दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 297, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२६२ श्रीदासबोध. [ दशक देह देखती । विवेकी देहांतर पाहती । पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें ॥ २४ ॥ श्लोक ॥ विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ॥ शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥१॥ देह पाहतां वेगळाले । परंतु अंतर एकचि झालें । प्राणिमात्र देखिलें । एका अंतरें ॥२५॥ अनेक प्राणी निर्माण होती । परी एकचि कळा वर्तती । तया नांव जगज्योती । जाणती कळा ॥ २६ ॥ श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमध्यें शीतोष्ण जाणे । चक्षूमध्यें पाहों जाणे । नाना पदार्थ ॥ २७ ॥ रसनेमध्यें रस जाणे । घ्राणामध्यें वास तो जाणे । कर्मेंद्रियामध्यें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥ सूक्ष्मरूपें स्थूळ रक्षी । नाना सुखदुःखें परीक्षीत । त्यास म्हणती अंतरसाक्षी । अंतरात्मा ॥ २९ ॥ आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा । जीवात्मा शि- वात्मा परमात्मा । द्रष्टा साक्षी सत्तारूप