दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 233, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें[Page Header] १९८ श्रीदासबोध. [ दशक
वळ । बोलणें चालणें सकळ । वायूमुळें ॥ २९ ॥ डोले हाले तितुका प- वन । कांहींच न चले पवनेंविण । सृष्टीच्या लया कारण । मूळ तो वायु ॥ ३० ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । सकळ जाणा- वा पवन । चंचळरूपी ॥ ३१ ॥ प्राण अपान आणि व्यान । चौथा उदान पांचवा समान । नाग१ कूर्म क्रेकर जाण । देवदत्त धनंजय ॥ ३२ ॥ जितुकें कांहीं होतें चळण । तितुकें वायूचें लक्षण । चंद्र सूर्य तारागण । वायुचि धर्ता ॥ ३३ ॥ आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणि निश्चळ । अवकाश- रूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ आकाश सकळांस व्यापक । आ- काश अनेकीं एक । आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचें ॥ ३५ ॥ आका- शाऐसें नाहीं सार । आकाश सकळांहूनि थोर । पाहतां आकाशाचा विचार । स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥ तंव श्रोतीं केला आक्षेप । दोहींचें सारखेंचि रूप । तरी आकाशाचि स्वरूप । कां म्हणों नये ॥ ३७ ॥ आकाश स्वरूपा कोण भेद । पाहतां दिसती अभेद । आकाश वस्तु स्वतःसिद्ध । कां न म्ह- णावी ॥ ३८ ॥ वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निखळ । तैसेंच आकाश केवळ । वस्तूंसारिखें ॥ ३९ ॥ ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण पुरातन । आकाशा अंगीं सप्त गुण । शास्त्रीं निरूपिले ॥ ४० ॥ काम क्रोध शोक मोहो । भय अज्ञान शून्यत्व पाहो । ऐसा सप्तविध स्वभावो । आका- शाचा ॥ ४१ ॥ ऐसें शास्त्रकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत झालें । स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥ कांचबंदी२ आणि जळ । सारिखेंचि वाटे सकळ । परी एक कांच एक जळ । शाहणे जाणती ॥ ४३ ॥ रुवामध्यें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला । तेणें कपाळमोक्ष झाला । कापूस न करी ॥ ४४ ॥ तांदुळांमध्यें श्वेत३ खडे । तांदुळासारिखे वांकडे । चावूं जातां दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥ त्रिभागामध्यें४ खडा असे । त्रिभागासारिखाचि भासे । शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥ गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचोड५ । नागकोंडी६ आणि वेखं- ड । एक म्हणों नये ॥ ४७ ॥ सोनें आणि सोनपितळ । एकचि वाटती
[Footnotes] [F1] १. हीं पंच उपप्राणांचीं नांवें. २. कांचांनीं बनविलेली जागा. ३. पांढरे. [F2] ४. चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणामध्यें. ५. अतिशय. ६. बचनाग.