दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 230, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३२ ॥ आकाश नलगे सांगावें । तें व्यापकाच स्वभावें । आणि पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरूपिलीं ॥ ३३ ॥ आतां पृथ्वीचें लक्षण । कठिण पृथ्वी आप जान । कठिणत्वीं मृदुपण । तेंचि आपें ॥ ३४ ॥ कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश । कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायु ॥ ३५ ॥ आकाश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक । आकाशींच कांहीं- एक । भास भासे ॥ ३६ ॥ आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना । आकाश परतें होईना । तिळमात्र ॥ ३७ ॥ असो आतां पृथ्वी- आंत । दाविला भूतांचा संकेत । एके भूतीं पंचभूत । तें हें निरूपिलें ॥ ३८ ॥ परी हें आहाचें पाहतां नातुडे । बलेंच पोटीं संदेह पडे । भ्रांतिरूपें अहंता जडे । अकस्मात ॥ ३९ ॥ सूक्ष्म दृष्टीनें पाहतां । वायुचि वाटे तत्त्वतां । सूक्ष्म वायु शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥ एवं पांच- भौतिक पवन । तेचि मूळमाया जान । माया आणि सूक्ष्म त्रिगुण । तेंचि पांचभौतिक ॥ ४१ ॥ भूतें गुण मेळविजे । त्यासि अष्टधा बोलिजे । पांच- भौतिक जाणिजे । अष्टधा प्रकृती ॥ ४२ ॥ शोधून पाहिल्याविण । संदेह धरणें मूर्खपण । याची पाहावी ओळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥ गुणापासून भूतें । पावलीं स्पष्ट दशेतें । जडत्वा येऊनि समस्तें । तत्वें जाहलीं ॥ ४४ ॥ पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्त्वरचना । बोलिलीसे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥ हा भूतकेंर्दभ बोलिला । सूक्ष्मसंकेतें दाविला । ब्रह्मगोळ उभा राहिला । तत्पूर्वी ॥ ४६ ॥ या ब्रह्मांडापैलकडील गोष्टी । जै झाली नव्हती सृष्टी । मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥ सप्तकंचुकें प्रचंड । झालें नव्हतें ब्रह्मांड । मायाअविद्येचें बंड । ऐलीकडे ॥ ४८ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलीकडील विचार । पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलीकडे ॥ ४९ ॥ नाना लोक नाना स्थानें । चंद्र सूर्य तारांगणें । सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलीकडे ॥ ५० ॥ शेष कूर्म सप्त पाताळ । एकवीस स्वर्ग अष्ट दिक्पाळँ । तेहतीस कोटी देव सकळ । ऐलीकडे ॥ ५१ ॥ बारा आदित्य १. स्वतः २. वरवर. ३. भूतें पाच व गुण तीन मिळून. ४. भूतांच मिश्रण. ५. सात आवरणें ( भूतें पांच व अहंकार आणि महत्तत्त्व हीं दोन ) यांनीं युक्त. ६. इद्र, अग्नि, यम, निक्रंती, वरुण, वायु, कुबेर आणि शिव असे आठ दिशांचे अधिपती.