दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 225, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१९० श्रीदासबोध. [ दशक करितां स्वप्न दिसे । शिंपीकरितां रुपें भासे । जळाकरितां गार वसे । निमिष एक ॥ ३ ॥ मातीकरितां भिंती झाली । सिंधूकरितां लहरी आली । तिळां¹करितां पुतळी² । दिसों लागे ॥ ४ ॥ सोन्याकरितां अलंकार । तंतू- करितां झालें चीर³ । कांसवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥ तूप हात तरी थिजलें । तरीं⁴करितां मीठ झालें । बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥ पृथ्वीकरितां झालें झाड । झाडाकरितां छाया वाढे । धातूकरित⁵ पवाड⁶ । उंच नीच वर्णांचा ॥ ७ ॥ आतां असो हे दृष्टांत । अद्वैतास कैंचें द्वैत । द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥ भासाकरितां भास भासे । दृश्याकरितां दृश्य दिसे । अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरुपम ॥ ९ ॥ कल्पनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत । द्वैतावेगळें अद्वैत । कैसें जाहलें ॥ १० ॥ विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी⁷ । तेणें केली उभारणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥ परमात्मा परमेश्वर । सकळ कर्ता जो ईश्वर । तयापासोनि विस्तार । सकळ जाहला ॥ १२ ॥ ऐसीं अनंत नामें धरी । अनंत शक्ति निर्माण करी । तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥ त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाच आपण । सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥ श्लोक ॥ कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । हें⁸ उघड बोलतां न ये । मोडो पाहतो उपाय । येन्हवीं हें पाहतां काय । सा- च आहे ॥ १५ ॥ देवापासून सकळ झालें । हें सर्वांस मानलें । परी त्या देवास । वोळखिलें पाहिजे कीं ॥ १६ ॥ सिद्धाचें जें निरूपण । तें साधकां न माने जाण । पक्क नाहीं अंतःकरण । म्हणोनियां ॥ १७ ॥ अविद्यागुणें बो- लिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव । मूळमायागुणें देव । बोलिजे तो ॥ १८ ॥ म्हणोनि कारण मूळमाया । अनंत शक्ति धरावया । तेथींचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥ मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश । अनंतनामी जगदीश । तयासीच बोलिजे ॥ २० ॥ अवघी माया विस्तारली । परी हे निःशेष नाथिली । ऐशिया वचनाची खोली । विरळा जाणे ॥ २१ ॥ ऐसें अनिर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे । संतसंगें- १. डोळ्यांतील तीळ, त्यापासून. २. बाहुली. ३. वस्त्र. ४. खाडीपासून. ५. विस्तृत. ६. मोठेपणा. ७. शेषाला. ८. बोलून दाखविण्याजोगी नव्हे.