भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 310, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 310

११ वा.] निस्पृहवर्तन. २७५ १० निस्पृहवर्तन. श्रीगणेशाय नमः ॥ मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो । जैसा बहुधा होऊनि भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥ तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥ कर्ता भोक्ता तत्वतां । भूमंडळीं सर्व सत्ता । त्या वेगळा त्यास ज्ञाता । पा- हेसा कवण ॥ ३ ॥ ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें । पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ॥ ४ ॥ कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती ल- हान थोर समस्त । वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥ ५ ॥ प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना । पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥ ६ ॥ वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषण तें भूषण । चालनेविण एक क्षण । जा- ऊंच नेदी ॥ ७ ॥ त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन । लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ पुरतें कोणाकडे पाहेना । पुरतें कोणासी बोलेना । पुरतें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥ जातो स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जायेना । आपली स्थिति अनुमाना । येवूं च नेदी ॥ १० ॥ लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी । लोकीं तर्किले तें दावी । निष्फळ करुनी ॥ ११ ॥ लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा आनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा ॥ १२ ॥ एवं कल्पितां कल्पेना । तर्कितांहि तर्केना । कदापि भावितां भावेना । यो- गीश्वर ॥ १३ ॥ ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना । क्षण एक विसं- बेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥ लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेच नि- ष्फळ होती । जनांची जनां लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ॥ १५ ॥ बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें । तरी मग जाणावें साधिलें । मह- त्कृत्य ॥ १६ ॥ अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करित जावा । काळ सार्थकाचे करावा । जनांसहित ॥ १७ ॥ उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनांस शिकवावे । उदंड समुदाय करावें । पुरी गुप्तरूपें ॥ १८ ॥ अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग । लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥ १९ ॥ आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निष्फळ । संक्षेपें- १. वस्त्रांलंकारांची शोभा. २. कल्पिलें. ३. जाणवेना. ४. उद्योगावांचून.