दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 223, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८८ श्रीदासबोध. [ दशक ऐसें बोलतां विरूद्ध । दिसोन आलें ॥ २० ॥ सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्या माथां । तरी भक्तांसि उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥ देवेंविण नुसती माया । कोण नेईल विलया । आम्हां भक्तांस सांभाळाया । कोणच नाहीं ॥ २२ ॥ म्हणोनि माया स्वतंत्र । ऐसा न घडे कीं विचार । मायेसि निर्मिता सर्वेश्वर । तो एकचि आहे ॥ २३ ॥ तरी कैसा आहे ईश्वर । मायेचा कैसा विचार । तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । एकाग्र करूनिया मन । आतां कथानु- संधान । सावध एका ॥ २५ ॥ ऐके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अन- भव । तेहि बोलिजती सर्व । यथानुक्रमें ॥ २६ ॥ एक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली । देवास इच्छा नसती झाली । तरी हे माया कैंची ॥ २७ ॥ एक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्छा करी कोण । माया मिथ्या हे आपण । जाहलीच नाहीं ॥ २८ ॥ एक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसि नाहीं म्हणतां कैसें । माया हे अनादि असे । शक्ति ईश्वराची ॥ २९ ॥ एक म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे । साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥ एक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें । भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥ एक म्हणती मिथ्या दिसतें । भय अज्ञानसन्निपातें । साधनऔषध घेइजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥३२॥ अनंत साधनें बोललीं । नाना मतें भांबावलीं । तरी माय ा न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥३३॥ मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं । मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥३४॥ माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली । मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥ जयाचे अंतरीं अज्ञान । नाहीं वोळखिले सज्जन । तयास माया मिथ्या भान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥ जेणें जैसा निश्चय केला । तपास तैसाच फावला । पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥ एक म्हणती माया कैंची । आहे तें सर्व ब्रह्मची । थिजल्या विधुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥ थिजलें आणि विधुरलें । हें स्वरूपीं नाहीं बोलिलें । साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती एक ॥ ३९ ॥ १. अज्ञानरूप सन्निपात ज्वरानें. २. दृष्टांत.