दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 271, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंवाजतां करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥ नाना रोगांचीं नाना वारीं । पडिा करिती पृथ्वीवरी । वीज कडाडी अंबरीं १ । वायूसुळें ॥ ३० ॥ वायूकारितां रागोद्गार २ । कळे वोळखीचा निर्धार । दीप लागे मेव पडे हा चमत्कार । रागोद्वारीं ॥ ३१ ॥ वायु फुंकितां धुली पडती । वायु फुंकितां खोडकें करपती । वायूकारितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥ मंत्रीं देव प्रगटती । मंत्रीं भूतें आवरती । बैजागिरी वोडंबरै करिती । मंत्रसामर्थ्यें ॥ ३३ ॥ राक्षसांची मावरचना । ते हे देवादिकां कळेना । विचित्र सामर्थ्यें नाना । स्तंभनमोहनादिकें ॥३४॥ धडचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें । नाना विकार सांगावे । किती म्हणोनी ॥ ३५ ॥ मंत्रीं संग्राम देवाचा । मंत्रीं साभिमान ऋषींचा । महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥ मंत्रीं पक्षी आटोपिती । मूषकें श्वापदें बांधिती । मंत्रीं महासर्प खिलोती । आणि धनलाभ ॥३७॥ आतां असो हा प्रश्न झाला । बद्धाचा जन्म प्रत्यया आला । मागील प्रश्न फिटला । श्रोतयांचा ॥ ३८ ॥ इति