भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 313, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 313

[२७८] श्रीदासबोध. [ दशक

होती लोक ॥ ७ ॥ लोकांचें मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्त्तवेना । मूर्खपणें लोकीं नाना । कलह उठती ॥ ८ ॥ मग ते कलह वाढती । पर- स्परें कष्टी होती । प्रयत्न राहतां अंतीं । श्रमचि होय ॥ ९ ॥ ऐसी नव्हे वर्तणुक । परीक्षावे नाना लोक । समजले पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥ १० ॥ शब्दपरीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं एक कळे दक्षा । मनोगत नेत- दक्षा । काय कळे ॥ ११ ॥ दुसऱ्यास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें । पाहों जातां लौकिक लक्षणें । बहुतैक ऐसीं ॥ १२ ॥ लोकीं बरें म्हणाया- कारणें । भल्यास लागतें सोसणें । न सोसितां भंडवाणें । सहजचि होय ॥ १३ ॥ आपणास जें मानेना । तेथें कदापि राहवेना । डैरी तोडून जा- वेना । कोणी एकें ॥ १४ ॥ बोलतो खरें चालतो खरें । त्यास मिळती ल- हान थोरें । न्याय अन्याय परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥ लोकांस कळेना तंववरी । विवेकें क्षमा जो न करी । तेणें करितां बराबरी । होत जाते ॥ १६ ॥ जंववरी चंदन झिजेना । तंववरी तो सुगंध कळेना । चंदन आणि वृक्ष नाना । संगत होती ॥ १७ ॥ जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काय कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदंतर ॥ १८ ॥ जगदंतर निव- ळत गेलें । जगदंतरीं सख्य झालें । तरी मग जाणावे वोळले । विश्वजन ॥ १९ ॥ जरी जनार्दन वोळला । तरी काय उणें तयाला । राजी राखावें सकळांला । कठिन आहे ॥ २० ॥ पेरितें तें उगवतें । उसणें द्यावें घ्यावें लागतें । वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥ लौकिकीं बरेपण केलें । तेणें सौख्य वाढलें । उत्तरासारिखें आलें । प्रत्युत्तर ॥ २२ ॥ हें अवघें आप- णापासीं । येथें बोल नाहीं जनांसी । शिकवावें आपुल्या मनासी । क्षणक्षणां ॥ २३ ॥ खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला । तरी मौनेंचि स्थळ- त्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥ लोक नाना परीक्षा जाणती । परी अंतरपरीक्षा नेणती । तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥ आप- णास आहे मरण । म्हणोन राखावें बरेपण । कठिन आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥ थोर लहान समान । आपुले पारिखे सकळ जन । चढतें वाढतें समाधान । करितां बरें ॥ २७ ॥ बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास


१. मूर्खास. २. बाजू. ३. भीड. ४. समान.