दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 216, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७ वा. ] देहातीत. १८१ १०. देहातीत. श्रीगणेशाय नमः ॥ मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें अ- सत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पहातां ॥ १ ॥ सत्य कळावया- कारणें । बोलिलों नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥ असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३ ॥ वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चय करिती । तरी न ये आत्मप्रचीती । सत्यस्वरूप ॥ ४ ॥ सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥ ऐशी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६ ॥ मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि १ आपण । तेणें बा- णली खूण । परमार्थाची ॥ ७ ॥ तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें । निजरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८ ॥ प्रारब्धीं टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवरें २ ॥ ९ ॥ ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यात्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्य- भूमी ॥ १० ॥ साधुदर्शनें पावन तीर्थे । पुरती त्यांचे मनोरथ । साधु न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्राचें ॥ ११ ॥ ३ पुण्य नदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तो नित्यमुक्त ॥ १२ ॥ उत्तरायण हें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३ ॥ शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवाँ ४ मरण । अंतीं राहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४ ॥ इतुकें नलगे योगियासि । तो जितांचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यांसी । दीधली तेणें ॥ १५ ॥ देहाचा अंत बरा आला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६ ॥ जनाचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें कल्पून घात । करिती स्वयें ॥ १७ ॥ जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८ ॥ जरी केलें ईश्वरभजन । तरी होइजे पावन । जैसें ५ व्हेव्हारितां धान्य । राशी माथां लाभे ॥ १९ ॥ दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उग- १. आत्म्यास. २. शरीर. ३. पुण्यकर. ४. दिवसां. ५. व्यापार केला असतां.