दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 245, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२१० श्रीदासबोध. [ दशक सि प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥ अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्ती- चें घर । संयोगास निरंतर । योग केला ॥ ६४ ॥ निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक झालें । बहुतां दिवसां भेटलें । आपणास आपण ॥ ६५ ॥ तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा । भूतपंचकाची बाधा । निर- सोनि गेली ॥ ६६ ॥ झालें साधनांचें फळ । निश्चळास केलें निश्चळ । नि- र्मळाचा गेला मळ । विवेकबळें ॥ ६७ ॥ होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त झालें । आपणा देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥ दुःस्वप्नें जाजा- वला । ब्राह्मण नीचयाती झाला । आपणासि आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥ ऐसें जयास झालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टम- दशके आत्मनिदर्शननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. सिद्धलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ अंतरीं गेलिया अमृत । बाहेरी काया लखलखित । अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसी ॥ १ ॥ झालें आत्मज्ञान बरवें । हें कैसेनि पां जाणावें । म्हणोनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥ ऐका सिद्धाचें लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण । तेथें पाहतां वेगळेपण । मुळींच नाहीं ॥ ३ ॥ स्वरूप होऊनि राहिजे । तया नांव सिद्ध बोलिजे । सिद्धस्वरूपीं¹चें साजे । सिद्धपण ॥ ४ ॥ वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । तयासीच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥ तथापि बोलों कांहींएक । साधका कळावया विवेक । सिद्धलक्षणांचें कौतुक । तें हें ऐसें असे ॥ ६ ॥ अंतर²स्थिति स्वरूप झाली । पुढें काया कैसी वर्तली । जैसी स्वर्मींची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥ तथापि सिद्धाचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । जेणें बाणे अंतरखूण । परमार्थाची ॥ ८ ॥ सदा स्वरूपानु³संधान । हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोनि आपण । जनां- वेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टि पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लाग- ली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाअंगीं १. स्वतःसिद्ध ब्रह्मस्वरूपीं. २. अंतःकरणाची वृत्ति. ३. आत्मस्वरूपाचें चिंतन.