भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 314, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 314

१२ वा. ] देवभक्त. २७९ येतें । आतां पुढें सांगावें तें । कोणास काय ॥ २८ ॥ हरिकथा निरूपण । बरेपणें राजकारण । प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥ विद्या उदंडचि शिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके प्रत्ययनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. देवभक्त. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें बहुत लोक । तिहीं पाहावा विवेक । इहलोक आणि परलोक । बरा पाहावा ॥ १ ॥ इहलोक साधावयाकारणें । जाणत्याची संगति धरणें । परलोक साधावयाकारणें । सद्गुरु पाहिजे ॥ २ ॥ सद्गुरूसि काय पुसावें । हेंहि कळेना स्वभावें । अनन्यभावें एकभावें । दोन्ही गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥ दोन्ही गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण । त्या दों गोष्टींचें विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥ आधीं मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण । पंचीकरण¹ महावाक्य विवरण । केलेंचि करावें ॥ ५ ॥ सकळ केलियाचें फळ । शाश्वत ओळखावें निश्चळ । आपण कोण हा केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥ सारासार विचार घेतां । पदार्थास नाहीं शाश्वतता । आदिकारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥ निश्चळ चं- चळ आणि जड । अवघा मायेचा पेंवाड² । यामध्यें वस्तु जाड³ । जाणारे नाहीं ॥ ८ ॥ तें परब्रह्म धुंडावें । विवेकें त्रैलोक्य हिंडावें । मायिक विचारें खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥ खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें । मायेचें अवघेंचि जाणावें । रूप मायिक ॥ १० ॥ पंचभौतिक हे माया । मायिक जाय विलया । पिंड ब्रह्मांड अष्टकार्ये⁴ । नाशवंत ॥ ११ ॥ दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल । रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें ॥ १२ ॥ वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुकें जाईल । भूतांस भूत खा- ईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥ देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी प्रचीती । मनुष्यांविण उत्पत्ती । रेत कैंचें ॥ १४ ॥ अन्न नसतां रेत कैंचें । औषधी नसतां अन्न कैंचें । औषधीस जिणें कैंचें । पृथ्वी नसतां ॥ १५ ॥ १. पंचभूतांचा विचार. २. विस्तार. ३. श्रेष्ठ. ४. आठ शरीरें.