दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 243, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२०८ श्रीदासबोध. [ दशक बाणे । तत्काळ अंगीं ॥ २४ ॥ देहचि होऊनि राहिजे । तेणें देहदुःख साहिजे । देहातीतं होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥ देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें । ऐश्वर्याचीं लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥ ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । याचें उत्तर काय बोलिलें । तोंचि आतां निरूपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥ देहातीत वस्तु आहे । ते तूं परब्रह्म पाहे । देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥ ज्याची बुद्धि ऐसी । वेद वर्णिती तयासी । शोधितां नानाशास्त्रांसी । न पडे ठायीं ॥ २९ ॥ ऐश्वर्य ऐसें तत्त्वतां । बाणे देहबुद्धि सोडितां । देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥ या कारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण । मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥ साधुवचन तें कैसें । काय धरावें विश्वासें । एक वेळ स्वामी ऐसें । मज निरूपावें ॥ ३२ ॥ सोहं२ आत्मा स्वानंदघन । अजन्मा३ तो तूंचि जान । हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥ महावाक्यांचें४ अंतरें । तूंचि ब्रह्म निरंतर । ऐशिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥ देहास होईल अंत । मग मी पावेन अनंत । ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥ एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं । मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥ मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईल अंत । ते काळीं पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥ हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान । समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥ सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥ माया असो- नचि नाहीं । देह असतांच विदेही६ । ऐसें समाधान कांहीं । वोळ- खावें ॥ ४० ॥ ५ राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें । परिवार देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥ प्राप्त झालिया आत्म- ज्ञान । तैसें दृश्य देहभान । दृष्टी पडतां समाधान । जाणार नाहीं ॥४२॥ मार्गी मुळीं सर्पाकार । देखतां भय आलें थोर । कळतां तेथींचा विचार । मग मारणें काय ॥ ४३ ॥ तैसी माया भयानक । विचार पाहतां मायिक । १. देहाशीं संबंध. २. तो देव मी. ३. जन्मरहित ईश्वर. ४. तत्वमस्यादि महा- वाक्यांचा मथितार्थ. ५. ब्रह्म. ६. देहावेगळा.