भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 242, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 242

८ वा.] आत्मनिवेदन. २०७ एक । परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥ ऐसी परमात्मयाची स्थिति । बोलताती वेदश्रुती । परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाहीं ॥ ५ ॥ तये भक्तींचें लक्षण । भक्ति नवविधा भजन । नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाहले ॥ ६ ॥ तये नवविधेमध्यें सार । आत्मनिवेदन थोर । तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥ आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें । आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥ महापू- जेच्या अंतीं । देवास मस्तक वाहती । तैसी आहे निकटभक्ती । आत्म- निवेदनाची ॥ ९ ॥ आपणास निवेदीती । ऐसे भक्त थोडे असती । तयांस परमात्मा मुक्ती । तात्काळ देतो ॥ १० ॥ आपणास कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें । किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें । श्रोतीं सावधान होणें । एकाग्रचित्तें ॥ १२ ॥ आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण । मग परमात्मा नि- र्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥ देवा भक्तांचें शोधन । करितां होतें आत्म- निवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ देवास ओळखों जातां । तेथें झाली तद्रूपता । देवभक्तांची विभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥ विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त । अयुक्त¹ नाहीं बो- लणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥ देवा भक्तांचें पाहतां मूळ । होय भेदांचें निर्मूळ । एक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं । देव भक्त हे कडसेंणी² । निरसोनि गेली ॥ १८ ॥ आत्मनिवेदनाच्या अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती । तये नांव सायुज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥ जो संतासि शरण गेला । अद्वैत- निरूपणें बोधला । मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥ नदी मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोह³ सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥ तैसा भगवंतीं मिळाला । तो न वचे वेगळा केला । देव आपण भक्त झाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥ देव भक्त दोन्ही एक । ऐसें ज्ञान जया निश्चयात्मक । साधुजनीं मोक्षदायक । तोचि जाणावा ॥ २३ ॥ आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें । तेणें त्याचें ऐश्वर्य १. अयोग्य. २. गुंता. ३. लोखंड.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 242, कुल 467 में से · BharatKosha