दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 274, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंबैसले । परी ते ब्राह्मणापरीस भले । कैसे मानावे ॥३॥ ब्राह्मणांमध्यें कोणी नेमस्त । कोणी जाहले अस्ताव्यस्त । आणि श्वान सदा ध्यानस्त । परी तें उत्तम नव्हे ॥ ४ ॥ ब्राह्मण लक्ष्यमुद्रा¹ नेणे । मार्जार लक्ष्याविशीं शहाणें । परी ब्राह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥५॥ ब्राह्मण पाहे भेदा- भेद । मक्षिका सर्वांसी अभेद । परी तसि जाहला ज्ञानबोध । हें तों न घडे ॥ ६ ॥ उंच वस्त्रें नीच ल्याला । आणि समर्थ उघडाच बैसला । परी तो आहे परीक्षिला । परीक्षकवंतीं ॥ ७ ॥ बाह्यात्कार केला अधिक । परी तो अवघा लौकिक । येथें पाहिजे मुख्य एक । अंतर्निष्ठ ॥ ८ ॥ लौकिक बरा संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाहला । मुख्य देवास चुकला । तो आत्मघातकी ॥ ९ ॥ देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पितृलोक । भूतांस भजतां भूतलोक । पाविजेती ॥ १० ॥ जेणें जयास भजावें । तेणें त्या लोकास जावें । निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥ निर्गु- णाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य² । अनन्य होतां होइजे धन्य । निश्चयेंसी ॥ १२ ॥ सकळ केलियाचें सार्थक । देव ओळखावा एक । आ- पण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥ देव पाहतां निराकार । आपला तो मायिक विचार । सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥१४॥ आतां अनुमान तो कांई । वस्तु आहे वस्तूच्या ठायीं । देहभाव कांहींच नाहीं । ढांडोळितां ॥ १५ ॥ सिद्धास आणि साधन । हें तों अवघेंच अ- नुमान । मुक्तास आणि बंधन । आठळेना ॥ १६ ॥ साधनें जें कांहीं सा- धावें । तें तो आपणचि स्वभावें । आतां साधनाच्या नांवें । शून्याकार ॥ १७ ॥ कुलौल³ पावला राज्यपदवी । आतां रासभें⁴ कासया राखावीं । कुलालपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥ तैसा अवघा वृत्तिभाव । नाना साधनांचा उपाव । साध्य झालिया कैंचा ठाव । साधनासी ॥ १९ ॥ साधनें काय साधावें । नेमें काय फळ द्यावें । आपण वस्तु⁵ भरंगळावें । कासयासी ॥ २० ॥ देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्माचा । परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥२१॥ उगेंच पाहतां मीपण दिसे । शोध घेतां कांहींच नसे । तत्वें तत्व निरसे । पुढें निखिल आत्मा ॥ २२ ॥
१. चित्तैक्याची एक रीत. २. एकनिष्ठ. ३. कुंभार. ४. गाढवें. ५. ब्रम्ह.