भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

३. दशक ११-१५: राजनीति-निरूपण, महन्त-लक्षण, चातुर्य एवं आत्म-निवेदन

८ वा.] दुश्चितलक्षण. २०१ सूर्यकांत सोमकांत । नाना मोहरे सप्रचीत । औषधाकारणें ॥ १५ ॥ यांहि वेगळे पाषाण भले । नाना तीर्थीं जे लागले । वापीकूप सेखीं झाले । हरिहरमूर्ती ॥ १६ ॥ याचा पाहतां विचार । पाषाणाऐसें नाहीं सार । मनुष्य तें काय पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥ तरी तो ऐसा नव्हे पाषाण । जो अपवित्र निष्कारण । तयासारिखा देह जाण । दुश्चित अभक्तांचा ॥ १८ ॥ आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चितपणें । दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥ दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे । दुश्चितपणें स्मरण नसे । क्षणएक पाहतां ॥ २० ॥ दुश्चितपणें शत्रुजिणें । दुश्चितपणें जन्ममरणें । दुश्चितपणाचेनि गुणें । हानि होय । २१ ॥ दुश्चि- तपणें नव्हे साधन । दुश्चितपणें न घडे भजन । दुश्चितपणें नव्हे ज्ञान । साधकासी ॥ २२ ॥ दुश्चितपणें नव्हे निश्चय । दुश्चितपणें न घडे जय । दुश्चितपणें होय क्षय । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥ दुश्चितपणें न घडे श्रवण । दुश्चितपणें न घडे विवरण । दुश्चितपणें निरूपण । हातींचें जाय ॥ २४ ॥ दुश्चितपणें बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे । चंचळचक्रों पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥ वेडें पिशाच निरंतर । अंध मुकें आणि बधिर । तैसा जाणावा संसार । दुश्चित प्राण्यांचा ॥ २६ ॥ सावध असोनि उमजेना । श्रवण असोन ऐकेना । ज्ञान असोन कळेना । सारासार विचार ॥ २७ ॥ ऐसा जो दुश्चित आळशी । परलोक कैंचा त्यासी । जयाचे जीवीं अहर्निशीं । आळस वसे ॥ २८ ॥ दुश्चितपणापासून सुटला । तरी तो सर्वैचि आळस आला । आळसाहातीं आणियाला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥ आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार । आळसें नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥ ३० ॥ आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण । आळसें परमार्थाची खूण । मलिन जाहली ॥ ३१ ॥ आळसें नित्यनेम राहिला । आ- ळसें अभ्यास बुडाला । आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥ आ- ळसें गेली धारणा ४ धृति ५ । आळसें मलिन झाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाहली ॥ ३३ ॥ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना वि- स्तारली । आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥ ३४ ॥ दुश्चित १. औषधी मणी. २. आड, विहीर. ३. शत्रूनें जिंकणें. ४. चित्तैक्य. ५. धैर्य.

२०२ श्रीदासबोध. [ दशक पणासवें आळस । आळसें निद्राविलास । निद्राविलासें केवळ नाश । आ- युष्याचा ॥ ३५ ॥ निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणें- करितां निरूपण । उमजेचि ना ॥ ३६ ॥ हीं तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥ क्षुधा ला- गतांच जेविला । जेवून उठतां आळस आला । आळस येतांच निजला । सावकाश ॥ ३८ ॥ निजोन उठतांच दुश्चित । कदा नाहीं सावचित । तेथें कैंचें आत्महित । निरूपणीं ॥ ३९ ॥ मर्कटापाशीं दिलें रत्न । पिशाचा- हातीं निधान । दुश्चितापुढें निरूपण । तयापरी होय ॥ ४० ॥ आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती । किती दिवसां होते मुक्ती । सज्जनाचे- नि संगें ॥ ४१ ॥ ऐका याचें प्रत्युत्तर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥ लोह परिसासि लागला । थेंबुटा सागरीं मि- ळाला । गंगेसरिते संगम झाला । तत्क्षणींचें ॥ ४३ ॥ सावध साक्षेपी आणि दक्ष । तयास तात्काळचि मोक्ष । इतरांसि तें अलक्ष । लक्षिलें न वचे ॥ ४४ ॥ येथें शिष्यप्रज्ञाचि केवळ । प्रज्ञावंता नलगे वेळ । अनन्यास त- त्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥ प्रज्ञावंत आणि अनन्य । तयास नलगे एक क्षण । अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥ प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु नाकळे । प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥ देहा- भिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती । सत्संगें होय सद्गती । विलंबचि नाहीं ॥ ४८ ॥ सावध साक्षेपी आणि दक्ष । प्रज्ञावंत आणि विश्वास । त- यास समाधानीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥ इतर भाविक साबडें । तयास साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उघडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥ परी तें साधन मोडूं नये । निरूपणाच्या उपायें । निरूपणें न लाये सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥ आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरूपाची दशा । त्याचे प्राप्तीचा भरंवसा । सत्संगें केवीं ॥ ५२ ॥ ऐसें निरूपण प्रांजळ । पुढें बो- लिलें असे सकळ । श्रोतीं होवोनियां निश्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥ अवगुण त्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें । श्रोतीं कोप न धरणें । १. रत्न. २. गंगा व एकादी नदी यांचा. ३. तत्काळ एकरूप होतात. ४. उद्योगी. ५. प्रज्ञा. ६. शिष्याच्या बुद्धीची कुशाग्रता. ७. एकनिष्ठ असणारास.

८ वा.] मोक्षलक्षण. २०३ ऐंसिया वचनाचा ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके दुश्चितलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. मोक्षलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोत्यांचा पक्ष । किती दिवसां होतो मोक्ष । तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १॥ मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष को- णास म्हणावें । सत्संगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥ तरी बद्ध म्हणिजे तो बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा झाला । तो संतसंगें कैसा ला- धला । तेंहि ऐका ॥ ३ ॥ प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध झाला । तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥ मी जीव ऐसा संकल्प । दृढ ध- रितां गेले कल्प । तेणें प्राणी झाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥ मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण । केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥ पापाचें फळ तें दुःख । आणि पुण्याचे फळ तें सुख । पाप- पुण्य आवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥ पापपुण्यभोग सुटेना । आणि गर्भ- वासहि तुटेना । ऐसी जयाची कल्पना । दृढ जाहली ॥ ८ ॥ तया नांव बांधला । जीवपणें बद्ध झाला । जैसा स्वयें बांधोनि कोसला । मृत्यु पावे ॥ ९ ॥ तैसा प्राणी तो अज्ञान । नेणे भगवंताचें ज्ञान । म्हणे माझें जन्म- मरण । सुटेचि ना ॥ १० ॥ आतां कांहीं दान करूं । पुढिलिया जन्मास आधारु । तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥ पूर्वी दान नाहीं केलें । म्हणोनि दरिद्र प्राप्त झालें । आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥ म्हणोनि दिलें वस्त्र जुनें । आणि एक ताम्र नाणें । म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥ कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी । आशा धरिली अभ्यंतरीं । कोटिगुणाची ॥ १४ ॥ रुका अडका दान केला । अतीतास तुकडा घातला । म्हणे माझा ढीग झाला । कोटि तुक- ड्यांचा ॥ १५ ॥ तो मी खाईन पुढिले जन्मीं । ऐसें कल्पी अंतर्यामीं । वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणियाची ॥ १६ ॥ आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन । ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥ बहुतां जन्मांचे अंतीं । होय नरदेहाची प्राप्ती । येथें न होतां

२०४ श्रीदासबोध. [दशक

ज्ञानसद्गती । गर्भवास चुकेना ॥ १८ ॥ गर्भवास नरदेहींच घडे । ऐसें हें सर्वथा न घडे । अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥ ऐसा निश्चय शास्त्रांतरीं । बहुतों केला बहुतां परी । नरदेह संसारीं । परम दुर्लभ अस ॥ २० ॥ पाप पुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे । येरव्ही जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥ श्लोक ॥ नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥ मयाऽनुकूलेन नभस्व- तेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ १ ॥ टीका ॥ नरदेह परम दुर्ल- भ । अल्प संकल्पाचा लाभ । गुरु कैर्णधार स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥ देव अनुकूल नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणिया । भवाब्धि न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥ ज्ञानेंविण प्राणियासी । जन्ममृत्यु लक्ष चौ- न्याशी । तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोनि आत्महत्यारा ॥ २४ ॥ नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण । भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥ रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ हंसा खर । काक कुक्कुट जंबूक मार्जार । सरडे बेडुक मक्षिका ॥ २६ ॥ इत्यादिक नीच योनी । ज्ञान नसतां भोगणें जनीं । आशा धरी मूर्ख प्राणी । पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥ हा नरदेह पडतां । तोचि पाविजे मागुता । ऐसा विश्वास ध- रित्तां । लाज नाहीं ॥ २८ ॥ कोण पुण्याचा संग्रहों । जे पाविजे नरदेहो । दुराशा धरिली पहा हो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥ ऐसे मूर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन । शत्रु आपणास आपण । होऊनि ठेले ॥ ३० ॥ श्लोक ॥ आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ऐसें संकल्पाचें बंधन । संतसंगें तुटे जाण । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥ पांचां भूतांचें शरीर । निर्माण झालें चराचर । प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों लागे ॥ ३२ ॥ देहीं अवस्था अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण । शक्ति आदिकरूनि लक्षण । चौपुटी तत्त्वांची ॥ ३३ ॥ ऐसी पिंडब्रह्मांडरचना । विस्तारें वाढली कल्पना । निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥


टिपा (Footnotes):

१. नावाडी. २. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति. ३. विश्व, तैजस आणि प्राज्ञ; मी आहें असा समज. ४. नेत्र, कंठ आणि हृदय. ५. स्थूल, प्रविविक्त आणि आनंद. ६ पृथ्व्यादि सूक्ष्म भूतें. ७. सत्व, रज आणि तम. ८. माया. ९. सांगड.

८ वा.] · मोक्षलक्षण. २०५ नाना मतें नाना भेद । भेदें वाढती विवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥ तया संवादाचें लक्षण । पांचभौतिक देह जाण । तया देहामध्यें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥ देह अंतीं नासोनि जाय । त्यास आत्मा म्हणों नये । नाना तत्वाचे समुदाय । देहामध्यें आले ॥३७॥ अंतःकरण १प्राणादिक । विषय २ इंद्रियदशक ३ । हा सूक्ष्माचा ४ विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥ घेतां सूक्ष्माची शुद्धी ५ । भिन्न अंतःकरण मन बुद्धी । नाना तत्वांची उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥ स्थूल सूक्ष्म कारण । महाकारण विराट हिरण्य । अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ॥ ४० ॥ चारी पिंडीं चारी ब्रम्हांडीं । ऐसी अष्टदेहांची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दश देह बोलिजे ॥ ४१ ॥ ऐसें तत्वांचें लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण । कार्य कर्ता कारण । दृश्य तयाचें ॥ ४२ ॥ जीव शिव पिंड ब्रम्हांड । माया अ- विद्येचें बंड । हें सांगतां असे उदंड । परी तो आत्मा वेगळा ॥ ४३ ॥ पाहों जातां आत्मे चारी । त्यांचें लक्षण अवधारीं । हें जाणोनी अभ्यंतरीं । सुदृढ धरावें ॥ ४४ ॥ एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा । चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे चारी आत्मे ॥ ४५ ॥ भेदें उंच नीच भासती । परी चारी एकचि असती । येविषयीं दृष्टांत संमती । सावध ऐका ॥ ४६ ॥ घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश । अ- वघें मिळोन आकाश । एकचि असे ॥ ४७ ॥ तैसा जीवात्मा आणि शि- वात्मा । परमात्मा आंणि निर्मळात्मा । अवघा मिळोन आत्मा । एकचि असे ॥ ४८ ॥ घटीं व्यापक जें आकाश । तया नांव घटाकाश । पिंडीं व्यापक जो ब्रम्हांश । त्यासि जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥ मठीं व्यापक जें आकाश । तया नांव मठाकाश । तैसा ब्रम्हांडीं जो ब्रम्हांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥ मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश । ब्रम्हांडाबाहेरील जो ब्रम्हांश । त्यासि परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥ उपाधीवेगळें आकाश । तया नांव चिदाकाश । तैसा निर्मळात्मा परेश । उपाधीवेगळा ॥ ५२ ॥ उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आ- १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. २. शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध. ३. पांच ज्ञानेंद्रियें व पांच कर्मेंद्रियें. ४. लिंगदेहाचा. ५. शोध.

२०६ श्रीदासबोध. [ दशक काश अभिन्न । तैसा आत्मा स्वानंदघन । एकचि असे ॥ ५३ ॥ दृश्यासेबाह्य¹ अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं । त्याची वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥ ऐसें आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधि शो- धितां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥ जीवपण एकदेशीं । अहंकारें जन्म सोसी । विवेक पहतां प्राणियांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥ जन्ममृत्यूपासून सुटला । या नांव जाणिजे मोक्ष झाला । तत्व शोधितां पावला । तत्ववस्तु ॥ ५७ ॥ तेचि वस्तु ते आपण । हें महावाक्याचें लक्षण । साधु करिती निरूपण । आपले- नि सुखें ॥ ५८ ॥ जेचि क्षणीं अनुग्रहें² केला । तेचि क्षणीं मोक्ष झाला । बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥ आतां आशंका फिटली । संदेहवृत्ति मावळली । संतसंगें तात्काळ झाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥ स्वप्ना- मध्यें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । ज्ञानविवेकें प्राणियाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥ अज्ञान निशीच्या³ अंतरीं । संकल्पःदुखें नासती । तेणें गुणें होय प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥ तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन । तयास प्रयत्न जागृतीविण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥ तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणीक नाहीं उपाव । विवेक पाहतां वाव । बंधन होय ॥ ६४ ॥ विवेक पाहिल्याविण । जो जो उपाय तो तो शिण । विवेक पाहतां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥ आत्मयाच्या ठायीं कांहीं । बंध मोक्ष दोन्ही नाहीं । जन्ममृत्यु हें सर्वही । आत्मस्वरूपीं न घडे ॥ ६६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके मोक्षलक्षणनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. आत्मनिदर्शन. श्रीगणेशाय नमः ॥ मागां झालें निरूपण । परमात्मा तोचि तूं जाण । तया परमात्म्याचें लक्षण । तें हैं ऐसें असे ॥ १ ॥ जन्म नाहीं मृत्यु नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं । बंध मोक्ष दोन्ही नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥ परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार । परमात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥ परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं १. जगताचे आंत बाहेर. २. कृपा किंवा उपदेश. ३. रात्रीच्या.

८ वा.] आत्मनिवेदन. २०७ एक । परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥ ऐसी परमात्मयाची स्थिति । बोलताती वेदश्रुती । परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाहीं ॥ ५ ॥ तये भक्तींचें लक्षण । भक्ति नवविधा भजन । नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाहले ॥ ६ ॥ तये नवविधेमध्यें सार । आत्मनिवेदन थोर । तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥ आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें । आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥ महापू- जेच्या अंतीं । देवास मस्तक वाहती । तैसी आहे निकटभक्ती । आत्म- निवेदनाची ॥ ९ ॥ आपणास निवेदीती । ऐसे भक्त थोडे असती । तयांस परमात्मा मुक्ती । तात्काळ देतो ॥ १० ॥ आपणास कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें । किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें । श्रोतीं सावधान होणें । एकाग्रचित्तें ॥ १२ ॥ आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा नि- र्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥ देवा भक्तांचें शोधन । करितां होतें आत्म- निवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ देवास ओळखों जातां । तेथें झाली तद्रूपता । देवभक्तांची विभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥ विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त । अयुक्त¹ नाहीं बो- लणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥ देवा भक्तांचें पाहतां मूळ । होय भेदांचें निर्मूळ । एक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं । देव भक्त हे कडसेंणी² । निरसोनि गेली ॥ १८ ॥ आत्मनिवेदनाच्या अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती । तये नांव सायुज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥ जो संतासि शरण गेला । अद्वैत- निरूपणें बोधला । मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥ नदी मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोह³ सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥ तैसा भगवंतीं मिळाला । तो न वचे वेगळा केला । देव आपण भक्त झाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥ देव भक्त दोन्ही एक । ऐसें ज्ञान जया निश्चयात्मक । साधुजनीं मोक्षदायक । तोचि जाणावा ॥ २३ ॥ आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें । तेणें त्याचें ऐश्वर्य १. अयोग्य. २. गुंता. ३. लोखंड.

२०८ श्रीदासबोध. [ दशक बाणे । तत्काळ अंगीं ॥ २४ ॥ देहचि होऊनि राहिजे । तेणें देहदुःख साहिजे । देहातीतं होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥ देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें । ऐश्वर्याचीं लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥ ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । याचें उत्तर काय बोलिलें । तोंचि आतां निरूपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥ देहातीत वस्तु आहे । ते तूं परब्रह्म पाहे । देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥ ज्याची बुद्धि ऐसी । वेद वर्णिती तयासी । शोधितां नानाशास्त्रांसी । न पडे ठायीं ॥ २९ ॥ ऐश्वर्य ऐसें तत्त्वतां । बाणे देहबुद्धि सोडितां । देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥ या कारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण । मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥ साधुवचन तें कैसें । काय धरावें विश्वासें । एक वेळ स्वामी ऐसें । मज निरूपावें ॥ ३२ ॥ सोहं२ आत्मा स्वानंदघन । अजन्मा३ तो तूंचि जान । हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥ महावाक्यांचें४ अंतरें । तूंचि ब्रह्म निरंतर । ऐशिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥ देहास होईल अंत । मग मी पावेन अनंत । ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥ एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं । मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥ मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईल अंत । ते काळीं पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥ हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान । समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥ सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥ माया असो- नचि नाहीं । देह असतांच विदेही६ । ऐसें समाधान कांहीं । वोळ- खावें ॥ ४० ॥ ५ राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें । परिवार देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥ प्राप्त झालिया आत्म- ज्ञान । तैसें दृश्य देहभान । दृष्टी पडतां समाधान । जाणार नाहीं ॥४२॥ मार्गी मुळीं सर्पाकार । देखतां भय आलें थोर । कळतां तेथींचा विचार । मग मारणें काय ॥ ४३ ॥ तैसी माया भयानक । विचार पाहतां मायिक । १. देहाशीं संबंध. २. तो देव मी. ३. जन्मरहित ईश्वर. ४. तत्वमस्यादि महा- वाक्यांचा मथितार्थ. ५. ब्रह्म. ६. देहावेगळा.

मग तयेचा धाक । कासया धरावा ॥ ४४ ॥ देखतां मृगजळाचा पूर । म्हणे कैसा जाऊं पैलपार । कळतां तेथींचा विचार । मग सांकडें कैंचें ॥ ४५ ॥ देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक । जागृति झालिया साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥ तथापि माया कल्पनेसि दिसे । आपण कल्पनातीत असे । तेथें उद्वेग कायसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ अंतीं मति तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती । तुझ्या अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि झा- ली ॥ ४८ ॥ चौदेहांचा अंत । आणि जन्ममूळाचा प्रांत । अंता प्रांतासि अलिप्त । तो तूं आत्मा ॥ ४९ ॥ जयास ऐशी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती । गती आणि अवगती- । वेगळाचि तूं ॥ ५० ॥ मति खुंटली देवांची । तेथें गति आणि अवगति कैंची । आत्मशास्त्रगुरुप्रचीतीची । ऐ- क्यता आली ॥ ५१ ॥ जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्म- प्रचीतीं । प्राणी पावला उत्तम गती । सद्गुरुबोधें ॥ ५२ ॥ सद्गुरुबोध जेव्हां झाला । चौदेहांस अंत आला । तेणें निजध्यास लागला । स्वस्वरूपीं ॥ ५३ ॥ तेणें निजध्यासें प्राणी । ध्येयचि झाला निर्धारीं । सायुज्यमुक्तीचा धनी । होऊनि बैसला ॥ ५४ ॥ दृश्य पदार्थ वोसरतां । अवघा आत्माचि तत्त्वतां । नेहटून विचारें पाहतां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥ मिथ्या मि- थ्यात्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें । श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या नांव मोक्ष ॥ ५६ ॥ सद्गुरुवचन हृदयीं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी । श्रवण मनन केलेंच करी । अत्यादरें ॥ ५७ ॥ जेथें आटती दोन्ही पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष । या नांव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥ तेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे । केवळ ज्ञप्तिमात्र उरे । सूक्ष्मब्रह्म ॥ ५९ ॥ भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन तुटलें । अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासूनी ॥ ६० ॥ निःसंगाची संगव्याधी । विदेहा- ची देहबुद्धी । विवेकें तोडिली उपाधी । निष्प्रपंचाची ॥ ६१ ॥ अद्वैताचें तोडिलें द्वैत । एकांतासी दिधला एकांत । अनंतास दिधला अंत । अनं- ताचा ॥ ६२ ॥ जागृतीस चेवविलें । चेइल्यास सावध केलें । निजबोधा- १. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण यांचा. २. संबंध. ३. दुर्गति. ४. अखेरीस. ५. मिथ्या झाला असतां. ६. स्वपरभाव. ७. ज्ञानस्वरूप.

२१० श्रीदासबोध. [ दशक सि प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥ अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्ती- चें घर । संयोगास निरंतर । योग केला ॥ ६४ ॥ निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक झालें । बहुतां दिवसां भेटलें । आपणास आपण ॥ ६५ ॥ तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा । भूतपंचकाची बाधा । निर- सोनि गेली ॥ ६६ ॥ झालें साधनांचें फळ । निश्चळास केलें निश्चळ । नि- र्मळाचा गेला मळ । विवेकबळें ॥ ६७ ॥ होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त झालें । आपणा देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥ दुःस्वप्नें जाजा- वला । ब्राह्मण नीचयाती झाला । आपणासि आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥ ऐसें जयास झालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टम- दशके आत्मनिदर्शननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. सिद्धलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ अंतरीं गेलिया अमृत । बाहेरी काया लखलखित । अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसी ॥ १ ॥ झालें आत्मज्ञान बरवें । हें कैसेनि पां जाणावें । म्हणोनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥ ऐका सिद्धाचें लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण । तेथें पाहतां वेगळेपण । मुळींच नाहीं ॥ ३ ॥ स्वरूप होऊनि राहिजे । तया नांव सिद्ध बोलिजे । सिद्धस्वरूपीं¹चें साजे । सिद्धपण ॥ ४ ॥ वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । तयासीच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥ तथापि बोलों कांहींएक । साधका कळावया विवेक । सिद्धलक्षणांचें कौतुक । तें हें ऐसें असे ॥ ६ ॥ अंतर²स्थिति स्वरूप झाली । पुढें काया कैसी वर्तली । जैसी स्वर्मींची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥ तथापि सिद्धाचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । जेणें बाणे अंतरखूण । परमार्थाची ॥ ८ ॥ सदा स्वरूपानु³संधान । हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोनि आपण । जनां- वेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टि पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लाग- ली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाअंगीं १. स्वतःसिद्ध ब्रह्मस्वरूपीं. २. अंतःकरणाची वृत्ति. ३. आत्मस्वरूपाचें चिंतन.

असे जाण । सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥ बाह्य साध- काचे परी । आणि स्वरूपाकार अंतरीं । सिद्धलक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐ- सें ॥ १२ ॥ संदेहरहित साधन । तेंचि सिद्धाचें लक्षण । अंतर्बाह्य समाधा- न । चलेना ऐसें ॥ १३ ॥ अचल झाली अंतरस्थिती । तेथें चळणास कैंची गती । स्वरूपीं लागतां वृत्ती । स्वरूपचि जाहली ॥ १४ ॥ मग तो चळ- तांच अचल । चंपळपणें निश्चळ । निश्चळ असोनि चंचल । देह त्याचा ॥ १५ स्वरूपीं स्वरूपचि झाला । मग तो पडोनीच राहिला । अथवा उ- ठोन पळाला । तरी तो चलेना ॥ १६ ॥ येथें कारण अंतरस्थिती । अंतरींच पाहिजे निवृत्ती । अंतर लागलें भगवंतीं । तोचि साधु ॥ १७ ॥ बाह्य भलतैसें असावें । परी अंतर स्वरूपीं लागावें । मग लक्षणें दिसती स्वभावें । साधूअंगीं ॥ १८ ॥ राज्यीं बसतां अवलीळा । अंगीं बाणे राजकळा ।

२१२ श्रीदासबोध. [ दशक आरंभ । जाहलाचि नाहीं ॥ ३१ ॥ जेणें दृश्य केलें विसंचें । तयास कैंचा होय प्रपंच । या कारणें निष्प्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥ अवघें ब्रह्मांड त्याचें घर । पांचभौतिक हा जोजार । मिथ्या जाणोनि सत्वर । त्याग केला ॥ ३३ ॥ या कारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे । जयाची वासना समरसे । शुद्ध स्वरूपीं ॥ ३४ ॥ आपला आपण आघवा । शोक कोणाचा करावा । म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥ दृश्य सांडूनि नाशवंत । स्वरूप सेविलें शाश्वत । या कारणें शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६ ॥ शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते झाली निवृत्ती । म्हणोनि साधु आदिअंतीं । शोकरहित ॥ ३७ ॥ मोहें झळंबावें मन । तरी तें मनचि झालें उन्मन । या कारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ साधु वस्तु अद्वय । तेथें कैंचें वाटेल भय । परब्रह्म तें निर्भय । तोचि साधु ॥ ३९ ॥ या कारणें भयातीत । साधु निर्भय निवांत । सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥ सत्यस्वरूपीं अमर झाला । भय कैंचें वाटेल त्याला । या कारणें साधुजनाला । भयचि नाहीं ॥ ४१ ॥ जेथें नाहीं द्वैतभेद । आपला आपण अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ बुद्धीनें निर्मिलें नि- र्गुणा । त्यास कोणीच नेईना । या कारणें साधूजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥ साधु आपण एक । तेथें कैंचा दुःख शोक । दुजेंविण अविवेक । येणार नाहीं ४४ ॥ आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची । म्ह- णोनि नैराश्यता साधूची । ओळखावी ॥ ४५ ॥ मृदुपणें जैसें गगन । तैसें साधूचें लक्षण । या कारणें साधुवचन । कठिण नाहीं ॥ ४६ ॥ स्वरूपाच्या संयोगीं । स्वरूपचि झाला योगी । या कारणें वीतरागी । निरंतर ॥ ४७ ॥ स्थिति बाणतां स्वरूपाची । चिंता सोडिली देहाची । या कारणें होणाराची । चिंता नाहीं ॥ ४८ ॥ स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी । या का- रणें निरुपाधी । साधुजन ॥ ४९ ॥ साधु स्वरूपींच राहे । तेथें संगाचि न साहे । म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५० ॥ अलक्षास लावि- ती लक्ष । म्हणोन साधु परम दक्ष । वोहूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५१ ॥ स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ । साधु स्वरूप- १. अदृश्य. २. एकरस होतें. ३. कल्पनारहित. ४. आसक्तिशून्य. ५. कैवार.

८ वा. ] शून्यत्वनिरसन. २१३ चि केवळ । म्हणोनियां ॥ ५२ ॥ सकळ धर्मांमध्यें धर्म । स्वरूपीं¹ राहणें हा स्वधर्म । हेंचि जाणिजे मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५३ ॥ धरितां साधू- ची संगती । आपैसीच लागे स्वरूपस्थिती । स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें अंगीं ॥ ५४॥ ऐसीं साधूचीं लक्षणें । अंगीं बाणती निरूपणें । परंतु स्वरूपीं राहणें । निरंतर ॥५५॥ निरंतर स्वरूपीं राहतां । स्वरूपाचि होइजे तत्वतां । मग लक्षणें अंगीं बाणतां । वेळ नाहीं ॥ ५६ ॥ स्वरूपीं राहिल्या मती । अवगुण अवघेच सांडती । परंतु यासि सत्संगती । निरूपण पाहिजे ॥ ५७ ॥ सकळ सृष्टीच्या ठाईं । अनुभव एकचि नाहीं । तो बोलिजेल सर्वही । पुढि- ले समासीं ॥ ५८ ॥ कोणे स्थितीनें राहती । कैसा अनुभव पहाती । राम- दास म्हणे श्रोतीं । अवधान द्यावें ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे अष्टमदशके सिद्धलक्षणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. शून्यत्वनिरसन· श्रीगणेशाय नमः ॥ जगाचे अनुभव पुसतां । कलह उठला अवचिता । हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥ एक म्हणती हा संसारु । करितां पाविजे पैलपारु । आपुला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥ एक म्हणती हें न घडे । लोभ येऊनि अंगीं जडे । पोटास्तव करणें पडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥ एक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखेनैव² । कांहीं दान पुण्य करावें । सद्गतीकारणें ॥ ४ ॥ एक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा । तेणें स्वर्गांच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥ एक म्हणती कोठें जावें । उगेंच कासया हिंडावें । आपुले आश्रमीं असावें । आश्रमधर्म करुनी ॥ ६ ॥ एक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म । ये संसारीं नाना कर्मे । करणें लागे ॥ ७ ॥ एक म्हणती बहुतां परी । वासना असावी वरी । येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥ एक म्हणती कारण भाव³ । भावेंचि पाहिजे देव । येर हें अवघेंच वाव । गाथागोवी ॥ ९ ॥ एक म्हणती वाडिलें जीवीं⁴ । अवघीं देवचि मानावीं । मायबापें पूजीत जावीं । एकभावें ॥ १० ॥ एक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें १. स्वरूपाचे चिंतनांत. २. सुखेनैव. ३. भक्ति. ४. अंतःकरणांतून.

२१४ श्रीदासबोध. [ दशक करावें पूजन । मायबाप नारायण । विश्वजनाचा ॥ ११ ॥ एक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरूपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥ एक म्हणती अहो जना । शास्त्र पाहतां पुरवेना । या कारणें साधु- जना । शरण जावें ॥ १३ ॥ एक म्हणती सांडा गोष्टी । वायांचि करितां चौवटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥ एक म्हणती एकचि बरवें । आपुले आचारें असावें । अंतकाळीं नाम घ्यावें । देवाचें ॥१५॥ एक म्हणती पुण्य असेल । तरीच वाचे नाम येईल । नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥ एक म्हणती जींत असावें । तंवचि सार्थक करावें । एक म्हणती फिरावें । तीर्थाटन ॥ १७ ॥ एक म्हणती हे अटाटी । पाणी- पाषाणाची भेटी । बुचकळ्या मारितां हिंपुटी । कासया व्हावें ॥ १८ ॥ एक म्हणती सांडा वाचाळी¹ । अगाध महिमा भूमंडळीं । दर्शनमात्रें होय होळी । महापातकांची ॥१९॥ एक म्हणती तीर्थ² स्वभावें । कारण मनचि असावें । एक म्हणती कीर्तन करावें । सावकाश ॥ २० ॥ एक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा । देह अमरचि करावा । अकस्मात⁴ ॥ २१ ॥ एक म्हणती ऐसें काय । काळवंचना³ करूं नये । एक म्हणती धरावी सोय । भक्तिमार्गाची ॥२२॥ एक म्हणती ज्ञान बरवें । एक म्हणती साधन करावें । एक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥ एक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा । एक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥ एक म्हणती हें विशेष । करूं नये निंदा द्वेष । एक म्हणती साव- काश । दुष्टसंग त्यागावा ॥२५॥ एक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखचि मरावें । तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥ एक म्हणती सांडा गोष्टी । आधीं पाहिजे ते रोटी । मग करावी चावटी । सावकाश ॥ २७ ॥ एक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा । कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥ एक म्हणती तपोनिधी⁵ । होतां वोळती सकळ सिद्धी । एक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥२९॥ एक म्हणती आर्गम⁶ पाहावा । वेताळ प्रसन्न करून घ्यावा । तेणें पाविजे देवा । स्वयं- १. बडबड. २. तीर्थासारखें शुद्ध. ३. मृत्यूस फसविणें, देह अमर करणें. ४. अतिशय. ५. महा तपस्वी. ६. मंत्रशास्त्र.

लोकीं ॥ ३० ॥ एक म्हणती अघोरमंत्र । तेणें होइजे स्वतंत्र । श्रीहरी- चें कलत्र¹ । तेंचि वोले ॥ ३१ ॥ तिज लागले सर्व अधर्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । एक म्हणती कुकर्म । तिच्या मदें ॥ ३२ ॥ एक म्हणती एक साक्षेप । करावा मृत्युंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प² । सिद्धीतें पावती ॥ ३३॥ एक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । एक म्हणती झोटिंग सर्व । पुरवितसे ॥ ३४ ॥ एक म्हणती काळी³ । एक म्हणती भद्रकाळी । एक म्हणती उच्छिष्ट चांडाळी⁴ । साद्य करावी ॥ ३५ ॥ एक म्हणती विघ्न- हर । एक म्हणती भोळा शंकर । एक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥३६॥ एक म्हणती मल्हारी । सत्वरचि सभाग्‍य करी । एक म्हणती महा बरी । भक्ति व्यंकटेशाची ॥ ३७ ॥ एक म्हणती पूर्वठेवा⁵ । एक म्हणती प्रयत्न करावा । एक म्हणती भार घालावा । देवावरी ॥३८॥ एक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहतो भल्यांचा । एक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥३९॥ एक आश्चर्य मानिती । एक विस्मय करिती । एक कंटाळोन म्हणती । काय होईल तें पाहावें ॥ ४० ॥ ऐसे प्रापंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ! प- परंतु कांहींएक चिन्ह । अल्पमात्र बोलिलें ॥ ४१ ॥ आतां असो हा स्वभाव । ज्ञात्याचा कैसा अनुभव । तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥ एक म्हणती करावी भक्ती । श्रीहरि देईल सद्गती । एक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेचि होय ॥ ४३ ॥ एक म्हणती भोग सुटेना । जन्ममरण हें तुटेना । एक म्हणती ऊर्मी⁶ नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥ एक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म । एक म्हणती हा अधर्म । बोलोंच नये ॥४५॥ एक म्ह- णती सर्व नासे । उरलें तेंचि ब्रह्म असे । एक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥४६॥ सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म । दोन्ही पूर्वपक्षांचे⁷ भ्रम । अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती एक ॥ ४७ ॥ एक म्हणती हें न घडे । अनिर्वाच्य⁸ वस्तु न जोडे । जे बोलतां मौन पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥ तंव श्रोता अनुवादला । ह्याणे निश्चय कोण केला । सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥ अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें । आतां कांहींएक केलें । न


१. स्त्री, लक्ष्मी. २. मनोरथ. ३. महाकाळी. ४. एक देवी. ५. नशीब. ६. कल्पनां. ७. खोट्या विचाराचे. ८. बोलून दाखवितां येत नाहीं अशी.

२१६ श्रीदासबोध. [ दशक वचे कीं ॥ ५० ॥ एक साक्षित्त्वें वर्तती । साक्षी वेगळाचि ह्मणती । आ- पण द्रष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥ दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा । आपण साक्षित्त्वें निराळा । स्वानुभवें ॥ ५२ ॥ सकळ पदार्थ जाणता । तो पदार्थांहूनि परता । देहीं असोनि अलिप्तता । सहजाचि जाहली ॥ ५३ ॥ एक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षित्त्वें वर्तावें । दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥ एक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठायींचीच अभेद । तेथें कैचा मतिमंद । द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥ अ- वघी साखरचि स्वभावें । तेथें कडू काय निवडावें । द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥ प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद । परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥ विघरलें तूप थिजलें । तैसें निर्गु- णचि गुणा आलें । तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥ म्हणोनि द्रष्टा आणि दृश्य । अवघा एकचि जगदीश । द्रष्टेपणाचा सायास । कासयासी ॥ ५९ ॥ ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा एकाचा अनुभव । ऐसे हे दोन्ही स्व- भाव । निरूपिले ॥ ६० ॥ अवघा आत्मा आकारला । आपण भिन्न कैंचा उरला । दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥ ऐक तिसरा अनु- भव । प्रपंच सारूनियां सर्व । कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें ह्मणती ॥६२॥ दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें । तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती एक ॥ ६३ ॥ परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाय । शून्यत्वास ब्रह्म काय । म्हणों येईल ॥ ६४ ॥ दृश्य अवघें वोलांडिलें । अ- दृश्य शून्यत्वीं पडिलें । ब्रह्म म्हणोनि मुराडिलें । तेथूनचि मागें ॥६५॥ इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें शून्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म ह्मणे ॥ ६६ ॥ रायासि नाहीं वोळखिलें । सेवकास राव ऐसें कल्पिलें । परी तें अवघें व्यर्थ गेलें । राजा देखतां ॥६७॥ तैसें शून्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म । शून्यत्वाचा अवघा भ्रम । तुटोनि गेला ॥ ६८ ॥ परी हा सूक्ष्म अडथळा । वारी विवेकें वेगळा । जैसें दुग्ध घेऊनि जळां । राज- हंस सांडिती ॥ ६९ ॥ आधीं दृश्य हें सोडिलें । मग शून्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७० ॥ वेगळेपणें पाहणें घडे । तेणें वृत्ति शून्यत्वीं पडे । पोटीं संदेह पवाडे । शून्यत्वाचे ॥ ७१ ॥ भिन्नपणें अनुभ-

९ वा. ] आशंका. २१७ विलें । तयास शून्यत्व ऐसें बोलिलें । वस्तुप¹क्षीं अभिन्न झालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥ वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तूचें पाहणें । निश्चयेंसि भि- न्नपणें । शून्यत्व लाभे ॥ ७३ ॥ या कारणें शून्यत्व कांहीं । परब्रम्ह होणार नाहीं । वस्तुस्वरूप होऊनि पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥ आपण वस्तु सि- द्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये । साधु सांगती उपाय । तूं चि आत्मा ॥ ७५ ॥ मन मी ऐसें नों²थिलें । संतीं नाहीं निरूपिलें । मानावें कोणा- च्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥ संतवचनीं ठेवितां भाव । तोचि शुद्ध स्वानुभव । मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥ जयाचा घ्या- वा अनुभव । तोचि आपण निरवय³व । आपुला घेती अनुभव । विश्व- जन ॥ ७८ ॥ लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि झाले । मग ते भाग्य पुरुषीं भोगिले । सावकाश ॥ ७९ ॥ तैसें देहबुद्धि सोडितां । साध- कास झालें तत्वतां । अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥ आपण वस्तु मुळीं एक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जा- हला ॥८१॥ आत्मज्ञान निरूपिलें । यथामतीनें बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टम- दशके शून्यत्वनिरसननिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ६४३. दशक नववा. १. आशंका. श्रीगणेशाय नमः ॥ निराकार म्हणिजे काय । निराधार म्हणिजे काय । निर्विकल्प ह्मणिजे काय । मज निरूपावें ॥ १ ॥ निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं । निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मीं ॥२॥ निरामय म्हणिजे काय । निराभास म्हणिजे काय । निरवय- व म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ३ ॥ निरामय म्हणिजे आम⁴य नाहीं । निराभास म्हणिजे भासचि नाहीं । निरवयव म्हण्जे अवयव नाहीं । पर- १. ब्रह्माचिंतनानें. २. नसलेलें. ३. अवयवरहित. ४. दुःख.

२१८ श्रीदासबोध. [ दशक ब्रह्मीं ॥ ४ ॥ निष्प्रपंच म्हणिजे काय । निष्कलंक म्हणिजे काय । निरु- पाधी म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ५ ॥ निष्प्रपंच म्हणिजे प्रपंच नाहीं । निष्कलंक म्हणिजे कलंक नाहीं । निरुपाधि म्हणिजे उपाधि¹ नाहीं । पर- ब्रह्मीं ॥ ६ ॥ निरुपम म्हणिजे काय । निरालंब म्हणिजे काय । निरपेक्ष म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ७ ॥ निरुपम म्हणिजे उपमा नाहीं । निरालंब म्हणिजे अवलंब² नाहीं । निरपेक्ष म्हणिजे अपेक्षा नाहीं । पर- ब्रह्मासी ॥ ८ ॥ निरंजन म्हणिजे काय । निरंतर म्हणिजे काय । निर्गुण म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ९ ॥ निरंजन म्हणिजे अंजन³चि नाहीं । निरंतर म्हणिजे अंतर नाहीं । निर्गुण म्हणिजे गुणचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १० ॥ निःसंग म्हणिजे काय । निर्मळ म्हणिजे काय । निश्चळ म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ ११ ॥ निःसंग म्हणिजे संगाचि नाहीं । निर्मळ म्हणिजे मळचि नाहीं । निश्चळ म्हणिजे चळ नाहीं । परब्रह्मासी ॥ १२ ॥ निःशब्द म्हणिजे काय । निर्दोष म्हणिजे काय । निवृत्ति म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ १३ ॥ निःशब्द म्हणिजे शब्दचि नाहीं । निर्दोष म्हणिजे दोषचि नाहीं । निवृत्ति म्हणिजे वृत्तिच नाहीं । परब्रह्मासी ॥ १४ ॥ नि- ष्काम म्हणिजे काय । निर्लेप म्हणिजे काय । निष्कर्म म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ १५ ॥ निष्काम म्हणिजे कामचि नाहीं । निर्लेप म्हणिजे ले- पचि नाहीं । निष्कर्म म्हणिजे कर्मचि नाहीं । परब्रह्मासी ॥ १६ ॥ अनाम म्हणिजे काय । अजन्मा म्हणिजे काय । अप्रत्यक्ष म्हणिजे काय । मज नि- रूपावें ॥ १७ ॥ अनाम म्हणिजे नामचि नाहीं । अजन्मा म्हणिजे जन्मचि नाहीं । अप्रत्यक्ष म्हणिजे प्रत्यक्ष नाहीं । परब्रह्म तें ॥ १८ ॥ अगणित म्हण जे काय । अकर्तव्य म्हणिजे काय । अक्षय म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ १९ ॥ अगणित म्हणिजे गणित नाहीं । अकर्तव्य म्हणिजे कर्तव्य नाहीं । अक्षय म्हणिजे क्षय नाहीं । परब्रह्मासी ॥ २० ॥ अरूप म्हणिजे काय । अलक्ष्य म्हणिजे काय । अनंत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २१ ॥ अरूप म्हणिजे रूपचि नाहीं । अलक्ष्य म्हणिजे लक्ष्य⁴चि नाहीं । अनंत म्हणिजे अंतचि नाहीं । परब्रह्मासी ॥ २२ ॥ अपार म्हणिजे काय । अढळ म्हणिजे १. संबंध. २. आधार. ३. मळ. ४. लक्षांत आणण्याजोगें.

९ वा. ] ब्रह्म. २१९ काय । अतर्क्य म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २३ ॥ अपार म्हणिजे पाराचि नाहीं । अढळ म्हणिजे ढळचि नाहीं । अतर्क्य म्हणिजे तर्क्याचि नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥ अद्वैत म्हणिजे काय । अदृश्य म्हणिजे काय । अच्युत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २५ ॥ अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं । अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं । अच्युत म्हणिजे च्युतें नाहीं । परब्रह्म तें ॥ २६ ॥ अच्छेद्य म्हणिजे काय । अदाह्य म्हणिजे काय । अक्लेद्य म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २७ ॥ अच्छेद्य म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे जळेना । अक्लेद्य म्हणिजे कौलवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥ परब्रह्म म्हणिजे सकळां परतें । तयास पाहतां आपणचि तें । हें कळे अनुभवमतें । सद्गुरु केलिया ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके आशंका- निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांतीं नासे । स्वरूप तें असतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥ जें सकळांमध्यें सार । मिथ्या नव्हे तें साचार । जें कां नित्य निरंतर । संचलेंचि असे ॥ २ ॥ तें भग- वंताचें निजरूप । त्यासि बोलिजे स्वरूप । याहि वेगळीं अमूप । नामें तयाचीं ॥ ३ ॥ त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत । परी तें स्व- रूप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥ दृश्यांसेंबाह्य संचलें । परी तें विश्वास चोरलें । जवळींच नाहींसें झालें । असतचि कैसें ॥ ५ ॥ ऐसा ऐकोनियां देव । उठे दृष्टीचा भावें । पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि अवघें ॥ ६ ॥ दृष्टीचा विषय दृश्य । तोचि झालिया सादृश्यें । तेणें दृष्टी पावे संतोष । परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥ दृष्टीस दिसे तें नासे । एतद्विषयीं श्रुति असे । म्हणोनि जें दृष्टीस दिसे । तें स्वरूप नव्हे ॥ ८ ॥ स्वरूप तें निराभास । आणि दृश्य भासलें साभास । भासास बोलिला नाश । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥ आणि पाहतां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे । स्वानुभवें १. तर्काने जाण्याजोगें. २ चळणारें. ३. भिजेना. ४. पुष्कळ. ५. जगताच्या आंतबाहेर. ६. पाहण्याची इच्छा. ७. प्रत्यक्ष. ८. आभासयुक्त.

२२० श्रीदासबोध. [ दशक पाहतां दिसे । दृश्यासबाह्य ॥ १० ॥ जें निराभास निर्गुण । त्याची काय सांगावी खुण । परी तें स्वरूप जाण । सन्निधचि असे ॥ ११ ॥ जैसा आकाशीं भासला भास । आणि सकळांमध्यें आकाश । तैसा जाणिजे जग- दीश । सबाह्य अभ्यंतरीं ॥ १२ ॥ उदकामध्ये परी भिजेना । पृथ्वीमध्ये परी शिरेना । वन्हीमध्यें परी जळेना । स्वरूप देवाचें ॥ १३ ॥ तें ओघा- मध्यें परी बुडेना । तें वायूमध्ये परी उडेना । सुवर्णी असे परी घडेना । सुवर्णा- सारिखें ॥ १४ ॥ ऐसें जें संचलें सर्वदा । परी तें आकळेना कदा । अमे- दामाजी वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥ तिच्या स्वरूपाची खूण । सांगों कांहीं वोळखण । अहंतेचें निरूपण । सावध ऐका ॥ १६ ॥ जे स्वरूपाकडे पावे । अनुभवासवें झेंपावे । अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी ॥ १७ ॥ म्हणे आतां मीच स्वरूप । तेंचि अहंतेचें रूप । निराकारीं आपे- आप । वेगळी पडे ॥१८॥ स्वयें मीच आहें ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम । ऐ- सिये सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहतां दिसे ॥ १९ ॥ कल्पना आकळी हेत । वस्तु कल्पनातीत । म्हणोन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥ अन्वय आणि व्यतिरेक । हा शब्दभेद कोणीएक । निःशब्दाचा अंतर्विवेक । शोधिला पा- हिजे ॥ २१ ॥ आधीं घेइजे वाच्यांश । मग वोळखिजे लक्ष्यांश । लक्ष्यांशीं पाहतां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥ सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म । हा वाच्यांशाचा अनुक्रम । शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नासे ॥२३॥ सर्व विमळ दोन्ही पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष । लक्ष्यांशीं लावितां लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥ हें लक्ष्यांशें अनुभवणें । तेथें नाहीं वाच्यांश बोलणें । मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैंचा ॥ २५ ॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी । जेथें वोसरती चारी । तेथें शब्द कळाकुसरी । कोण काज ॥ २६ ॥ शब्द बोलतां सर्वचि नासे । तेथें शाश्वतता कोठें असे । प्रत्यक्षास प्रमाण नसे । बरें पाहा ॥ २७ ॥ शब्द प्रत्यक्ष नाशवंत । म्हणोन घडे पक्ष- पात । सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८ ॥ ऐक अनुभवाचें लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्यपण । ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे ॥ २९ ॥ अनन्य झणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें । संगभंगें असत- १. लय पावतात. २. एकपक्षो बोलणें. ३. शब्दप्रवृत्ति. ४. आसक्ति तुटल्यानें.