दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 222, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८ वा.] आशंका. १८७ सनातन । तेथें माया मिथ्या भान । विवर्तरूप भासे ॥ २ ॥ श्लोक ॥ आद्यमेकं परं ब्रम्ह नित्यमुक्तमविक्रियम् । तस्य मायासमावेशो जीवमव्या- कृतात्मकम् ॥१॥ टीका ॥ आदि एक परब्रह्म । नित्य मुक्त अक्रिये परम । तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाहली मूळमाया ॥ ३ ॥ एक ब्रम्ह निराकार । मुक्त अक्रिय निर्विकार । तेथें माया वोडंबर । कोठूनि जाहली ॥ ४ ॥ ब्रम्ह अ- खंड निर्गुण । तेथें इच्छा धरी कोण । निर्गुणीं सगुणेविण । इच्छा नाहीं ॥ ५ ॥ मुळीं असेचिना सगुण । म्हणोनि नामें निर्गुण । तेथें झालें सगुण । कोणे परी ॥ ६ ॥ निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें । लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥ एक म्हणती निरवयव । करून अकर्ता तो देव । त्याची लीला बापुडे जीव । काय जाणती ॥ ८ ॥ एक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । प्राणी बापुडा जीवात्मा । काय जाणे ॥ ९ ॥ उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघाच लोपिती । बळेंच निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥ मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करूनि अकर्ता । कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥ जें ठायींचें निर्गुण । तेथें कैंचें कर्तेंपण । तरी हे इच्छा धरी कोण । सृष्टि रचावयाची ॥ १२ ॥ इच्छा परमेश्वराची । ऐसी युक्ति बहुतेकांची । परी त्या निर्गुणास इच्छा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥ तरी हें इतुकें कोणें केलें । किंवा आपणाचि झालें । देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥ देवें- विण झालें सर्व । मग देवास कैंचा ठाव । येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥ देव म्हणों सृष्टिकर्ता । तरी येऊं पाहे सगुणता । निर्गुण- पणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥ देव ठायींचा निर्गुण । तरी सृष्टि- कर्ता कोण । कर्तेंपणाचें सगुण । नाशवंत ॥१७॥ येथें पडिला कीं विचार । कैसें झालें चराचर । माया म्हणों स्वैतंत्र । तरी हें विपरीत दिसे ॥ १८ ॥ माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली । ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥१९॥ देव निर्गुण स्वतःसिद्ध । त्यासि मायेसि काय संबंध । १. भलताच भास होणें म्हणजे विवर्त. २. कर्मरहित. ३. व्याकृत म्हणजे विकार पावलेलीं नव्हे अशी. ४. गारुड. ५. विचार ६. कर्ता म्हटला म्हणजे तो सगुण होतो अर्थात् नाशवंत होतो असा अर्थ. ७. स्वतःच सृष्टि उत्पन्न करणारी.