भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 241, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 241

२०६ श्रीदासबोध. [ दशक काश अभिन्न । तैसा आत्मा स्वानंदघन । एकचि असे ॥ ५३ ॥ दृश्यासेबाह्य¹ अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं । त्याची वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥ ऐसें आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधि शो- धितां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥ जीवपण एकदेशीं । अहंकारें जन्म सोसी । विवेक पहतां प्राणियांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥ जन्ममृत्यूपासून सुटला । या नांव जाणिजे मोक्ष झाला । तत्व शोधितां पावला । तत्ववस्तु ॥ ५७ ॥ तेचि वस्तु ते आपण । हें महावाक्याचें लक्षण । साधु करिती निरूपण । आपले- नि सुखें ॥ ५८ ॥ जेचि क्षणीं अनुग्रहें² केला । तेचि क्षणीं मोक्ष झाला । बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥ आतां आशंका फिटली । संदेहवृत्ति मावळली । संतसंगें तात्काळ झाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥ स्वप्ना- मध्यें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । ज्ञानविवेकें प्राणियाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥ अज्ञान निशीच्या³ अंतरीं । संकल्पःदुखें नासती । तेणें गुणें होय प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥ तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन । तयास प्रयत्न जागृतीविण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥ तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणीक नाहीं उपाव । विवेक पाहतां वाव । बंधन होय ॥ ६४ ॥ विवेक पाहिल्याविण । जो जो उपाय तो तो शिण । विवेक पाहतां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥ आत्मयाच्या ठायीं कांहीं । बंध मोक्ष दोन्ही नाहीं । जन्ममृत्यु हें सर्वही । आत्मस्वरूपीं न घडे ॥ ६६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टमदशके मोक्षलक्षणनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. आत्मनिदर्शन. श्रीगणेशाय नमः ॥ मागां झालें निरूपण । परमात्मा तोचि तूं जाण । तया परमात्म्याचें लक्षण । तें हैं ऐसें असे ॥ १ ॥ जन्म नाहीं मृत्यु नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं । बंध मोक्ष दोन्ही नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥ परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार । परमात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥ परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं १. जगताचे आंत बाहेर. २. कृपा किंवा उपदेश. ३. रात्रीच्या.