दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 219, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८४ श्रीदासबोध. [ दशक वरी । आयुष्य पुरेना ॥४॥ नाना तपें नाना दानें । नाना योग नाना सा- धनें । हीं सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५॥ पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा । तेणें देव ठायीं पाडावा । हैं सर्वमत ॥ ६ ॥ पावा- वया भगवंतांतें । नाना पंथ नाना मतें । तया देवाचें स्वरूप तें । कैसें आहे ॥ ७ ॥ बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी । एक देव कोणेपरी । ठायीं पडेना ॥ ८ ॥ बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना । तो तेथेंचि राहिला मना । सद्ढ करूनी ॥ ९ ॥ बहु देव बहु भक्त । इच्छा झाले आसक्त । बहु ऋषि बहु मत । वेगळाले ॥१०॥ बहु निवडितां निव- डेना । एक निश्चय घडेना । शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठायीं ॥ ११ ॥ बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतामतांसि विरोध । ऐसा करितां विवाद । बहुत गेले ॥१२॥ सहस्रामध्यें कोणी एक । पाहे देवाचा विवेक । परी त्या देवाचें कौतुक । ठायीं न पडे ॥ १३ ॥ ठायीं न पडे ऐसें म्हणतां । तेथेंचि ला- गली अहंता । देव राहिला परता । अहंतागुणे ॥ १४ ॥ आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें । तो देव कोणत्या गुणें । ठायीं पडे ॥१५॥ देव कोणास म्हणावें । कैसें तयास जाणावें । तेंचि बोलणें स्वभावें । बो- लिजेल ॥ १६ ॥ जेणें केलें चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार । सकळकर्ता निरंतर । नाम जयाचें ॥ १७ ॥ जेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृत- कळा । तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥ ज्याची मर्यादा सा- गरा । जेणें १स्थापिलें फणिवरा । जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥ चौरी खाणी चारी वाणी । चौऱ्यायशीं लक्ष जीवयोनी । जेणें निर्मिले लोक तिन्ही । तया नांव देव ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । हे जयाचे अवतार । तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसी ॥ २१ ॥ देव्हारांचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव । तयाचेनि ब्रह्मकटा³व । निर्मिला न वचे ॥२२॥ ठायीं ठायीं देव असती । तिहीं केली नाहीं क्षिती । चंद्र सूर्य तारा जीमूँ४ती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥ सर्वकर्ता तोचि देव । पाहूं जातां निरवयव । ज्याची कळा लीलालाघव । नेणती ब्रह्मादिक ॥२४॥ येथें आशंका उठिली । ती पुढिलीये १. शेषाला पृथ्वी धरण्यास लाविलें. २. उद्भिज, जारज, अंडज आणि स्वेदज अशी चतुर्विध सृष्टि. ३. ब्रह्मांड. ४. मेघ.