दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 317, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८२ श्रीदासबोध. [ दशक आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भाग्य । रामदास म्हणे योग्य । साधु जाणती ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विवेक- वैराग्यनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. आत्मनिवेदन. श्रीगणेशाय नमः ॥ १रेघेचें गुंडाळें केलें । मातृकोक्षरीं शब्द झाले । शब्द मिळवून चाले । श्लोक गद्य प्रबंध ॥ १ ॥ वेद शास्त्रं पुराणे । नाना काव्यें निरूपणें । ग्रंथभेद २अनुवादणें । किती म्हणोनी ॥ २ ॥ नाना ऋषि नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । भाषा लिपी जेथें तेथें । काय उणें ॥ ३ ॥ वर्ग ३ऋचा श्रुति स्मृती । अध्याय सर्ग स्तबक जाती । प्रसंगमानें समास पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥ नाना पदें नाना श्लोक । नाना बीर नाना क- डक । नाना साख्या दोहरे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥ डफगाणें माची- गाणें । दिंडीगाणें कथागाणें । नाना मानें नाना जैसणें । नाना खेळ ॥ ६ ॥ ध्वनि घोष नाद रेखा । चहूं वाचामध्यें देखा । वाचारूपेंहि ऐका । नाना- भेद ॥ ७ ॥ ५उन्मेष ६परा ध्वनि पश्यंती । नाद मध्यमा शब्द चौथी । 'वैख- रीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥ अकार उकार मकार । अर्धमा- त्रांचे अंतर । ७औटेंमात्रा तदनंतर । बावन ८मातृका ॥ ९ ॥ नाना भेद राग- ज्ञान । नृत्यभेद तान मान । अर्थभेद तत्वज्ञान । विवंचना ॥ १० ॥ तत्वां- मध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्ध सत्व । अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया ॥ ११ ॥ नाना तत्वें लहान थोरें । मिळोन अष्टहि शरीरें । अष्टधा प्रकृ- तीचें वारें । निघोन जातें ॥ १२॥ वारें नसतां गगन । तैसें परब्रह्म सघन । अष्टदेहांचें निरसन । करून पाहावें ॥ १३ ॥ ब्रह्मांडपिंडउभार । पिंड- ब्रह्मांडसंहार । दोहीं वेगळें सारासार । विमळ ब्रह्म ॥ १४ ॥ पदार्थ जड आत्मा चंचल । विमळ ब्रह्म तें निश्चळ । विवरोनि विवरे तात्काळ । तद्रूप १. रेषांचें गुंडाळें करून अक्षरें बनविलीं, अक्षरांपासून शब्द झाले. २. सांगणें. ३. वेदांतील वाक्यें म्हणजे ऋचा, व कांहींएक ऋचा मिळून वर्ग. ४. मनोरंजक गोष्टी. ५. अंतःस्फुरण. ६. उन्मेष ही परा, ध्वनि ही पश्यंती, नाद ही मध्यमा व शब्द ही वैखरी या चार वाणी. ७. साडेतीन अक्षरें, ॐकार. ८. अ ते ज्ञपर्यंत.