दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 226, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८ वा. ] सूक्ष्म शंका. १९१ विण नुमजे। कांहीं केल्या ॥ २२ ॥ माया तोचि मूळपुरुष । साधकां न माने हैं निःशेष । परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥ नामरूप मा- येस लागलें । तरी हें बोलणें नटिचि झालें । तेथें श्रोतीं अनुमानिलें । कासया- सी ॥ २४ ॥ आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली । नि- राकारीं कैशी झाली । मूळमाया ॥ २५॥ दृष्टिबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा झाला खेळ । हें अवघें निव्वळ । करुन दाऊं ॥ २६ ॥ आकाश अ- सतां निश्चळ । मध्यें झाला वायु चंचळ । तैसी जाणावी केवळ । मूळमा- या ॥ २७ ॥ रूप वायूचें झालें । तेणें आकाश भंगलें । ऐसें हें सत्य मा- निलें । न वचे कीं कदा ॥ २८ ॥ तैसी मूळमाया झाली । आणि निर्गुणता संचली । येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥ वायु नव्हे पुरा- तन । तैसी मूळमाया जाण । साच म्हणतां पुनः लीन । होत असे ॥ ३० ॥ वायु रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहे । असे परी ते न लाहे । रूप तयाचें ॥ ३१॥ वायु सत्य म्हणों जातां । परी तो न ये दाखवितां । तया- कडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥ तैसी मूळमाया भासे । भासे परी ते न दिसे । पुढें विस्तारली असे । माया अविद्या १ ॥ ३३ ॥ जैसें वायू- चेनि योगें । दृश्य उडे गगनमागें । मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४॥ गगनीं आभाळ नोंथिलें २ । अकस्मात उद्भवलें । मायेचेनि गुणें झालें । तैसें जग ॥ ३५ ॥ नोंथिलेंच गगन नव्हतें । अकस्मात् आलें तेथें । तैसें दृश्य झालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥ परी तया आभाळाकरितां । गगनाची गेली निश्चळता । वाटे परी तें तत्वतां । तैसेंचि आहे ॥ ३७॥ तैसें मायेक- रितां निर्गुण । वाटे झालें सगुण । परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८॥ आभाळ आलें आणि गेलें । तरी गगन तें संचलें । तैसें गुणा नाहीं आलें । नि- र्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥ नभ माथां लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे । तैसें जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥ ३ ऊर्ध्व पाहतां आकाश । नीलिमा ४ दिसे सावकाश । परी तो जाणिजे मिथ्या भास । भासला असे ॥ ४१॥ आ- काश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें । वाटे विश्वास कोंडिलें । परी तें मोकळेंच असे ॥ ४२ ॥ पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला १. अज्ञान. २. नसलेलें. ३. वरतीं. ४. निळा रंग.