दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 275, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२४० श्रीदासबोध. [ दशक आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें । माया आहे मायापणें । वि- स्तारली ॥ २३ ॥ ऐसें हें अवघेंच आहे । आणि आपणहि कोणी एक आहे । हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥ शोधूं जाणे सकळां- सी । परी पाहों नेणे आपणासी । ऐसा ज्ञानी एकदेशी । वृत्तिरूपें ॥ २५ ॥ व वृत्तिरूप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें । प्रकृतिनिरासें अवघेंच गेलें । विकारवंत ॥ २६ ॥ उरलें तें निखिल निर्गुण । विवंचितां तेंचि आपण । ऐसी हे परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥ फळ एक आपण एक । ऐसा नाहीं हा विवेक । फळाचें फळ कोणी एक । स्वयेंचि होइजे ॥ २८ ॥ रंक होता तो राजा जाहला । बरें पाहतां प्रत्यय आला । रंकपणाचा गलवला । रंकीं करावा ॥ २९ ॥ वेद शास्त्रें पुराणेँ । नाना सा- धनें निरूपणें । सिद्ध साधु त्या कारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥ तें ब्रह्मरूप आपणचि अंगें । सारासार विचार प्रसंगें । करणें न करणें वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥ रंक राजाज्ञेसि भ्यालें । तेचि पुढें राजा जाहलें । मग तें भयाचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥ वेदें वेदाज्ञेनें चालावें । सच्छास्त्रें शास्त्र अभ्यासावें । तीर्थे तीर्थास जावें । कोणत्या प्रकारें ॥ ३३ ॥ अमृतें से- वावें अमृत । अनंतें पाहावा अनंत । भगवंतें लक्षावा भगवंत । कोणत्या प्रकारें ॥ ३४ ॥ संतें¹ असंतें त्यागावें । निर्गुणें निर्गुणास भावावें । स्वरूपें स्वरूपों रंगावें । कोणत्या प्रकारें ॥ ३५ ॥ अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें धन । निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥ साध्येंचि करावें साध- नासी । ध्येयेंचि धरावें ध्यानासी । उन्मनें आवरावें मनासी । कोणत्या प्रै- कारें ॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके अलिप्तस्थिति- निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ४२७. १. नित्य वस्तूनें. २. अनित्य. ३. वेद, शास्त्र, तीर्थ, अमृत इत्यादि हीं सर्व (ओंवी ३३ ते ३६) आत्मरूपच असल्यामुळे आपण आपलेंच सेवन कसें करावें? सारांश, स्वरूपतः सर्व एकरस आहे. ४. कल्पावें.