भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 315, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 315

आपें नसतां पृथ्वि नाहीं । तेज नसतां आप नाहीं । वायु नसतां तेज नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥ अंतरात्मा नसतां वायु कैंचा । विकार न- सतां अंतरात्मा कैंचा । निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥ पृथ्वी नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायु नाहीं । अंतरात्मा विकार नाहीं । नि- र्विकारीं ॥ १८ ॥ निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । अष्टधा प्रकृति संपूर्ण । नाशवंत ॥ १९ ॥ नाशवंत समजोन पाहिलें । तों तें असतांच नसतें झालें । सारासारें कळों आलें । समाधान ॥ २० ॥ विवेकें पाहिला विचार । मनास आलें सारासार । येणें करितां विचार । सढळ जाहला ॥ २१ ॥ शाश्वत देव तो निर्गुण । ऐशी अंतरीं बाणली खूण । देव कळला मी कोण । कळलें पाहिजे ॥ २२ मी कोण पाहिजे कळलें । देह- तत्व तितुकें शोधिलें । मनोवृत्तीच्या ठायीं आलें । मीतूं पण ॥ २३ ॥ सकळ- देहाचा शोध घेतां । मीपण दिसेना पाहतां । मीतूं पण हें तत्वतां । तत्त्वीं मावळलें ॥ २४ ॥ दृश्य पदार्थाचे वोसरे । तत्त्वें तत्व तेव्हां सरे । मीतूं पण कैंचें उरे । तत्वता वस्तु ॥ २५ ॥ पंचीकरण तत्वविवरण । महावाक्यें वस्तु आपण । निःसंगपणें निवेदन । केलें पाहिजे ॥ २६ ॥ देवभक्तांचें मूळ । शोधून पाहतां सकळ । उपाधीवेगळा केवळ । निरुपाधि आत्मा ॥ २७ ॥ मीपण तत्त्वीं बुडालें । विवेकें वेगळेपण गेलें । निवृत्तिपैदास प्राप्त झालें । उन्मनीपद ॥ २८ ॥ विज्ञानीं राहिलें ज्ञान । ध्येयीं राहिलें ध्यान । सकळ कांहीं कार्यकारण । पाहोनि सांडिलें ॥ २९ ॥ जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें । यमयातनेचें झालें । निसंतान ॥ ३० ॥ निर्बंध अवघाच तुटला । विचारें मोक्ष प्राप्त झाला । जन्म सार्थकचि वाटला । सकळही ॥ ३१ ॥ नाना किंतु निवारिले । धोके अवघेच तुटले । ज्ञानविवेकें पावन झाले । बहुत लोक ॥ ३२ ॥ पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास । ऐशी हे प्रतीत मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके देवभक्तनिरूपणं नाम तृतीयः स- मासः ॥ ३ ॥


१. पाणी. २. मोक्षास. ३. निर्विकल्प समाधि. ४. पतितोद्धारी श्रीहरीचे.