दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 224, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८ वा.] सूक्ष्म शंका. १८९ एक म्हणती सर्व ब्रम्ह । हें न कळे ज्यास वर्म । तयाचे अंतरींचा भ्रम । गेलाचि नाहीं ॥ ४० ॥ एक म्हणती एकचि देव । तेथें कैंचें आणिले सर्व । सर्व ब्रम्ह हें अपूर्व । आश्चर्य वाटे ॥ ४१ ॥ एक म्हणती एकचि खरें । तेथें नाहीं दुसरें । सर्व ब्रम्ह येणें प्रकारें । सहजचि जाहलें ॥४२॥ सर्व मिथ्या एकसरें । उरलें तेंचि ब्रम्ह खरें । ऐसीं वाक्यें शस्त्राधारें । बोलती एक ॥ ४३ ॥ अलंकार आणि सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण । आटाआटी व्यर्थ शिण । म्हणती एक ॥४४॥ ही उपमा एकदेशी । कैसी साहेल वस्तूसी । वर्णव्यक्त अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥ सुवर्णीं दृष्टि घालितां । मुळींच आहे व्यक्तता । अलंकार सोनें पाहतां । सोनेंचि असे ॥ ४६ ॥ मुळीं सोनेंचि व्यक्त । जड एकदेशी पीतें । पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवीं घडे ॥ ४७ ॥ दृष्टांत तितुका एकदेशी । देणें लागे कळायासी । सिंधु आणि लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । एका दृष्टांतें कळे स्पष्ट । एका दृष्टांतें नष्ट । संदेह वाटे ॥४९॥ कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चंचळाची सरी । साचाऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥ वोडंबरी हे कल्पना । नासा भास दाखवी जना । येरव्हीं हें जाणा । ब्रम्हचि असे ॥ ५१ ॥ ऐसा वाद एकमेकां । लागतां राहिली आशंका । तेचि आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥५२॥ माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रम्हीं कैसी झाली । म्हणावी ते निर्गुणे केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥ मिथ्या शब्दां कांहींच नाहीं । तेथें केलें कोणं काई । करणें निर्गु- णाचा ठायीं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥ कर्ता ठायांचा अरूप । केलें तेंहि मि- थ्यारूप । तथापि फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे अष्टमदशके आशंकानिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. सूक्ष्म शंका. श्रीगणेशाय नमः ॥ अरे जें झालेंच नाहीं । त्याची वार्ता पुससी काई । तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥ दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग । मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥ कल्पने- १. पिवळें. २. संशय गेला असें वाटतें. ३. गारुड. ४. शंका. ५. सूर्यामुळे.