दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 235, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२०० श्रीदासबोध. [ दशक स्वरूप अनुभवा परतें । म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥६८॥ दुग्धासारिखा जळांश । निवडूं जाणती राजहंस । तैसें स्वरूप आणि आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥ सकळ माया गाथागोवी । संतसंगें हे उग- वावी । पाविजे मोक्षपदवी । सत्समागमें ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे अष्टमदशके पंचमहाभूतस्वरूपआकाशभेदनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. दुश्चितलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी । मोक्ष लाभे किती दिवसीं । हें मज निरूपावें ॥ १ ॥ धरितां साधूची संगती । किती दिवर्शी होते मुक्ती । हा निश्चय कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥२॥ मुक्ति लाभे तत्क्षणीं । विश्वासातां निरूपणीं । दुश्चितपणें हानी । होत असे ॥ ३ ॥ सुचितपणें दुश्चित । मन होतें अकस्मात । त्यास करावें निवांत । कोणे परी ॥ ४॥ मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडी । सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥ अर्थप्रमेयें ग्रंथांतरीं । शोधूनि घ्यावें अभ्यंतरीं । दुश्चितपण आलें तरी । पुन्हा श्रवण करावें ॥६॥ अर्थांतर पाहिल्याविण । उगोंचि करी जो श्रवण । तो श्रोता नव्हे पाषाण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥ येथें श्रोते मानितील शिण । आम्हांसि केलें पाषाण । तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥८॥ वांकुडा तिकुडा फोडिला । पाषाण घडून नीट केला । दुसरे वेळेस पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥ टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुनः लागे ॥१०॥ सांगतां अवगुण गेला । पुनः मागुती जडला । या कारणें महा भला । पाषाण गोटा ॥ ११ ॥ ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहून उणा । पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥ कोटिगुणें कैसा पाषाण । स्याचेंहि ऐका लक्षण । श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥ माणीक मोतीं प्रर्वाळ । पाच वैडूर्य वज्रैनीळ । गोमेदें मणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥ यांहि वेगळे बहुत । १. सिद्धान्त. २. गूढार्थ. ३. श्रेष्ठ. ४. पोंवळें. ५. एक रत्न. ६. हिरा.