भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 244, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 244

मग तयेचा धाक । कासया धरावा ॥ ४४ ॥ देखतां मृगजळाचा पूर । म्हणे कैसा जाऊं पैलपार । कळतां तेथींचा विचार । मग सांकडें कैंचें ॥ ४५ ॥ देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक । जागृति झालिया साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥ तथापि माया कल्पनेसि दिसे । आपण कल्पनातीत असे । तेथें उद्वेग कायसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ अंतीं मति तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती । तुझ्या अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि झा- ली ॥ ४८ ॥ चौदेहांचा अंत । आणि जन्ममूळाचा प्रांत । अंता प्रांतासि अलिप्त । तो तूं आत्मा ॥ ४९ ॥ जयास ऐशी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती । गती आणि अवगती- । वेगळाचि तूं ॥ ५० ॥ मति खुंटली देवांची । तेथें गति आणि अवगति कैंची । आत्मशास्त्रगुरुप्रचीतीची । ऐ- क्यता आली ॥ ५१ ॥ जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्म- प्रचीतीं । प्राणी पावला उत्तम गती । सद्गुरुबोधें ॥ ५२ ॥ सद्गुरुबोध जेव्हां झाला । चौदेहांस अंत आला । तेणें निजध्यास लागला । स्वस्वरूपीं ॥ ५३ ॥ तेणें निजध्यासें प्राणी । ध्येयचि झाला निर्धारीं । सायुज्यमुक्तीचा धनी । होऊनि बैसला ॥ ५४ ॥ दृश्य पदार्थ वोसरतां । अवघा आत्माचि तत्त्वतां । नेहटून विचारें पाहतां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥ मिथ्या मि- थ्यात्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें । श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या नांव मोक्ष ॥ ५६ ॥ सद्गुरुवचन हृदयीं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी । श्रवण मनन केलेंच करी । अत्यादरें ॥ ५७ ॥ जेथें आटती दोन्ही पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष । या नांव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥ तेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे । केवळ ज्ञप्तिमात्र उरे । सूक्ष्मब्रह्म ॥ ५९ ॥ भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन तुटलें । अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासूनी ॥ ६० ॥ निःसंगाची संगव्याधी । विदेहा- ची देहबुद्धी । विवेकें तोडिली उपाधी । निष्प्रपंचाची ॥ ६१ ॥ अद्वैताचें तोडिलें द्वैत । एकांतासी दिधला एकांत । अनंतास दिधला अंत । अनं- ताचा ॥ ६२ ॥ जागृतीस चेवविलें । चेइल्यास सावध केलें । निजबोधा- १. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण यांचा. २. संबंध. ३. दुर्गति. ४. अखेरीस. ५. मिथ्या झाला असतां. ६. स्वपरभाव. ७. ज्ञानस्वरूप.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 244, कुल 467 में से · BharatKosha