दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 311, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंविण केवळ । वृथा पुष्ट ॥ २० ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाणजाणोनि धरावे । जवळीं दुरीं ॥ २१ ॥ अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें । जाणोन शोधावीं चित्तें । नानाप्रकारें ॥ २२ ॥ अधिकार पाहून कार्य सांगणें । साक्षेप पाहून विश्वास धरणें । आपला मेंगज राखणें । कांहीं तरी ॥ २३ ॥ हें प्रचीतीचें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें । मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणीएकें ॥ २४ ॥ महं- तें महंत करावे । युक्तिबुद्धीनें भरावे । जाणते करोन विखरावे । नाना देशीं ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके निस्पृहवर्तन- निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी २८७.
दशक बारावा.
१. विमललक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ- विवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥ प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खा- याला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडूनि प्रपंच करिसी । तरी तूं यमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । यमयातना भोगितां ॥ ४ ॥ साहेब कामास नाहीं गेला । गृहींच सुरवाडोन बैसला । तरी साहेबी कुठिली तयाला । पाहती लोक ॥ ५ ॥ तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनांचें हांसें झालें । दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥ तैसेंचि होणार अंतीं । म्हणोनि भजावें भगवंतीं । परमार्थाची प्रचीती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥ संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त । अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥ प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण । प्रपं- चीं जो अप्रमाण । तो परमार्थां खोटा ॥ ९ ॥ म्हणोन सावधानपणें । प्रपंच-
१. बोज. २. पाठवावे. ३. हुद्देदार. ४. सुस्त होऊन. ५ अव्यवस्थित.