दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 285, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंबोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत । हें अवघेंच समस्त । भ्रमरूप ॥ १०॥ मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम । ईश्वर हा हि भ्रम । निश्चयें सी ॥ ११ ॥ श्लोक ॥ भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर- भावत्वं भ्रममूलमिदं जगत् ॥ १॥ टीका ॥ या कारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त । यामध्यें जे विचारवंत । तोचि धन्य ॥ १२॥ आ- तां भ्रमाचा विचारू । अत्यंतचि प्रांजळ करू । दृष्टांतद्वारें विवरूं । श्रोत- यांसी ॥ १३॥ भ्रमण करितां दूरदेशीं । दिशाभुली आपणाशी । कां ओ- ळखी मोडे जिवलगांसीं । या नांव भ्रम ॥ १४ ॥ कां उन्मत्तद्रव्य सेविलें । तेणें अनेक भासों लागलें । नाना व्यथा कां झडापिलें । भूतें तो भ्रम ॥ १५॥ दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडिली बाजीगिरी । उगाच संदेह अं- तरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥ ठेवला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां चुकला । पट्टणामध्यें भांभावला । या नांव भ्रम ॥ १७॥ वस्तु आपणा- पासीं असतां । गेली म्हणोन होय दुश्चिता । आपुलें आपण विसरता । या नांव भ्रम ॥१८॥ कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जें शिकला तें विसरला । स्वप्नदुःखें बाविरा झाला । या नांव भ्रम ॥१९॥ दुश्चिन्ह अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन । दचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥२०॥ वृक्ष काष्ठ पशु देखिले । मनांत वाटे भूत आलें । कांहींच नसतां हडबडिलें । या नांव भ्रम ॥२१॥ आतां कांच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणी वावडे । द्वार चुकोन भलतीकडे । या नांव भ्रम ॥२२॥ एक असतां एक वाटे । एक सांगतां एक निर्बटे । एक दिसतां एक उठे । या नांव भ्रम ॥२३॥ आतां जें जें दीजेतें । तें तें पुढें पाविजेतें । मेलें माणूस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥ ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं एक पावेन मी । प्रीति गुं- तली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥ मेलें मनुष्य स्वप्नीं आलें । तेणें कांहीं मागीतलें । मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥ अवघें मिथ्या म्हणोन बोले । आणि सामर्थ्यांवरी मन चाले । ज्ञाते वैभवें दड- पिले । या नांव भ्रम ॥ २७ ॥ कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळेंचचि १. उघड. २. मादक पदार्थ. ३. जादुगिरी. ४. मोठ्या शहरामध्यें. ५. आर- सेमहाल. ६. शिरतो. ७. घडलें.