भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 302, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 302

विकार नाहीं निर्विकार । तेंचि परब्रह्म ॥ १ ॥ ब्रह्म म्हणिजे निश्चळ । अंत- रात्मा तो चंचळ । द्रष्टा साक्षी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥ तो अंतरात्मा म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव । पाळिताहे सकळ जीव । अंतरीं वसोनी ॥ ३ ॥ त्या वेगळे जड पदार्थ । तेणेंविण देह व्यर्थ । तेणेंचि कळे परमार्थ । सकळ कांहीं ॥ ४ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांत- मार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवचि चालवी ॥ ५ ॥ चंचळेंविण निश्चळ कळेना । चंचळ तरी स्थिरावेना । ऐसे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥ चंचळनिश्चळांची संधी । तेथें भांबावते बुद्धी । कर्ममार्गाचा जो विधी । तो मग ऐलीकडे ॥ ७ ॥ देव या सकळांचें मूळ । देवास मूळ ना डाळ । परब्रह्म तें निश्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥ निर्विकार आणि विकारी । एक म्ह- णेल तो भिकारी । विचाराची होते वैरी । देखत देखतां ॥ ९ ॥ सकळ परमार्थांचें मूळ । पंचीकरण महावाक्य केवळ । तें विवरावें प्रांजळ । पुनः- पुन्हा ॥ १० ॥ पहिला देह स्थूलकाया । आठवा देह मूळमाया । अष्ट देह निरसलिया । विकार कैंचा ॥ ११ ॥ या कारणें विकारी । साचाऐशी बां- जिगिरी । एक समजे एक खरी । मानिताहे ॥ १२ ॥ उत्पत्ति स्थिति सं- हार । यां वेगळा निर्विकार । काळायासी सारासार । विचार केला ॥ १३ ॥ सार असार दोन्ही एक । तेथें कैंचा उरला विवेक । परीक्षा नेणती रंक । पापी करंटे ॥ १४ ॥ जो एकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला । नाना विकारीं विकारला । निर्विकारी ॥ १५ ॥ ऐसें प्रगटचि आहे । आ- पुल्या प्रत्ययें पाहे । काय राहे काय न राहे । हेंहि कळेना ॥ १६ ॥ तें अ- खंड होत जातें । जें सर्वदा संहारतें । रोकडें प्रचीतीस येतें । जनांमध्यें ॥ १७ ॥ एक रडे एक चरफडी । एकाची एक घरी नरडी । एकमेकां झों- बती बैराडी । डुकळले जैसे ॥ १८ ॥ नाहीं न्याय नाहीं नीती । ऐसे हे लोक वर्तती । आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥ धोंडे सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें । आणि अवघेंच सार म्हणावें । बाष्कळपणें ॥ २० ॥ म्हणोन हा विचार करावा । सत्य मार्ग तोचि धरावा । लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥ सारें गारें एकचि सरी । तेथें १. प्रपंच. २. परमार्थ. ३. समाप्ति. ४. गारुड. ५. अधाशी. ६. थोर लहान.