दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 240, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८ वा.] · मोक्षलक्षण. २०५ नाना मतें नाना भेद । भेदें वाढती विवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥ तया संवादाचें लक्षण । पांचभौतिक देह जाण । तया देहामध्यें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥ देह अंतीं नासोनि जाय । त्यास आत्मा म्हणों नये । नाना तत्वाचे समुदाय । देहामध्यें आले ॥३७॥ अंतःकरण १प्राणादिक । विषय २ इंद्रियदशक ३ । हा सूक्ष्माचा ४ विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥ घेतां सूक्ष्माची शुद्धी ५ । भिन्न अंतःकरण मन बुद्धी । नाना तत्वांची उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥ स्थूल सूक्ष्म कारण । महाकारण विराट हिरण्य । अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्ट देह ॥ ४० ॥ चारी पिंडीं चारी ब्रम्हांडीं । ऐसी अष्टदेहांची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दश देह बोलिजे ॥ ४१ ॥ ऐसें तत्वांचें लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण । कार्य कर्ता कारण । दृश्य तयाचें ॥ ४२ ॥ जीव शिव पिंड ब्रम्हांड । माया अ- विद्येचें बंड । हें सांगतां असे उदंड । परी तो आत्मा वेगळा ॥ ४३ ॥ पाहों जातां आत्मे चारी । त्यांचें लक्षण अवधारीं । हें जाणोनी अभ्यंतरीं । सुदृढ धरावें ॥ ४४ ॥ एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा । चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे चारी आत्मे ॥ ४५ ॥ भेदें उंच नीच भासती । परी चारी एकचि असती । येविषयीं दृष्टांत संमती । सावध ऐका ॥ ४६ ॥ घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश । अ- वघें मिळोन आकाश । एकचि असे ॥ ४७ ॥ तैसा जीवात्मा आणि शि- वात्मा । परमात्मा आंणि निर्मळात्मा । अवघा मिळोन आत्मा । एकचि असे ॥ ४८ ॥ घटीं व्यापक जें आकाश । तया नांव घटाकाश । पिंडीं व्यापक जो ब्रम्हांश । त्यासि जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥ मठीं व्यापक जें आकाश । तया नांव मठाकाश । तैसा ब्रम्हांडीं जो ब्रम्हांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥ मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश । ब्रम्हांडाबाहेरील जो ब्रम्हांश । त्यासि परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥ उपाधीवेगळें आकाश । तया नांव चिदाकाश । तैसा निर्मळात्मा परेश । उपाधीवेगळा ॥ ५२ ॥ उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आ- १ प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. २. शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध. ३. पांच ज्ञानेंद्रियें व पांच कर्मेंद्रियें. ४. लिंगदेहाचा. ५. शोध.