दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
DevanagariHindipublished467 पृष्ठ
पृष्ठ 272, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपृष्ठ 272
९ वा. ] संदेहवारण. २३७ कैसें झालें । विचारून पाहिजे बोलिलें । ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेप- वचनें १ ॥ ९ ॥ आतां याचें प्रत्युत्तर । सावध ऐका निरुत्तर । येथें पडिले कीं विचार । संदेहाचे ॥ १० ॥ ब्रह्मांड नाहीं म्हणौं तरी दिसे । आणि दिसे म्हणों तरी नासे । आतां हें समजती कैसे । श्रोतेजन ॥ ११ ॥ तंव श्रोते झाले उदितें २ । आह्नों म्हणती सावचित्त । प्रसंगें बोलों उचित । प्रत्युत्तर ॥ १२ ॥ आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें । हैं तौं घ- डेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥ आप तेज अथवा पवन । सारूं न शकती गगन । गगन पाहतां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥ अथवा कठिन झाली मेदिनी ३ । तरी गगनें केली चाळणी । पृथ्विचें सर्वांग भेदूनी । राहिलें गगन ॥ १५ ॥ याची प्रचीत ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे । आकाश जैसें तैसें असे । चळणार नाहीं ॥ १६ ॥ वेगळेपणें पाहावें । तयास आकाश म्हणावें । अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ४ ॥ १७ ॥ तस्मात् आकाश कळेना । भेद गगनाचा कळेना । भासलें ब्रह्म यास जाणा । आ- काश म्हणावें ॥ १८ ॥ निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें । म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेसाठीं ॥ १९॥ कल्पनेसी भासे भास । ति- तुकें जाणावें आकाश । परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥ पंचभूतां- मध्यें वास । म्हणोनि बोलिजे आकाश । भूतांतरीं ५ जो ब्रह्मांश । तेंचि गगन ॥ २१ ॥ प्रत्यक्ष होतें आणि जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें । म्हणोनियां गगनातें । भेदिलेंच नाहीं ॥ २२ ॥ पृथ्वि विरोन उरे जीवन । जीवन नसतां उरे अग्न । अग्नि विझतां उरे पवन । तोहि नासे ॥ २३ ॥ मिथ्या आलें आणि गेलें । तेणें खरें तें भंगले । ऐसें हें प्रतीतीस आलें । कोणे परी ॥ २४ ॥ भ्रमें प्रत्यक्ष दिसतॆं । विचार पाहतां काय तेथें । भ्रममूळ या जगांतें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥ भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भे- दिलें कोणे ठाईं । भ्रमें भेदिलें म्हणतां ठायीं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥ भ्रमाचें रूप मिथ्या झालें । मग सुखें म्हणावें भेदिलें । मुळीं लटिकें त्याणें ६ केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥ लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काय गेलें ।
१. शंकावचनानें. २. तयार. ३. पृथ्वी. ४. वेगळें होऊन पाहिल्यास आकाश, व एकरूपतेनें अनुभव घेतल्यास तेंच ब्रह्म होय. ५. पंचभूतांमध्ये. ६. जो नाहीं त्यानें.