दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 284, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंअनळ । पुढें एकवटतील ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥ समुद्रांचा वडवान- ळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ । सप्तकंचुकीं२चा आवरणानळ । सूर्य आणि वि- द्युल्लता ॥ २१ ॥ ऐसे ज्वाळ एकवटती । तेणें देव देह सोडिती । पूर्वरूपीं मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥ तो वारा झडपी वैश्वानरा । वेन्हि वि- जेल एकसरां । वायु धांवे सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥ धूम्र वितळे आ- काशीं । तैसें होईल समीरासी । बहुतांमध्ये थोडियासी । नाश बोलिला ॥ २४ ॥ वायु वितळतां जाण । सूक्ष्म भूतें आणि त्रिगुण । ईश्वर सांडी अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥ तेथें जाणीव राहिली । आणि जगज्ज्योत निमाली । शुद्ध सारांश उरली । स्वरूपस्थिती ॥ २६ ॥ जितुकीं कांहीं नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि४ गुणें । प्रकृति नसतां बोलणें । कैसें बोलावें ॥ २७ ॥ प्रकृति असतां विवेक कीजे । त्यास विवेकप्रलय बोलिजे । पांचहि प्रलय वोजें५ । तुज निरूपिले ॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके पंचप्रलयनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. भ्रम. श्रीगणेशाय नमः ॥ उत्पत्ति स्थिति संहार । यांचा निरूपिला व्यवहार । परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥ होतें वर्ततें आणि जातें । यांचा संबंध नाहीं तेथें । आदि मध्य अवसानीं तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥ परब्रह्म असतांचि असे । मध्येंच हा भ्रम भासे । भासे परंतु अवघा नासे । कालांतरीं ॥ ३ ॥ उत्पत्ति स्थिति संहारत । मध्यें हें अखंड होत जात । पुढें शेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४ ॥ यांमध्ये ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे । सारासार विचारें पाहे । म्हणोनियां ॥ ५ ॥ बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले । सृष्टीमध्यें उमजले । ऐसे थोडे ॥ ६ ॥ त्या उमजल्याचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । भ्रमाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥ भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावें तयासी । ऐका आतां भ्रमासी । निरूपिजेल ॥ ८ ॥ एक परब्रह्म संचलें । कदापि नाहीं विकारलें । त्या वेगळें जें भासलें । तें भ्रमरूप ॥ ९ ॥ जयास १. अग्नि. २. ब्रह्मांडाचा. ३. वायूचे ठिकाणीं. ४. मायेचे. ५. स्पष्टपणें.