दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 286, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंअष्टे । कोणी एक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥२८॥ देहाभिमान कर्माभि- मान । जात्याभिमान कुळाभिमान । ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥ कैसा न्याय तो न कळे । केला अन्याय तो नाढळे । उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥ मागील कांहीं आठवेना । पुढील हीं सुचेना । अखंड आरूढ अभिमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥ प्रची- तीवीण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें । प्रचीतीविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥ फळश्रुतीविण प्रयोग । ज्ञानेंविण नुसता योग । उ- गाच शरीरें भोगी भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टीं १ । आणि वाचून जाते संटी २ । ऐशा प्रकारच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥ उदंड भ्रम विस्तारला । अज्ञानजनीं पैलावला । अल्पसंकेतें बोलिला । कळावयाकारणें ॥३५॥ भ्रमरूप विश्व स्वभावें । तेथें काय म्हणोन सांगावें । निर्गुण ब्रह्मावेगळें आघवॆं । भ्रमरूप ॥ ३६ ॥ ज्ञात्यास नाहीं संसार । ऐसे बोलती अपार । गत झाल्यांचे चमत्कार ३ । या नांव भ्रम ॥ ३७ ॥ येथें आ- शंका उठिली । ज्ञात्यांची समाधि पूजिली । तेथें कांहीं प्रचीत आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥ तैसेचि अवतार संपले । त्यांचेंहि सामर्थ्य उदंड चाले । तरी ते काय गुंतले । वासना धरूनी ॥ ३९ ॥ ऐसी आशंका उद्भवली । समर्थे पाहिजे निरूपिली । इतुकेन हे संपली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके भ्रमनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. सगुणभजन. श्रीगणेशाय नमः ॥ अवतारादिक ज्ञानी संत । सारासार विचारें मुक्त । त्यांचें सामर्थ्य चालत । कोणत्या प्रकारें ॥ १ ॥ हे श्रोत्यांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका । सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥ ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले । परंतु ते नाहीं आले । वास- ना धरूनी ॥ ३ ॥ लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार । परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥ जित असतां नेणों किती । जना-
१. कपाळावर. २. सटवी. ३. अलौकिक कृत्यें.