दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 293, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२५८ श्रीदासबोध. [ दशक विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । सर्व लोकांचें अंतर । तो सर्वात्मा बोलिजे ॥ १९ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें । एकविस स्वर्गे सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २० ॥ गुप्तवल्ली पाल्हाळली । तिचीं पुरुषनामें घेतलीं । आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥ मूळमाया जगदीश्वरी । परम विद्या परमेश्वरी । विश्वाविद्या विश्वेश्वरी । त्रैलोक्यजननी ॥ २२ ॥ अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा । चपळा जगज्योति जीवनकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २३ ॥ युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा । भूत भविष्य वर्तमाना । उकलून दावी ॥ २४ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति जाणे । तुर्या तटस्थावस्था जाणे । सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २५ ॥ ते प- रम कठिण कृपाळू । ते परम कोमळ स्नेहाळू । ते परम क्रोधी लोभाळू । मर्यादेवेगळी ॥ २६ ॥ शांति क्षमा विरक्ति भक्ती । अध्यात्मविद्या सायुज्य- मुक्ती । विचारणा सहजस्थिती । जयेचेनी ॥ २७ ॥ पूर्वी पुरुषनामें बोलि- लीं । उपरि स्त्रीनामें निरूपिलीं । आतां नपुंसकनामें ऐकिलीं । पाहिजे चंचळाचीं ॥ २८ ॥ सत्तारूप ज्ञानस्वरूप । प्रकाशरूप ज्योतिरूप । कार- णरूप चिद्रूप १ । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ २९ ॥ जाणणें अंतःकरण चित्त । श्र- वण मनन चैतन्य जीवित । येतें जातें सुचित्त । होऊन ऐका ॥ ३० ॥ मीपण तूं पण जाणपण । ज्ञातेपण सर्वज्ञपण । जीवपण शिवपण ईश्वरपण । अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥ ऐसी नामें उदंड असती । परी ते एकचि ज- गज्योती । विचारवंत ते जाणती । सर्व अंतरात्मा ॥ ३२ ॥ आत्मा जग- ज्योति सर्वज्ञपण । तिन्ही मिळोनि एकचि जाण । अंतर्कळाचि प्रमाण । ज्ञप्तिमात्र ॥ ३३ ॥ ढीग झाले पदार्थांचे । पुरुष स्त्री नपुंसक नामांचे । परंतु सृष्टिरचनेचे । किती म्हणोन सांगावे ॥ ३४ ॥ सकळां चालिता एक । अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥ तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत ओळखाना आभासा । नाना प्रकारींचा तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥ तो कळतो परी दिसेना । प्रतीत येते परी भासेना । शरीरीं असे परी वसेना । एके ठायीं ॥ ३७ ॥ तीक्ष्णपणें २ १. ज्ञानस्वरूप २. सूक्ष्मपणें.