दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 309, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२७४ श्रीदासबोध. [ दशक ओळखिल्या उपरी ॥७॥ तैसा परमात्मा परमेश्वर । बरा ओळखावा पाहोनी विचार । तरीच पाविजे पार । भवसागराचा ॥ ८ ॥ पूजा घेताती प्रतिमा । अंगा येतो अंतरात्मा । अवतारी तरी निजधामा । येऊनि गेले ॥ ९ ॥ परी ते निजरूपें असती । तें निजरूप जगज्योती । सत्वगुण तयेस म्हणती । जाणती कळा ॥ १० ॥ तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यानकोटी । या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥ देहपुरामध्ये ईश । म्हणोन तया नांव पुरुष । जगामध्यें जगदीश । तैसा ओळखावा ॥ १२॥ जाणीवरूपें जगदाकारें । प्रस्तुत वर्तवी शरीरें । अंतःकर्णी विष्णु येणें- प्रकारें । ओळखावा ॥ १३ ॥ तो विष्णु आहे जगदंतरीं । तोचि आपुले अंतरीं । कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा ओळखावा ॥१४॥ ऐके देखे हुंगे चाखे । जाणोन विचारें ओळखे । कितीक आपुलें पारखें । जाणताहे ॥१५॥ एकचि जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा अडथळा । देहसंबंधें वेगळा । अभिमान धरी ॥१६॥ उपजे वाढे मरे मारी । जैशा उसळती लहरीवरी लहरी । चंचळसागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥ त्रैलोक्य वर्तवितो एक । म्हणोनि त्रैलोक्यनायक । ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा ॥ १८ ॥ ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्त्वांमध्ये आला । पुढें विचार पाहिजे केला । महावाक्याचा ॥१९॥ आधीं देखिला देहधारी । मग पाहिला जगदंतरीं । तयाचेनि याउपरी । परब्रह्म