दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 303, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२६८ श्रीदासबोध. [ दशक परीक्षेस कैंची उरी । या कारणें चतुरीं । परीक्षा करावी ॥ २२ ॥ जेथें परी- क्षेचा अभाव । तेथें दे घाव घे घाव । सगट सारिखा स्वभाव । लौंदेपणाचा ॥ २३ ॥ घेऊं ये तेंचि घ्यावें । घेऊं नये तें सांडावें । उंच नीच ओळखावें । या नांव ज्ञान ॥ २४ ॥ संसार संतेसि आलें । एक लाभें अभरें³ झाले । एक ते करंटे ठकले । मुद्दल गेलें ॥ २५ ॥ जाणत्यानें ऐसें न करावें । सार तेंचि शोधून घ्यावें । असार तें जाणोन त्यागावें । वमन जैसें ॥ २६ ॥ तें वमन करी प्राशन । तरी तें श्वानाचें लक्षण । तेथें शुचिष्मंत ब्राह्मण । काय करी ॥ २७ ॥ जिहीं जैसें संचित केलें । तयांस तैसेंच घडलें । जें अभ्यासीं पडोन जडलें । तें तों सुटेना ॥ २८ ॥ एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा सावडिती । आपल्या वडिलांचा घेती । साभिमान ॥ २९ ॥ असो विवेकें- विण । बोलणें तितुका क्षीण । कोणी एकें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके विवेकनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. राजकारण. श्रीगणेशाय नमः ॥ कर्म केलेंचि करावें । ध्यान धरलेचि धरावें । विव- रलेंचि विवरावें । पुनः निरूपण ॥ १ ॥ तैसें आम्हांस घडलें । बोलिलेचि बोलणें पडिलें । कां जें विघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥ ⁴अनन्य राहे समुदाय । इतर जनांस उपजे भाव । ऐसा आहे अभिप्राय । उपायाचा ॥ ३ ॥ एक हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकारण । तिसरें तें सावधपण । सर्वविषयीं ॥ ४ ॥ चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप । अन्याय थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥ ५ ॥ जाणावें पराचें अंतर । उदा- सीनता निरंतर । नीति न्यायांस अंतर । पडोंच न द्यावें ॥ ६ ॥ ⁶संकेतें लोक वेधावा । एकें अनेक बोधावा । प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या ॥ ७ ॥ प्रसंग समय ओळखावा । धीर बहुत असावा । संबंध पडों न द्यावा । अतिपरिचयाचा ॥ ८ ॥ उपाधीस विस्तारावें । उपाधींत न सांप- डावें । नीचत्व पहिलें घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥ दोष देखोन झांकावे । १.आळसाचा. २.बाजारास. ३.श्रीमान्. ४.एकनिष्ठ. ५.विश्वास. ६.चातुर्यानें.