दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 228, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंभूतें ॥ ६३ ॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ च पाताले यत्किंचित्सचराचरम् ॥ सर्वं तत्पांचभौतिकं षष्ठं किंचिन्न दृश्यते ॥ टीका ॥ सत्यस्वरूप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती । पांचभौतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥ येथें उठली आशंका । सावध होऊन ऐका । पंचभूतें झालीं एका । तमो- गुणापासूनी ॥ ६५ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं । ऐसी आशंका श्रोतीं । घेतली मागां ॥ ६६ ॥ ऐसें श्रोतीं आपेक्षिलें । संशयास उभें केलें । याचें उत्तर दीधलें । पुढिलिये समासीं ॥ ६७ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके सूक्ष्मशंकानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. सूक्ष्म पंचभूतें. श्रीगणेशाय नमः ॥ मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ । वृत्ति करावी निवळ । निमिष एक ॥ १ ॥ ब्रह्मीं मूळमाया झाली । तिच्या पोटीं गुणमाया आली । मग ते गुणास प्रसवली । म्हणोनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥ पुढें तिजपासाव कोण । सत्व रज तमोगुण । तमोगुणापासून नि- र्माण । जाहलीं पंचभूतें ॥ ३ ॥ ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्त्वें विस्तारलीं । एवं तमोगुणापासून झालीं । पंचमहाभूतें ॥ ४ ॥ मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होती । ऐसी आशंका श्रोतीं । घेतली मागें ॥ ५ ॥ आणीक एकएकें भूतीं । पंचभूतें असती । तेहि आतां कैशी स्थिती । प्रांजळ करूं ॥ ६ ॥ सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पांचभौतिक । श्रोतीं विमळ वि- वेक । केला पाहिजे ॥ ७ ॥ आधीं भूतें तों जाणावीं । रूपें कैसीं वोळखावीं । मग तीं शोधून पाहावीं । सूक्ष्म दृष्टी ॥ ८ ॥ वोळखी नाहीं अंतरीं । ते वो- ळखावी कोणे परी । म्हणोनि वोळखी चतुरीं । नावेकें परिसावी ॥ ९ ॥ जें जें जड आणि कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण । मृदु आणि वोलेपण । ति- तुकें आप ॥ १० ॥ जें जें उष्ण आणि सतेज । तें तें जाणावें पैं³ तेज । आतां वायुहि सहज । निरूपिजेल ॥ ११ ॥ चैतन्य आणि चंचळ । तो हा वायुचि केवळ । शून्य अवकाश निर्मळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥ १. त्रिगुणास प्रगट करणारी. २. क्षणमात्र. ३. 'पहा' अशा अर्थीं अव्यय.