भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

७ वा. ] देहातीत. १८१ १०. देहातीत. श्रीगणेशाय नमः ॥ मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें अ- सत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पहातां ॥ १ ॥ सत्य कळावया- कारणें । बोलिलों नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥ असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३ ॥ वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चय करिती । तरी न ये आत्मप्रचीती । सत्यस्वरूप ॥ ४ ॥ सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥ ऐशी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६ ॥ मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि १ आपण । तेणें बा- णली खूण । परमार्थाची ॥ ७ ॥ तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें । निजरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८ ॥ प्रारब्धीं टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवरें २ ॥ ९ ॥ ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यात्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्य- भूमी ॥ १० ॥ साधुदर्शनें पावन तीर्थे । पुरती त्यांचे मनोरथ । साधु न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्राचें ॥ ११ ॥ ३ पुण्य नदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तो नित्यमुक्त ॥ १२ ॥ उत्तरायण हें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३ ॥ शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवाँ ४ मरण । अंतीं राहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४ ॥ इतुकें नलगे योगियासि । तो जितांचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यांसी । दीधली तेणें ॥ १५ ॥ देहाचा अंत बरा आला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६ ॥ जनाचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें कल्पून घात । करिती स्वयें ॥ १७ ॥ जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८ ॥ जरी केलें ईश्वरभजन । तरी होइजे पावन । जैसें ५ व्हेव्हारितां धान्य । राशी माथां लाभे ॥ १९ ॥ दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उग- १. आत्म्यास. २. शरीर. ३. पुण्यकर. ४. दिवसां. ५. व्यापार केला असतां.

[Header] १८२ श्रीदासबोध. [ दशक


वेना । ऐसें हें वाक्य जना । ठाडकेंचि आहे ॥ २० ॥ न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा । तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१ ॥ जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती । असो जे जे जैसें करिती । ते ते पावती तैसें ॥ २२ ॥ एवं न करितां भग- वद्भजन । अंतीं न होइजे पावन । जरी आलें बरवें मरण । तरी भक्तीविण अधोगती ॥ २३ ॥ म्हणोन साधूनें आपुलें । जीत असतां सार्थक केलें । शरीर कारणीं लाविलें । धन्य त्याचें ॥ २४ ॥ जे कां जीववन्मुक्त प्राणी । त्यांचें शरीर पडो रानीं । अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य झालें ॥ २५ ॥ साधूचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला । हें प्रशस्त न वाटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥ अंत बरा नव्हे म्हणोन । कष्टी होतीं इतर जन । परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ जो जन्मलाचि नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोंट भरिला जेणें ॥ २८ ॥ १स्वरूपानुसंधानबळें । सगळी माया नाडले । तया- चा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९ ॥ तो जितचि असतां मेला । मर- णास मारून ज्याला । जन्ममृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३० ॥ तो जनीं दिसतो परी वेगळा । २वर्ततां भासे निराळा । दृश्य पदार्थ त्या निर्म- ळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥ असो ऐसे साधुजन । त्यांचें घडल्या भजन । तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२ ॥ सद्गुरूचा तो अंकित साधक । तेणें केलाच करावा विवेक । विवेक केलिया तर्क । पुढें निरूपणीं ॥३३॥ हेंच साधकासि ३निरैवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें । तुमचेंहि समा- धान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४ ॥ जो संतांस शरण गेला । तो संतचि होऊन ठेला । इतर जनां उपयोगा आला । कृपाळूपणें ॥ ३५ ॥ ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान । सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥३६॥ गुरुभजनाचे- नि आधारें । निरूपणाचेनि विचारें । क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७ ॥ परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरूचें भजन । सद्गुरुभजनें समाधान । अ- कस्मात बाणे ॥ ३८ ॥ देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करा- वें । भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरूचें ॥ ३९ ॥ शरणागतांची वाहे


[Footnotes] १. स्वरूपचिंतनाच्या सामर्थ्यानें. २. व्यवहार करतांना. ३. सांगणें.

चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसें बाळक वाढवी माता । नानायत्नेंकरूनी ॥४०॥ श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ॥ म्हणोन सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य । सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥ ४१ ॥ सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । तेथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२ ॥ सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं । जयांस न माने¹ तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३ ॥ तेथें निरू- पिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें । याकरितां सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४ ॥ जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक । तयास सांपडे एक । निश्चय ज्ञानाचा ॥ ४५ ॥ ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत । सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६ ॥ प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहतां मिळे । आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७ ॥ तें प्राकृत म्हणों नये । तेथें ज्ञानाचा उपाय । मूर्खासि हें कळे काय । मर्क- टा नारिकेळ जैसें ॥ ४८ ॥ आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें । शिंपीमधील मुक्त² उणें । म्हणों नये ॥४९॥ जेथें नेतिनेति³ श्रुती । तेथें न चले भाषाव्युत्पत्ती । परब्रह्म आदिअंतीं । अनिर्वाच्य ॥ ५० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥


दशक आठवा.

⸻:*:⸻

१. देवदर्शन.

श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमल ज्ञान बाळबोध । गु- रुशिष्यांचा संवाद । अतिसुगम परियेसा ॥ १ ॥ नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा । अंतरीं संशयाची व्यथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥ नाना तीर्थे थोरथोरें । सृष्टीमध्यें अपारें । सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥ ऐशीं तीर्थे सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारीं । फिरों जातां जन्म-


१. मान्य होत नाहीं. २. मोतीं. ३. 'अमुक ब्रह्म नव्हे' असें सांगतात; पण 'अमुक आहे' म्हणून दाखवूं शकत नाहींत.

१८४ श्रीदासबोध. [ दशक वरी । आयुष्य पुरेना ॥४॥ नाना तपें नाना दानें । नाना योग नाना सा- धनें । हीं सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५॥ पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा । तेणें देव ठायीं पाडावा । हैं सर्वमत ॥ ६ ॥ पावा- वया भगवंतांतें । नाना पंथ नाना मतें । तया देवाचें स्वरूप तें । कैसें आहे ॥ ७ ॥ बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी । एक देव कोणेपरी । ठायीं पडेना ॥ ८ ॥ बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना । तो तेथेंचि राहिला मना । सद्ढ करूनी ॥ ९ ॥ बहु देव बहु भक्त । इच्छा झाले आसक्त । बहु ऋषि बहु मत । वेगळाले ॥१०॥ बहु निवडितां निव- डेना । एक निश्चय घडेना । शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठायीं ॥ ११ ॥ बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतामतांसि विरोध । ऐसा करितां विवाद । बहुत गेले ॥१२॥ सहस्रामध्यें कोणी एक । पाहे देवाचा विवेक । परी त्या देवाचें कौतुक । ठायीं न पडे ॥ १३ ॥ ठायीं न पडे ऐसें म्हणतां । तेथेंचि ला- गली अहंता । देव राहिला परता । अहंतागुणे ॥ १४ ॥ आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें । तो देव कोणत्या गुणें । ठायीं पडे ॥१५॥ देव कोणास म्हणावें । कैसें तयास जाणावें । तेंचि बोलणें स्वभावें । बो- लिजेल ॥ १६ ॥ जेणें केलें चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार । सकळकर्ता निरंतर । नाम जयाचें ॥ १७ ॥ जेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृत- कळा । तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥ ज्याची मर्यादा सा- गरा । जेणें १स्थापिलें फणिवरा । जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥ चौरी खाणी चारी वाणी । चौऱ्यायशीं लक्ष जीवयोनी । जेणें निर्मिले लोक तिन्ही । तया नांव देव ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । हे जयाचे अवतार । तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसी ॥ २१ ॥ देव्हारांचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव । तयाचेनि ब्रह्मकटा³व । निर्मिला न वचे ॥२२॥ ठायीं ठायीं देव असती । तिहीं केली नाहीं क्षिती । चंद्र सूर्य तारा जीमूँ४ती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥ सर्वकर्ता तोचि देव । पाहूं जातां निरवयव । ज्याची कळा लीलालाघव । नेणती ब्रह्मादिक ॥२४॥ येथें आशंका उठिली । ती पुढिलीये १. शेषाला पृथ्वी धरण्यास लाविलें. २. उद्भिज, जारज, अंडज आणि स्वेदज अशी चतुर्विध सृष्टि. ३. ब्रह्मांड. ४. मेघ.

८ वा.] देवदर्शन. १८५ समासीं फिटली । आतां वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥ पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं तें भकास । तया निर्मळीं वायूस । जन्म जाहला ॥ २६ ॥ वायूपासोनि झाला वन्ही । वन्हीपासून झालें पाणी । ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥ उदकापासून क्षिति² झा- ली । स्तंभेंविण उभारिली । ऐशी विचित्र कळा केली । त्या नांव देव ॥ २८ ॥ देवें निर्मिली हे क्षिती । तिचे पोटीं पाषाण होती । तयांसीच देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥ जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपूर्वी होता । मग हे तयाची सत्ता । निर्माण जाहली ॥ ३० ॥ ³कुलाल पात्रापूर्वी आहे । पात्र कांहीं कुलाल नव्हे । तैसा देव पूर्वींच आहे । पाषाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥ मृत्तिकेचें सैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले । कार्य कारण एक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥ तथापि होईल पांचभौतिक । निर्गुण नव्हे कांहींए- क । कार्यकारणांचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥ अवघी सृष्टि जो कर्ता । तो ये सृष्टीहूनि परता । तेथें संशयाची वार्ता । काढूंच नये ॥ ३४ ॥ खांबसूत्रांची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली । तोचि बाहुली हे बोली । घडे कैसी ॥ ३५ ॥ ४छांयामंडपांची सेना । सृष्टिसारिखी रचना । सूत्रें चाळी परी तो नाना । व्यक्ति नव्हे ॥ ३६ ॥ तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव । जेणे केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥ जें ज्यास करणें पडे । तो तें होणें कैसें घडे । म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पड- ती ॥ ३८ ॥ सृष्टीऐसेंचि स्वभावें । ५गोपुरें निर्मिलें बरवें । परी तो गोपुरक- र्ता नव्हे । निश्चयेंसी ॥ ३९ ॥ तैसें जग निर्मिलें जेणें । तो वेगळा पूर्णपणें । एक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥ एवं जगदीश तो वेगळा । जगनिर्माण ज्याची कळा । तो सर्वांमध्यें निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥ म्हणोनि भूतांचा कर्दम⁶ । त्यासि अलिप्त आत्माराम । अविद्या- गुणें मायाभ्रम । सत्याचि वाटे ॥ ४२ ॥ मायोपाधि जगडंबर । आहे सर्वही साचार । ऐसा विपरीत विचार । कोठेंच नाहीं ॥ ४३ ॥ म्हणोनि


१. अग्नि. २. पृथ्वी. ३. कुंभार. ४. पातळ पडदा लावून आंत दिवा ठेवतात व मधून कागदाचीं चित्रे, आकृति फिरवितात, त्या प्रकारांतील. ५. देवळांत देवा- च्या समोर कांहीं मजले बांधतात ते. ६. परस्परांचें मिश्रण.

१८४ श्रीदासबोध. [ दशक जग मिथ्या साच आत्मा । सर्वां पर जो परमात्मा । अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥ तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव । ऐसा आहे अंतर्भावें । वेदांतींचा ॥ ४५ ॥ पदार्थ वस्तु नाशवंत । हें तों अनु- भवास येत । या कारणें भगवंत । पदार्थां वेगळा ॥ ४६ ॥ देव निर्मळ आणि अचळ । शास्त्रे बोलती सकळ । तया निश्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥ देव आला देव गेला । देव उपजला देव मेला । ऐसें बोलतां दुरि- ताला । काय उणें ॥ ४८ ॥ जन्ममरणाची वार्ता । देवास न लागे सर्वथा । देव अमर जयाची सत्ता । त्यास मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥ उपजणें आणि मरणें । येणें जाणें दुःख भोगणें । हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥ अंतःकरण पंच प्राण । बहुतत्त्वीं पिंडज्ञान । या सर्वांस आहे चळण । म्हणो- नि देव नव्हती ॥ ५१ ॥ एवं कल्पनेरहित । तया नांव भगवंत । तेथें देव- पणाची मात । भासत नाहीं ॥ ५२ ॥ तंव शिष्यें आक्षे पिलें । तरी हें कैसें ब्रह्मांड झालें । कर्तृपणें कारण पडलें । कार्यामध्यें ॥ ५३ ॥ द्रष्टेपणे द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायासीं । कर्तृ पणें निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥ ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण । देव सगुण कीं निर्गुण । मज निरूपावा ॥ ५५ ॥ एक म्हणती ब्रह्मातें । इच्छामात्रें सृष्टि करितें । सृष्टि करितें त्यापरतें । कोण आहे ॥ ५६ ॥ आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठूनि झाली । ते हे आतां निरूपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥ ऐसें ऐकून वचन । वक्ता म्हणे सावधान । पुढीलिये समासीं निरूपण । सां- गिजेक ॥ ५८ ॥ ब्रम्हां माया कैसी झाली । पुढें असे निरूपिली । श्रोतीं वृत्ति सावध केली । पाहिजे आतां ॥ ५९ ॥ पुढें हेंचि निरूपण । विशद केलें श्रवण । जेणें होय समाधान । साधकांचें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे अष्टमदशके देवदर्शननिरूपणं नामः प्रथमः समासः ॥ १ ॥ २. आशंका. श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोतीं आक्षेपिले । तें पाहिजे निरूपिलें । निरैवयवीं कैसें झालें । चराचर ॥ १ ॥ याचें ऐसें प्रतिवचन । ब्रम्ह जें कां १. अभिप्राय. २. पापाला. ३. ज्यास अवयव नाहींत अशा ब्रम्हावर.

८ वा.] आशंका. १८७ सनातन । तेथें माया मिथ्या भान । विवर्तरूप भासे ॥ २ ॥ श्लोक ॥ आद्यमेकं परं ब्रम्ह नित्यमुक्तमविक्रियम् । तस्य मायासमावेशो जीवमव्या- कृतात्मकम् ॥१॥ टीका ॥ आदि एक परब्रह्म । नित्य मुक्त अक्रिये परम । तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाहली मूळमाया ॥ ३ ॥ एक ब्रम्ह निराकार । मुक्त अक्रिय निर्विकार । तेथें माया वोडंबर । कोठूनि जाहली ॥ ४ ॥ ब्रम्ह अ- खंड निर्गुण । तेथें इच्छा धरी कोण । निर्गुणीं सगुणेविण । इच्छा नाहीं ॥ ५ ॥ मुळीं असेचिना सगुण । म्हणोनि नामें निर्गुण । तेथें झालें सगुण । कोणे परी ॥ ६ ॥ निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें । लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥ एक म्हणती निरवयव । करून अकर्ता तो देव । त्याची लीला बापुडे जीव । काय जाणती ॥ ८ ॥ एक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । प्राणी बापुडा जीवात्मा । काय जाणे ॥ ९ ॥ उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघाच लोपिती । बळेंच निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥ मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करूनि अकर्ता । कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥ जें ठायींचें निर्गुण । तेथें कैंचें कर्तेंपण । तरी हे इच्छा धरी कोण । सृष्टि रचावयाची ॥ १२ ॥ इच्छा परमेश्वराची । ऐसी युक्ति बहुतेकांची । परी त्या निर्गुणास इच्छा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥ तरी हें इतुकें कोणें केलें । किंवा आपणाचि झालें । देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥ देवें- विण झालें सर्व । मग देवास कैंचा ठाव । येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥ देव म्हणों सृष्टिकर्ता । तरी येऊं पाहे सगुणता । निर्गुण- पणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥ देव ठायींचा निर्गुण । तरी सृष्टि- कर्ता कोण । कर्तेंपणाचें सगुण । नाशवंत ॥१७॥ येथें पडिला कीं विचार । कैसें झालें चराचर । माया म्हणों स्वैतंत्र । तरी हें विपरीत दिसे ॥ १८ ॥ माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली । ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥१९॥ देव निर्गुण स्वतःसिद्ध । त्यासि मायेसि काय संबंध । १. भलताच भास होणें म्हणजे विवर्त. २. कर्मरहित. ३. व्याकृत म्हणजे विकार पावलेलीं नव्हे अशी. ४. गारुड. ५. विचार ६. कर्ता म्हटला म्हणजे तो सगुण होतो अर्थात् नाशवंत होतो असा अर्थ. ७. स्वतःच सृष्टि उत्पन्न करणारी.

१८८ श्रीदासबोध. [ दशक ऐसें बोलतां विरूद्ध । दिसोन आलें ॥ २० ॥ सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्या माथां । तरी भक्तांसि उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥ देवेंविण नुसती माया । कोण नेईल विलया । आम्हां भक्तांस सांभाळाया । कोणच नाहीं ॥ २२ ॥ म्हणोनि माया स्वतंत्र । ऐसा न घडे कीं विचार । मायेसि निर्मिता सर्वेश्वर । तो एकचि आहे ॥ २३ ॥ तरी कैसा आहे ईश्वर । मायेचा कैसा विचार । तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । एकाग्र करूनिया मन । आतां कथानु- संधान । सावध एका ॥ २५ ॥ ऐके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अन- भव । तेहि बोलिजती सर्व । यथानुक्रमें ॥ २६ ॥ एक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली । देवास इच्छा नसती झाली । तरी हे माया कैंची ॥ २७ ॥ एक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्छा करी कोण । माया मिथ्या हे आपण । जाहलीच नाहीं ॥ २८ ॥ एक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसि नाहीं म्हणतां कैसें । माया हे अनादि असे । शक्ति ईश्वराची ॥ २९ ॥ एक म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे । साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥ एक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें । भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥ एक म्हणती मिथ्या दिसतें । भय अज्ञानसन्निपातें । साधनऔषध घेइजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥३२॥ अनंत साधनें बोललीं । नाना मतें भांबावलीं । तरी माय ा न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥३३॥ मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं । मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥३४॥ माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली । मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥ जयाचे अंतरीं अज्ञान । नाहीं वोळखिले सज्जन । तयास माया मिथ्या भान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥ जेणें जैसा निश्चय केला । तपास तैसाच फावला । पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥ एक म्हणती माया कैंची । आहे तें सर्व ब्रह्मची । थिजल्या विधुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥ थिजलें आणि विधुरलें । हें स्वरूपीं नाहीं बोलिलें । साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती एक ॥ ३९ ॥ १. अज्ञानरूप सन्निपात ज्वरानें. २. दृष्टांत.

८ वा.] सूक्ष्म शंका. १८९ एक म्हणती सर्व ब्रम्ह । हें न कळे ज्यास वर्म । तयाचे अंतरींचा भ्रम । गेलाचि नाहीं ॥ ४० ॥ एक म्हणती एकचि देव । तेथें कैंचें आणिले सर्व । सर्व ब्रम्ह हें अपूर्व । आश्चर्य वाटे ॥ ४१ ॥ एक म्हणती एकचि खरें । तेथें नाहीं दुसरें । सर्व ब्रम्ह येणें प्रकारें । सहजचि जाहलें ॥४२॥ सर्व मिथ्या एकसरें । उरलें तेंचि ब्रम्ह खरें । ऐसीं वाक्यें शस्त्राधारें । बोलती एक ॥ ४३ ॥ अलंकार आणि सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण । आटाआटी व्यर्थ शिण । म्हणती एक ॥४४॥ ही उपमा एकदेशी । कैसी साहेल वस्तूसी । वर्णव्यक्त अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥ सुवर्णीं दृष्टि घालितां । मुळींच आहे व्यक्तता । अलंकार सोनें पाहतां । सोनेंचि असे ॥ ४६ ॥ मुळीं सोनेंचि व्यक्त । जड एकदेशी पीतें । पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवीं घडे ॥ ४७ ॥ दृष्टांत तितुका एकदेशी । देणें लागे कळायासी । सिंधु आणि लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । एका दृष्टांतें कळे स्पष्ट । एका दृष्टांतें नष्ट । संदेह वाटे ॥४९॥ कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चंचळाची सरी । साचाऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥ वोडंबरी हे कल्पना । नासा भास दाखवी जना । येरव्हीं हें जाणा । ब्रम्हचि असे ॥ ५१ ॥ ऐसा वाद एकमेकां । लागतां राहिली आशंका । तेचि आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥५२॥ माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रम्हीं कैसी झाली । म्हणावी ते निर्गुणे केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥ मिथ्या शब्दां कांहींच नाहीं । तेथें केलें कोणं काई । करणें निर्गु- णाचा ठायीं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥ कर्ता ठायांचा अरूप । केलें तेंहि मि- थ्यारूप । तथापि फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे अष्टमदशके आशंकानिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. सूक्ष्म शंका. श्रीगणेशाय नमः ॥ अरे जें झालेंच नाहीं । त्याची वार्ता पुससी काई । तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥ दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग । मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥ कल्पने- १. पिवळें. २. संशय गेला असें वाटतें. ३. गारुड. ४. शंका. ५. सूर्यामुळे.

१९० श्रीदासबोध. [ दशक करितां स्वप्न दिसे । शिंपीकरितां रुपें भासे । जळाकरितां गार वसे । निमिष एक ॥ ३ ॥ मातीकरितां भिंती झाली । सिंधूकरितां लहरी आली । तिळां¹करितां पुतळी² । दिसों लागे ॥ ४ ॥ सोन्याकरितां अलंकार । तंतू- करितां झालें चीर³ । कांसवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥ तूप हात तरी थिजलें । तरीं⁴करितां मीठ झालें । बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥ पृथ्वीकरितां झालें झाड । झाडाकरितां छाया वाढे । धातूकरित⁵ पवाड⁶ । उंच नीच वर्णांचा ॥ ७ ॥ आतां असो हे दृष्टांत । अद्वैतास कैंचें द्वैत । द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥ भासाकरितां भास भासे । दृश्याकरितां दृश्य दिसे । अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरुपम ॥ ९ ॥ कल्पनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत । द्वैतावेगळें अद्वैत । कैसें जाहलें ॥ १० ॥ विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी⁷ । तेणें केली उभारणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥ परमात्मा परमेश्वर । सकळ कर्ता जो ईश्वर । तयापासोनि विस्तार । सकळ जाहला ॥ १२ ॥ ऐसीं अनंत नामें धरी । अनंत शक्ति निर्माण करी । तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥ त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाच आपण । सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥ श्लोक ॥ कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । हें⁸ उघड बोलतां न ये । मोडो पाहतो उपाय । येन्हवीं हें पाहतां काय । सा- च आहे ॥ १५ ॥ देवापासून सकळ झालें । हें सर्वांस मानलें । परी त्या देवास । वोळखिलें पाहिजे कीं ॥ १६ ॥ सिद्धाचें जें निरूपण । तें साधकां न माने जाण । पक्क नाहीं अंतःकरण । म्हणोनियां ॥ १७ ॥ अविद्यागुणें बो- लिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव । मूळमायागुणें देव । बोलिजे तो ॥ १८ ॥ म्हणोनि कारण मूळमाया । अनंत शक्ति धरावया । तेथींचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥ मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश । अनंतनामी जगदीश । तयासीच बोलिजे ॥ २० ॥ अवघी माया विस्तारली । परी हे निःशेष नाथिली । ऐशिया वचनाची खोली । विरळा जाणे ॥ २१ ॥ ऐसें अनिर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे । संतसंगें- १. डोळ्यांतील तीळ, त्यापासून. २. बाहुली. ३. वस्त्र. ४. खाडीपासून. ५. विस्तृत. ६. मोठेपणा. ७. शेषाला. ८. बोलून दाखविण्याजोगी नव्हे.

८ वा. ] सूक्ष्म शंका. १९१ विण नुमजे। कांहीं केल्या ॥ २२ ॥ माया तोचि मूळपुरुष । साधकां न माने हैं निःशेष । परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥ नामरूप मा- येस लागलें । तरी हें बोलणें नटिचि झालें । तेथें श्रोतीं अनुमानिलें । कासया- सी ॥ २४ ॥ आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली । नि- राकारीं कैशी झाली । मूळमाया ॥ २५॥ दृष्टिबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा झाला खेळ । हें अवघें निव्वळ । करुन दाऊं ॥ २६ ॥ आकाश अ- सतां निश्चळ । मध्यें झाला वायु चंचळ । तैसी जाणावी केवळ । मूळमा- या ॥ २७ ॥ रूप वायूचें झालें । तेणें आकाश भंगलें । ऐसें हें सत्य मा- निलें । न वचे कीं कदा ॥ २८ ॥ तैसी मूळमाया झाली । आणि निर्गुणता संचली । येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥ वायु नव्हे पुरा- तन । तैसी मूळमाया जाण । साच म्हणतां पुनः लीन । होत असे ॥ ३० ॥ वायु रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहे । असे परी ते न लाहे । रूप तयाचें ॥ ३१॥ वायु सत्य म्हणों जातां । परी तो न ये दाखवितां । तया- कडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥ तैसी मूळमाया भासे । भासे परी ते न दिसे । पुढें विस्तारली असे । माया अविद्या १ ॥ ३३ ॥ जैसें वायू- चेनि योगें । दृश्य उडे गगनमागें । मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४॥ गगनीं आभाळ नोंथिलें २ । अकस्मात उद्भवलें । मायेचेनि गुणें झालें । तैसें जग ॥ ३५ ॥ नोंथिलेंच गगन नव्हतें । अकस्मात् आलें तेथें । तैसें दृश्य झालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥ परी तया आभाळाकरितां । गगनाची गेली निश्चळता । वाटे परी तें तत्वतां । तैसेंचि आहे ॥ ३७॥ तैसें मायेक- रितां निर्गुण । वाटे झालें सगुण । परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८॥ आभाळ आलें आणि गेलें । तरी गगन तें संचलें । तैसें गुणा नाहीं आलें । नि- र्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥ नभ माथां लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे । तैसें जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥ ३ ऊर्ध्व पाहतां आकाश । नीलिमा ४ दिसे सावकाश । परी तो जाणिजे मिथ्या भास । भासला असे ॥ ४१॥ आ- काश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें । वाटे विश्वास कोंडिलें । परी तें मोकळेंच असे ॥ ४२ ॥ पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला १. अज्ञान. २. नसलेलें. ३. वरतीं. ४. निळा रंग.

[page: 192] १९२ श्रीदासबोध. [ दशक

नसे । अलिप्त जाणावें तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥ रथ धांवतां पृथ्वी चं- चळ : वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४॥ आभाळाकरितां तो मृगांक¹ । वाटे धांवतो निःशंक । परी तें अवघें मायिक । आभाळ चले ॥ ४५ ॥ जळ अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंतराळ । वाटे परी तें निश्चळ । जैसें तैसें ॥ ४६॥ तैसें स्वरूप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें² । ऐसें कल्पनेसि गमलें । परी तें मिथ्या ॥ ४७ ॥ दृष्टिबंध- नाचा खेळ । तैसी हे माया चंचल । वस्तु शाश्वत निश्चळ । तैसी तैसी ॥ ४८ ॥ ऐसी वस्तु निरवयव । माया दाखवी अवयव । इचा ऐसाचि स्वभाव । नाथिलीचि हे ॥ ४९ ॥ माया पाहतां मुळींच नसे । परी हे सा- चाऐसी भासे । उद्भवे आणि निरसे । आभाळ जैसें ॥ ५० ॥ ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली । अहं³ ऐसी स्फूर्ति झाली । तेचि माया ॥ ५१ ॥ गुणमायेचे पँवाडे⁴ । निर्गुणीं हें कांहींच न घडे । परी हें घडे आणि मोडे । स्वस्वरूपीं⁵ ॥ ५२ ॥ जैसी दृष्टि तरळली । तेणें सेनाच भासली । पाहतां आकाशींच झाली । तरी ते मिथ्या ॥ ५३ ॥ मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ । नाना तत्त्वांचा पाल्हाळ । मांडूनियां ॥ ५४ ॥ तत्त्वें मुळींच आहेती । ओंकार वायूची गती । तेथींचा अर्थ जाणती । दक्ष- ज्ञानी ॥ ५५ ॥ मूळमायेचें चळण । तेंचि वायूचें लक्षण । सूक्ष्म तत्त्वें तेचि जाण । जडत्व पावली ॥ ५६ ॥ ऐसीं पंचमहाभूतें । पूर्वी होतीं अव्यक्तें⁶ । पुढें झालीं व्यक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥ मूळमायेचें लक्षण । तेंचि पांच- भौतिक जाण । तेंचि पाहतां लक्षून । सूक्ष्म दृष्टीं ॥ ५८ ॥ आकाशीं वायू- विण । इच्छाशब्द करी कोण । इच्छाशक्ति तेचि जाण । तेजस्वरूप ॥ ५९॥ मृदुपण तेंचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ । ऐसी मूळमाया सकळ । पांच- भौतिक जाणावी ॥ ६० एकएका भूतापोटीं । पंचभूतांची राहांटी⁷ । सर्व कळे सूक्ष्म दृष्टी । घालून पाहतां ॥ ६१ ॥ पुढें जडत्वास आली । तरी असे ती कालवली । ऐसी माया विस्तारली । पांचभौतिक ॥ ६२ ॥ मूळमाया पाहतां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं । स्वर्गी मृत्यु पाताळीं । पांचचि


१. चंद्र. २. सगुण झाले. ३. 'मी' असें स्फुरण. ४. पराक्रम. ५. आत्म- स्वरूपावर. ६. अदृश्यरूप. ७. व्यवहार.

भूतें ॥ ६३ ॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ च पाताले यत्किंचित्सचराचरम् ॥ सर्वं तत्पांचभौतिकं षष्ठं किंचिन्न दृश्यते ॥ टीका ॥ सत्यस्वरूप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती । पांचभौतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥ येथें उठली आशंका । सावध होऊन ऐका । पंचभूतें झालीं एका । तमो- गुणापासूनी ॥ ६५ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं । ऐसी आशंका श्रोतीं । घेतली मागां ॥ ६६ ॥ ऐसें श्रोतीं आपेक्षिलें । संशयास उभें केलें । याचें उत्तर दीधलें । पुढिलिये समासीं ॥ ६७ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके सूक्ष्मशंकानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. सूक्ष्म पंचभूतें. श्रीगणेशाय नमः ॥ मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ । वृत्ति करावी निवळ । निमिष एक ॥ १ ॥ ब्रह्मीं मूळमाया झाली । तिच्या पोटीं गुणमाया आली । मग ते गुणास प्रसवली । म्हणोनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥ पुढें तिजपासाव कोण । सत्व रज तमोगुण । तमोगुणापासून नि- र्माण । जाहलीं पंचभूतें ॥ ३ ॥ ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्त्वें विस्तारलीं । एवं तमोगुणापासून झालीं । पंचमहाभूतें ॥ ४ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होती । ऐसी आशंका श्रोतीं । घेतली मागें ॥ ५ ॥ आणीक एकएकें भूतीं । पंचभूतें असती । तेहि आतां कैशी स्थिती । प्रांजळ करूं ॥ ६ ॥ सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पांचभौतिक । श्रोतीं विमळ वि- वेक । केला पाहिजे ॥ ७ ॥ आधीं भूतें तों जाणावीं । रूपें कैसीं वोळखावीं । मग तीं शोधून पाहावीं । सूक्ष्म दृष्टी ॥ ८ ॥ वोळखी नाहीं अंतरीं । ते वो- ळखावी कोणे परी । म्हणोनि वोळखी चतुरीं । नावेकें परिसावी ॥ ९ ॥ जें जें जड आणि कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण । मृदु आणि वोलेपण । ति- तुकें आप ॥ १० ॥ जें जें उष्ण आणि सतेज । तें तें जाणावें पैं³ तेज । आतां वायुहि सहज । निरूपिजेल ॥ ११ ॥ चैतन्य आणि चंचळ । तो हा वायुचि केवळ । शून्य अवकाश निर्मळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥ १. त्रिगुणास प्रगट करणारी. २. क्षणमात्र. ३. 'पहा' अशा अर्थीं अव्यय.

१९४ श्रीदासबोध. [ ऐशीं पंच महाभूतें । ओळखी धरावी संकेतें । आतां एकीं पंचभूतें वध ऐकां ॥ १३ ॥ जे त्रिगुणांहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार । य अति तत्पर । होऊनि ऐका ॥ १४ ॥ सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी आधीं निरूपावी । येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥ आका- णजे अवकाश शून्य । शून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे जडत्व तेचि पृथ्वी ॥ १६ ॥ आकाश आहे स्वयें मृदु । तेंचि आप स्वतः- आतां तेजहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥ अज्ञानें भासला भास । तेजाचा प्रकाश । आतां वायु सावकाश । साकल्यें सांगों ॥ १८ । आकाशा नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध । तथापि आकाशीं रुद्धं । तोचि वायु ॥ १९ ॥ आकाशीं आकाश मिसळलें । हैं तों न बोलिलें । येणें प्रकारें निरूपिलें । आकाश पंचभूत ॥ २० ॥ वायूमध्ये भूतें । तींही ऐका एकचित्तें । बोलिजेती समस्तें । यथान्वयें ॥ २१ फूल तरी जड । हळु वारा तरी निबिडं । वायु लागतां कडाड । झाडें ॥ २२ ॥ तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कांहींच न घडे । तोल तया जडे । पृथिवीचा अंश ॥ २३ ॥ येथें श्रोते आशंका घेती । तेथें झाडें होती । झाडें नव्हती तरी शक्ति । कठीणरूप आहे ॥ २४ ॥ वा लिंग लहान । कांहीं तरी असे उष्ण । तैसें सूक्ष्मीं जडपण । सू ॥ २५ ॥ मृदुपण तेंचि आप । भासे तेजाचें स्वरूप । वायु तेथें चंचळ सहजचि आहे ॥ २६ ॥ सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे काश । पंचभूतांचे अंश । वायूमध्ये निरूपिले ॥ २७ ॥ आतां लक्षण । भासलें परी तेंचि कठिण । तेजीं ऐसी वोळखण । पृथ्व ॥ २८ ॥ भासला भास वाटे मृदु । तेजीं आप तेंचि प्रसिद्ध । तेज स्वतःसिद्ध । सांगणें नलगे ॥ २९ ॥ तेजीं वायु चंचल । तेजीं अ निश्चळ । तेजीं पंचभूतें सकळ । निरूपिलीं ॥ ३० ॥ आतां आपाचें आप तेजीं मृदुपण । मृदुपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥ आपें सहजचि असे । तेज मृदुपणें भासे । वायु स्तब्धपणें दिसे । मृदुत्व १. एकंक भूतांत. २. चित्ताचें ऐक्य. ३. संपूर्णपणें. ४. मर्यादित. ५. ६. वजन. ७. अग्नीची ठिणगी.

३२ ॥ आकाश नलगे सांगावें । तें व्यापकाच स्वभावें । आणि पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरूपिलीं ॥ ३३ ॥ आतां पृथ्वीचें लक्षण । कठिण पृथ्वी आप जान । कठिणत्वीं मृदुपण । तेंचि आपें ॥ ३४ ॥ कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश । कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायु ॥ ३५ ॥ आकाश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक । आकाशींच कांहीं- एक । भास भासे ॥ ३६ ॥ आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना । आकाश परतें होईना । तिळमात्र ॥ ३७ ॥ असो आतां पृथ्वी- आंत । दाविला भूतांचा संकेत । एके भूतीं पंचभूत । तें हें निरूपिलें ॥ ३८ ॥ परी हें आहाचें पाहतां नातुडे । बलेंच पोटीं संदेह पडे । भ्रांतिरूपें अहंता जडे । अकस्मात ॥ ३९ ॥ सूक्ष्म दृष्टीनें पाहतां । वायुचि वाटे तत्त्वतां । सूक्ष्म वायु शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥ एवं पांच- भौतिक पवन । तेचि मूळमाया जान । माया आणि सूक्ष्म त्रिगुण । तेंचि पांचभौतिक ॥ ४१ ॥ भूतें गुण मेळविजे । त्यासि अष्टधा बोलिजे । पांच- भौतिक जाणिजे । अष्टधा प्रकृती ॥ ४२ ॥ शोधून पाहिल्याविण । संदेह धरणें मूर्खपण । याची पाहावी ओळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥ गुणापासून भूतें । पावलीं स्पष्ट दशेतें । जडत्वा येऊनि समस्तें । तत्वें जाहलीं ॥ ४४ ॥ पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्त्वरचना । बोलिलीसे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥ हा भूतकेंर्दभ बोलिला । सूक्ष्मसंकेतें दाविला । ब्रह्मगोळ उभा राहिला । तत्पूर्वी ॥ ४६ ॥ या ब्रह्मांडापैलकडील गोष्टी । जै झाली नव्हती सृष्टी । मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥ सप्तकंचुकें प्रचंड । झालें नव्हतें ब्रह्मांड । मायाअविद्येचें बंड । ऐलीकडे ॥ ४८ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलीकडील विचार । पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलीकडे ॥ ४९ ॥ नाना लोक नाना स्थानें । चंद्र सूर्य तारांगणें । सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलीकडे ॥ ५० ॥ शेष कूर्म सप्त पाताळ । एकवीस स्वर्ग अष्ट दिक्पाळँ । तेहतीस कोटी देव सकळ । ऐलीकडे ॥ ५१ ॥ बारा आदित्य १. स्वतः २. वरवर. ३. भूतें पाच व गुण तीन मिळून. ४. भूतांच मिश्रण. ५. सात आवरणें ( भूतें पांच व अहंकार आणि महत्तत्त्व हीं दोन ) यांनीं युक्त. ६. इद्र, अग्नि, यम, निक्रंती, वरुण, वायु, कुबेर आणि शिव असे आठ दिशांचे अधिपती.

१९६ श्रीदासबोध. [ दशक अकरा रुद्र । नव नाग सप्त ऋषीश्वर । नाना देवांचे अवतार । ऐलीकडे ॥ ५२ ॥ मेघ मनु चक्रवर्ती । नाना जीवांची उत्पत्ती । आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥५३॥ सकळ विस्ताराचें मूळ । ते मूळमायाच केवळ । मागां निरूपिलें सकळ । पांचभौतिक ॥ ५४ ॥ सूक्ष्मभूतें जे बोलिलीं । तेचि पुढें जडत्वा आलीं । ते हे सकळहि बोलिलीं । पुढिलिये समासीं ॥ ५५ ॥ पंचभूतें पृथगाकारें । पुढें निरूपिलीं विस्तारें । वोळखीकारणें अत्या- दरें । श्रोतीं श्रवण करावी ॥ ५६ ॥ पांचभौतिक ब्रह्मगोल । जेणें कळे हा प्रांजळ । दृश्य सांडून केवळ । वस्तुचि पाविजे ॥ ५७ ॥ महाद्वार वोलां- डावें । मग देवदर्शन घ्यावें । तैसें दृश्य हें सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥ म्हणोनि दृश्याचे पोटीं । आहे पंचभूतांची दाटी । एकपणें पडिली मिठी । दृश्यपंचभूतां ॥ ५९ ॥ पंचभूतांचीच दृश्य । सृष्टि रचिली सावकाश । श्रोतीं करूनि अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे अष्टमदशके सूक्ष्मपंचभूतनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. पंचमहाभूतस्वरूप. श्रीगणेशाय नमः ॥ केवळ मूर्ख तें नेणे । म्हणोनि घडलें सांगणें । पंच- भूतांचीं लक्षणें । विशद करूनी ॥ १ ॥ पंचभूतांचा कर्दम जाहला । आतां न वचे वेगळा केला । परंतु कांहीं वेगळाला । करून दाखवूं ॥ २ ॥ पर्वत पाषाण शिळा शिखरें । नाना वर्ण लहान थोरें । खडे गुंडे बहुप्रकारें । जा- णिजे पृथ्वी ॥ ३ ॥ नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां । वाळुके वाळू अनेका । मिळोन पृथ्वी ॥ ४ ॥ पुरें पट्टणें मनोहरें । नाना मंदिरें दोमोदरें । नाना देवालयें शिखरें । मिळोन पृथ्वी ॥ ५ ॥ सप्त- द्वीपवती पृथ्वी । काय म्हणोनि सांगावी । नवखंडें मिळोनि जाणावी । वसुंधरा ॥ ६ ॥ नाना देश नाना नृपती । नाना भाषा नाना रीती । लक्ष चौऱ्यायशी उत्पत्ती । मिळोन पृथ्वी ॥ ७ ॥ नाना उद्र्धूसें वनें । नाना तरु- वरांचीं बनें । गिरिकंदरें नाना स्थानें । मिळोन पृथ्वी ॥ ८ ॥ नाना रचना केली देवीं । जे जे निर्मिली मानवीं । सकळ मिळोन पृथ्वी । जाणिजे १. रत्नखचित मंदिरें. २. पृथ्वी. ३. ओसाड.

८ वा. ] पंचमहाभूतस्वरूप. १९७ श्रोतीं ॥ ९ ॥ नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्ने जीं अनेक । नाना काष्ठ वृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥ आतां असो हें बहुवस । जडांश आणि कठिणांश । सकळ पृथ्वी हा विश्वास । मानिला पाहिजे ॥ ११ ॥ बोलिलें पृथ्वीचें रूप । आतां सांगिजेल आप । श्रोतीं ओळखावें रूप । सावध होऊनी ॥ १२ ॥ वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जें नीर । मेघ आणि सप्त सागर । मिळोन आप ॥ १३ ॥ श्लोकार्ध ॥ क्षारक्षीरसुरासर्पि- र्दधि चेक्षुजलं तथा ॥ क्षारसमुद्र दिसताहे । सकळ जन दृष्टीस पाहे । जेथें लवण होत आहे । तोचि क्षारसिंधु ॥ १४ ॥ एक दुधाचा सागर । त्या नांव क्षीरसागर । देवें दीधला निरंतर । उपमन्यूसी १ ॥ १५ ॥ एक समुद्र मद्याचा । एक जाणा घृताचा । एक निखळ दह्याचा । समुद्र असे ॥ १६ ॥ एक उं- साच्या रसाचा । एक तो शुद्ध जळाचा । ऐसा सातां समुद्रांचा । वेढा पृ- थ्वीसी ॥ १७ ॥ एवं भूमंडळींचें जळ । नाना स्थळींचें जें सकळ । मिळोन अवघें केवळ । आप जाणावें ॥ १८ ॥ पृथ्विगर्भीं कितीक । पृथ्वीतळीं आ- वरणोदक । तिहीं लोकींचें उदक । मिळोन आप ॥ १९ ॥ नाना वल्ली बहु- वस । नाना तरुवरांचे रस । मध पारा अमृत विष । मिळोन आप ॥२०॥ नाना रस स्नेहादिकें २ । यांहि वेगळे अनेक । जळाऐसे आवश्यक । आप बोलिजे ॥ २१ ॥ सार्द्र ३ आणि शीतल । जळासारिखें पातळ । शुक्र ४ शो- णितें ५ मूत्र लाळ । आप बोलिजे ॥ २२ ॥ आप संकेतें जाणावें । पातळ ओलें ओळखावें । मृदु शीतल स्वभावें । आप बोलिजे ॥ २३ ॥ झाला आपाचा संकेत । पातळ मृदु गुळगुळीत । स्वेद ६ श्लेष्मा ७ अश्रु समस्त । आ- प जाणावें ॥ २४ ॥ तेज ऐका सावधपणें । चंद्र सूर्य तारांगणें । दिव्य देह सतेजपणें । तेज बोलिजे ॥ २५ ॥ वन्हि मेघीं विद्युल्लता । वन्हि सृष्टि- संहारिता । वन्हि सागरा जाळिता । वडवानळ ॥ २६ ॥ वन्हि शंकराचे नेत्रींचा । वन्हि काळाचे क्षुधेचा । वन्हि परिवे ८ भूगोळाचा । तेज बोलिजे ॥ २७ ॥ जें जें सतेज प्रकाशरूप । तें तें तेजाचें स्वरूप । शोषक उष्णादि आरोप ९ । तेज जाणावें ॥ २८ ॥ वायु जाणावा चंचल । चैतन्य चेतवी के-


१. एक ऋषिपुत्र, त्याला. २. तेल, तूप इत्यादि. ३. ओलसर. ४. रेत. ५. रक्त. ६. घाम. ७. कफ. ८. वेढा. ९. कल्पना.

[Page Header] १९८ श्रीदासबोध. [ दशक

वळ । बोलणें चालणें सकळ । वायूमुळें ॥ २९ ॥ डोले हाले तितुका प- वन । कांहींच न चले पवनेंविण । सृष्टीच्या लया कारण । मूळ तो वायु ॥ ३० ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । सकळ जाणा- वा पवन । चंचळरूपी ॥ ३१ ॥ प्राण अपान आणि व्यान । चौथा उदान पांचवा समान । नाग१ कूर्म क्रेकर जाण । देवदत्त धनंजय ॥ ३२ ॥ जितुकें कांहीं होतें चळण । तितुकें वायूचें लक्षण । चंद्र सूर्य तारागण । वायुचि धर्ता ॥ ३३ ॥ आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणि निश्चळ । अवकाश- रूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ आकाश सकळांस व्यापक । आ- काश अनेकीं एक । आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचें ॥ ३५ ॥ आका- शाऐसें नाहीं सार । आकाश सकळांहूनि थोर । पाहतां आकाशाचा विचार । स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥ तंव श्रोतीं केला आक्षेप । दोहींचें सारखेंचि रूप । तरी आकाशाचि स्वरूप । कां म्हणों नये ॥ ३७ ॥ आकाश स्वरूपा कोण भेद । पाहतां दिसती अभेद । आकाश वस्तु स्वतःसिद्ध । कां न म्ह- णावी ॥ ३८ ॥ वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निखळ । तैसेंच आकाश केवळ । वस्तूंसारिखें ॥ ३९ ॥ ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण पुरातन । आकाशा अंगीं सप्त गुण । शास्त्रीं निरूपिले ॥ ४० ॥ काम क्रोध शोक मोहो । भय अज्ञान शून्यत्व पाहो । ऐसा सप्तविध स्वभावो । आका- शाचा ॥ ४१ ॥ ऐसें शास्त्रकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत झालें । स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥ कांचबंदी२ आणि जळ । सारिखेंचि वाटे सकळ । परी एक कांच एक जळ । शाहणे जाणती ॥ ४३ ॥ रुवामध्यें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला । तेणें कपाळमोक्ष झाला । कापूस न करी ॥ ४४ ॥ तांदुळांमध्यें श्वेत३ खडे । तांदुळासारिखे वांकडे । चावूं जातां दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥ त्रिभागामध्यें४ खडा असे । त्रिभागासारिखाचि भासे । शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥ गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचोड५ । नागकोंडी६ आणि वेखं- ड । एक म्हणों नये ॥ ४७ ॥ सोनें आणि सोनपितळ । एकचि वाटती


[Footnotes] [F1] १. हीं पंच उपप्राणांचीं नांवें. २. कांचांनीं बनविलेली जागा. ३. पांढरे. [F2] ४. चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणामध्यें. ५. अतिशय. ६. बचनाग.

८ वा.] पंचमहाभूतस्वरूप. १९९ केवळ । परी पितळेस लागतां ज्वाळ । कालिमा चढे ॥ ४८ ॥ असो हे हीन दृष्टांत । आकाश ह्मणिजे केवळ भूत । तें भूत आणि अनंत । एक कैसें ॥ ४९ ॥ वस्तूंसि वर्णचि नसे । आकाश श्यामवर्ण भासे । दोहोंस साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥ श्रोते म्हणती कैचें रूप । आका- श ठायींचें अरूप । आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥ चहूं भूतां- स नाश आहे । आकाश कैसें नासताहे । आकाशीं न साहे । वर्ण^१ व्यक्ति^२ विकार॥५२॥ आकाश अचळ दिसतें । त्याचें काय नासों पाहतें । पाहतां आमुचेनि मतें । आकाश शाश्वत ॥ ५३ ॥ ऐसें ऐकोन वचन । वक्ता बोले प्रतिवचन । ऐक आतां लक्षण । आकाशाचें ॥ ५४ ॥ आकाश तमापासून झालें । ह्मणोनि कामक्रोधें वेष्टिलें । अज्ञान शून्यत्व बोलिलें । नाम तयाचें ॥ ५५ ॥ अज्ञानें कामक्रोधादिक । मोह भय आणि शोक । हा अज्ञानाचा विवेक । आकाशगुणें ॥ ५६ ॥ नास्तिक नकारवचन । तेंचि शून्याचें लक्षण । तयास म्हणती हृदयशून्य । अज्ञान प्राणी ॥५७॥ आकाश स्तब्ध- पणें शून्य । शून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे कठिण । रूप तयाचें ॥ ५८ ॥ कठिण शून्य विकारवंत । तयास कैसें म्हणावें सत । मनास वाटे हें तद्वत । औहाच^३ दृष्टी ॥ ५९ ॥ अज्ञान कालवलें आकाशीं । तया कर्दमा ज्ञान नाशी । म्हणोनिया आकाशासी । नाश आहे ॥ ६० ॥ तैसें आकाश आणि स्वरूप । पाहतां वाटती एकरूप । परी दोहोंमध्यें विक्षेप । शून्य स्वाचा ॥ ६१ ॥ औहाच^४ पाहतां कल्पनेसी । सारिखेंच वाटे निश्चयेंसी । परी आकाश स्वरूपासी । भेद आहे ॥ ६२ ॥ उन्मनी^५ आणि सुषुप्ति^६ अवस्था । सारिखीच वाटे तत्वतां । परी विवेचून पाहूं जातां । भेद आहे ॥ ६३ ॥ खोटें खऱ्यासारिखें भाविती । परी परीक्षावंत निवडिती । कां कुरंगें^७ देखोनि भुलती । मृगजळासी ॥ ६४ ॥ आतां असोत हे दृष्टांत । बोलिलों कळाया संकेत । म्हणोनि भूत आणि अनंत । एक नव्हेती ॥६५॥ आकाश वेगळेपणें पाहावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें । वस्तूचें पाहणें स्वभावें । ऐसें असे ॥ ६६ ॥ येथें आशंका फिटली । संदेहवृत्ति मावळली । भिन्नपणें न वचे अनुभविती । स्वरूपस्थिती ॥६७॥ आकाश अनुभवा येतें ।


१. रंग. २. आकार. ३. वरवर. ४. कल्पना. ५. मनोलय. ६. झाप. ७. हरिणे.

२०० श्रीदासबोध. [ दशक स्वरूप अनुभवा परतें । म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥६८॥ दुग्धासारिखा जळांश । निवडूं जाणती राजहंस । तैसें स्वरूप आणि आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥ सकळ माया गाथागोवी । संतसंगें हे उग- वावी । पाविजे मोक्षपदवी । सत्समागमें ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे अष्टमदशके पंचमहाभूतस्वरूपआकाशभेदनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. दुश्चितलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी । मोक्ष लाभे किती दिवसीं । हें मज निरूपावें ॥ १ ॥ धरितां साधूची संगती । किती दिवर्शी होते मुक्ती । हा निश्चय कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥२॥ मुक्ति लाभे तत्क्षणीं । विश्वासातां निरूपणीं । दुश्चितपणें हानी । होत असे ॥ ३ ॥ सुचितपणें दुश्चित । मन होतें अकस्मात । त्यास करावें निवांत । कोणे परी ॥ ४॥ मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडी । सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥ अर्थप्रमेयें ग्रंथांतरीं । शोधूनि घ्यावें अभ्यंतरीं । दुश्चितपण आलें तरी । पुन्हा श्रवण करावें ॥६॥ अर्थांतर पाहिल्याविण । उगोंचि करी जो श्रवण । तो श्रोता नव्हे पाषाण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥ येथें श्रोते मानितील शिण । आम्हांसि केलें पाषाण । तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥८॥ वांकुडा तिकुडा फोडिला । पाषाण घडून नीट केला । दुसरे वेळेस पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥ टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुनः लागे ॥१०॥ सांगतां अवगुण गेला । पुनः मागुती जडला । या कारणें महा भला । पाषाण गोटा ॥ ११ ॥ ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहून उणा । पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥ कोटिगुणें कैसा पाषाण । स्याचेंहि ऐका लक्षण । श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥ माणीक मोतीं प्रर्वाळ । पाच वैडूर्य वज्रैनीळ । गोमेदें मणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥ यांहि वेगळे बहुत । १. सिद्धान्त. २. गूढार्थ. ३. श्रेष्ठ. ४. पोंवळें. ५. एक रत्न. ६. हिरा.