दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 308, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें११ वा.] उपदेश. २७३ मोठें ॥ १५ ॥ ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी । बरें ज्याची जैसी टांकी । तैसें करावें ॥ १६॥ मूर्ख अंतर राखो नेणे । म्हणोन असावे शाहणे । ते शाहणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७॥ अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागले । तैसें अज्ञानासि झालें । देव न कळे ॥ १८॥ या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण रे संसारीं । वृत्ति एकदेशी तरी । पवों- डेल कोठें ॥ १९ ॥ ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरूपें बहुवाणी । भूगर्भी आणि पाषाणीं । कितीएक ॥ २० ॥ इतुक्या ठायीं पुरवला । अनेकीं एकच वर्तला । गुप्त आणि प्रगटला । किती एक ॥ २१ ॥ चंचळ न होइजे नि- श्चळ । प्रचीत जाणावी केवळ । चंचळ नव्हे निश्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥ तत्त्वें तत्त्व जेव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे । निर्मळ निश्चळ चहूकडे । निरंजन ॥ २३ ॥ आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥ भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा । अवघा वंश उद्धरावा । हरिभक्ति करूनी ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके अंतरात्माविवरणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. उपदेश. श्रीगणेशाय नमः ॥ आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केलें पाहिजे सांग । कदाचित् पडलें व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥ म्हणोन कर्म आरंभिलें । कांहीं एक सांग घडलें । जेथें जेथें अंतर पडलें । तेथें हरिसमरण करावें ॥ २ ॥ तरी तो हरि आहे कैसा । विचार पाहावा ऐसा । संध्येपूर्वी जगदीशा । चोवीस नामें स्मरावें ॥ ३॥ चोवीस नामीं सहस्र नामीं । अनंत्- नामीं तो अनामी । तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें ओळखावा ॥ ४॥ ब्राह्मण स्नान करून आला । मग तो देवार्चनास बैसला । यथासांग तो पूजिला । प्रतिमादेव ॥ ५ ॥ नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती धरूनि प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥ ऐसें ओळखिलें पाहिजे । ओळखून भजन कीजे । जैसा साहेब नमस्कारिजे । १. भावना. २. शिरेल ३. भूमीचे पोटांत. ४. पूर्ण. ५. दोष. ६. अधिकारी.