भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 270, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 270

९ वा. ] देहातीत. २३५ परकाया प्रवेशले । ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ १० ॥ फुंकिल्या- सरिसा वायु गेला । तेथें वायुसुत निर्माण झाला । म्हणोन वायुरूप वास- नेला । जन्म आहे ॥ ११ ॥ मनाच्या वृत्ति नाना । त्यांत जन्म घेते वासना । वासना पाहतां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥ वासना जाणिजे जाणीवहेतु । जाणीव मूळींचा मूळतंतु । मूळमायेंत असे मिश्रित । कारणरूपें ॥ १३ ॥ कारणरूपें आहे ब्रह्मांडीं । कार्यरूपें वर्ते पिंडीं । अनुमानीतां तांतडी । अनुमानेना ॥ १४ ॥ परंतु आहे सूक्ष्मरूप । जैसें वायूचें स्वरूप । सकळ देव वायुरूप । आणि भूतसृष्टी ॥ १५ ॥ वायूमध्यें विकार नाना । वायु तरी पाहतां दिसेना । तैसी जाणीव वासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥ त्रिगुण आणि पंचभूतें । हीं वायूमध्यें मिश्रितें । अनुमानेना म्हणोनि त्यांतें । मिथ्या म्हणों नये ॥ १७ ॥ सहज वायु चाले । तरी सुगंध दुर्गंध कळां आले । उष्ण शीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥ वायूचेनि मेघ वोळती । वायूचेनि नक्षत्रें चालती । सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायु ॥ १९ ॥ वायुरूपें दैवतें भूतें । अंगीं भरती अकस्मातें । वध केलिया प्रेतें । सावध होती ॥ २० ॥ राहणें ब्राह्मणसंबंध जाती । राहणें ठेवणीं सांपडती । नाना गुंतले उसवती । प्रत्यक्ष राहणें ॥ २१ ॥ वारें निराळें न बोले । देहामध्यें भरोन डोले । आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २२ ॥ ऐसा वायूचा विकार । एवंच कळेना विस्तार । सकळ कांहीं चराचर । वायुमुळें ॥ २३ ॥ वायु स्तब्धरूपें सृष्टिधर्ता । वायु चंचलरूपें सृष्टिकर्ता । न कळे तरी विचारो प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥ मुळापासून शेवट- वरी । वायुचि सकळ कांहीं करी । वायुवेगळें कर्तृत्व चतुरीं । मज निरूपावें ॥ २५ ॥ जाणीवरूप मूळमाया । जाणीव जाते आपुल्या ठाया । गुप्त प्रगट होऊनियां । विश्वीं वर्ते ॥ २६ ॥ कोठें गुप्त कोठें प्रगटे । जैसें जीवन उफों- ळे आँटे । पुढें मागुतां ओघ लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥ तैसाच वायूमध्यें जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर । कोठें विकारे कोठें समीरें । उगाच वाजे ॥ २८ ॥ वारीं अंगावरून जाती । तेणें हात पाय वाळती । वारा १. वायूपासून झालेला, अग्नि. २. अंगांत दैवत आणवून बोलविणें, त्यायोगें. ३. वासना. ४. चढतें-उतरतें. ५. विकार पावतो. ६. वायु.