दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 312, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें. १२ वा. ] प्रत्यय. २७७ परमार्थ चालवणें । ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥ पेंर्णाळी पाहोन ऊंचले । जीवसृष्टि विवेकें चाले । आणि पुरुष होऊन श्रमले । या- सि काय म्हणावें ॥ ११ ॥ म्हणोन असावी दीर्घसूचना । अखंड करावी चाळणी । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥ सुखी असतो खबरदार । दुःखी होतो बेखबर । ऐसा हा लौकिक विचार । दिसतचि आहे ॥ १३ ॥ म्हणोन सर्व सावधान । धन्य तयाचें महिमान । जनीं राखे समा- धान । तोचि एक ॥ १४ ॥ चालनेचा आळस केला । तरी अवचितां पडेल घाला । ते वेळे सांवरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥ म्हणोन दीर्घसूच- नेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक । लोकांकरितां लोक । शहाणे होती ॥ १६ ॥ परी ते शहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे । अवगुण दे- खोन सांडावे । जनांमध्यें ॥ १७ ॥ मनुष्य पारखूं रहेना । आणि कोणाचें मन तोडीना । मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥ दिसे सक- ळांसि सारिखा । पाहतां विवेकीं नेटका । कामी निकामी लोकां । बरें पाहे ॥ १९ ॥ जाणोन पाहिजे सर्व । हेंचि तयाचें अपूर्व । ज्याचें त्यापरी गौ- रव । राखो जाणे ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विमललक्षणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. प्रत्यय. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका संसारासि आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो । सुचित्तपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥ काय म्हणते वासना । काय कल्पिते कल्पना । अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥ बरें खावें बरें जे- वावें । बरें ल्यावें बरें नेसावें । मनासारिखेंच असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥ ऐसें आहे मनोगत । परी तें कांहींच न होत । बरें करितां अकस्मात । वा- ईट होतें ॥ ४ ॥ एक सुखी एक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकीं । कष्टी होऊ- निया शेखीं । प्रारब्धावारि घालिती ॥ ५ ॥ अचूक यत्न करवेना । म्हणोन केलें तें सजेना । आपुला अवगुण जाणवेना । कांहीं केल्या ॥ ६ ॥ जो आपुला आपण नेणे । तो दुसऱ्याचें काय जाणे । न्याय सोडितां दैन्यवाणे । १. झाडावरील कीड. २. पाऊल उचलते. ३. मनुष्येतर जीव. ४. विचार.