दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 298, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें११ वा. ] चत्वार देव. २६३ पक्ष । अप्रत्यक्षास कैंचें प्रत्यक्ष । असोन नाहीं ॥ ४३ ॥ असोन मायिक उपाधी । तोंच सहजसमाधी । श्रवणें बळावली बुद्धी । निश्चयाची ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके सिद्धांतनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. चत्वार देव. श्रीगणेशाय नमः ॥ एक निश्चळ एक चंचल । चंचळीं गुंतलें सकळ । निश्चळ तें निश्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥ पाहे निश्चळाचा विवेक । ऐसा लक्षामध्यें एक । निश्चळाऐसा निश्चयात्मक । निश्चळचि तो ॥ २ ॥ या निश्चळाच्या गोष्टी सांगती । पुनः चंचळाकडे धांवती । चंचलचक्रीं १ नि- घोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥ चंचळीं चंचल जन्मलें । चंचळामध्यें वाढलें । अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥ पृथ्वी अवघी चंच- ळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे । चंचल सांडून निश्चळीं पैवाडे २ । ऐसा कैंचा ॥ ५ ॥ चंचल कांहीं निश्चळेना । निश्चळ कदापि चलेना । नित्या- नित्य विवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥ कांहीं उमजलें तरी नुमजे । कांहीं समजलें तरी न समजे । कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचिन्मात्र ॥ ७ ॥ संदेह अनुमान आणि भ्रम । अवघा चंचळामध्यें श्रम । निश्चळीं कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥ चंचळाकार तितुकी माया । मायिक जाय विलया । लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥ सगट ३ माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली । चित्रविचित्र विकारली । नाना रूपें ॥ १० ॥ नाना उत्पत्ति नाना विकार । नाना प्राणी लहान थोर । नाना पदार्थचमत्कार । नाना रूपें ॥ ११ ॥ विकारवंत विकारलें । सूक्ष्म जडत्वास आलें । अमर्याद दिसों लागलें । कांहींच्या बाही ॥ १२ ॥ मग नाना शरीरें निर्माण झालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं । भाषापरत्वें कळों आलीं । कांहीं कांहीं ॥ १३ ॥ मग नाना रीती नाना दंडकें ४ । आचार एकाहूनि एक । वर्तों लागले सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥ अष्टधा प्रकृतीचीं शरीरें । निर्माण झालीं लहान थोरें । पुढें आपल्या प्रकारें । वर्तों १. मायेच्या चक्रांतून. २. प्रवेश करील. ३. सर्व प्रकारें. ४. परंपरा.