥ ४७ ॥ भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीते ३ पाहे तालज्ञान । रागज्ञानी तानमान । मू- र्च्छना पाहे ॥ ४८ ॥ योगाभ्यासी पिंडज्ञानें ४ । तत्वज्ञानी तत्वज्ञान । नाडी- ज्ञानी मात्राज्ञान । पाहतसे ॥ ४९ ॥ कामिक पाहे कोकशास्त्र ५ । चेटकी पाहे चेटकमंत्र । यंत्री पाहे नानायंत्र । आदरेंसी ॥ ५० ॥ टवाळासि आवडे विनोद । उन्मत्तास नानाछंद । तामसास प्रमाद ६ । गोड वाटे ॥ ५१ ॥ मूर्ख होय नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी । पापी पाहे पापबुद्धी । लावून अंगीं ॥ ५२ ॥ एका पाहिजे रसाळ । एका पाहिजे पाल्हाळ । एका पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३ ॥ आगमी ७ पाहे आगम । शूर पाहे संग्राम । एक पाहती नानाधर्म । इच्छेसारिखे ॥ ५४ ॥ मुक्त पाहे मुक्त- लीला । सर्वज्ञ पाहे सर्वज्ञकळा । ज्योतिषी भविष्य पिंगळा । वर्णू पाहे ॥ ५५ ॥ ऐसे सांगावे ते किती । आवडीसारिखें ऐकती । नाना पुस्तकें वाचिती । सर्वकाळ ॥ ५६ ॥ परी परत्र ८ साधनेंविण । म्हणों नये तें श्रवण । जेथें नाहीं आत्मज्ञान । तया नांव कर्मणुक ॥ ५७ ॥ गोडीविणें ९ गोडपण । नाकें- विण सुलक्षण । ज्ञानाविण निरूपण । बोलोंचि नये ॥ ५८ ॥ आतां असो हें बहुत । ऐकावा परमार्थग्रंथ । परमार्थग्रंथेंविण व्यर्थ । गाथागोवी ॥ ५९ ॥ म्हणोनि नित्यानित्य विचार । जेथें बोलिला सारासार । तोचि ग्रंथ पैलपार । पाववी विवेकें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तम- दशके श्रवणनिरूपण नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १. कविता. २. सरळ, उपदेशपर भाषण. ३. गाणारा. ४. शरीराचें ज्ञान. ५. कामशास्त्र. ६. आळस. ७. वेदाभ्यासी. ८. परलोकींचें. ९. प्रेमावांचून.