दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 318, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ वा.] सृष्टिक्रम. २८३ होय ॥ १५ ॥ पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघा देवाचा । जड आत्म- निवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥ चंचळकर्ती तो जगदीश । प्राणिमात्र त्याचा अंश । त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥ चंचळ आत्म- निवेदन । याचें सांगीतलें लक्षण । कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं ॥ १८ ॥ चंचळ चले स्वभाकार । निश्चळ देव तो निराकार । आत्मनिवेद- नाचा प्रकार । जाणिजे ऐसा ॥ १९ ॥ ठावचि नाहीं चंचळाचा । तेथें आधीं आपण कैंचा । निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा ॥ २० ॥ तिहीं प्रकारें आपण । नाहीं नाहीं दुजेपण । आपण नसतां मीपण । नाहींच कोठें ॥ २१ ॥ पाहतां पाहतां अनुमानलें । कळतां कळतां कळां आलें । पाहतां अवघें निवांत झालें । बोलणें आतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे द्वादशदशके आत्मनिवेदननिरूपणं नाम पंचमः समासः ॥५॥ ६. सृष्टिक्रम. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । शाश्वत अमल विमळ । अव- काश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥ तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें । तेथें येणें ना जाणें । शून्यातीत ॥ २ ॥ तें रचेना ना ख- चेना । तें होयना ना जायना । मायातीत निरंजना । पारचि नाहीं ॥ ३ ॥ पुढें संकल्प उठिला । षड्गुणेश्वर बोलिजे त्याला । अर्धनारीनटेश्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥ सर्वेश्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन । परेश परमात्मा जगज्जीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥ ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुण- क्षोभिणी । गुणत्रय तिजपासूनी । निर्माण झालें ॥ ६ ॥ पुढें विष्णु झाला निर्माण । जाणती कळा सत्वगुण । जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥७॥ पुढें जाणीव नेणीव मिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त । त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रयीं ॥ ८ ॥ पुढें रुद्र तमोगुण । सकळसंहाराचें कारण । सक- ळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥ तेथूनि पुढें पंचभूतें । पावलीं स्पष्टदशेतें । अष्टधा प्रकृतीचें स्वरूप तें । मुळींच आहे ॥ १० ॥ निश्चळीं १. सत्ता, धर्म, यश, संपत्ति, ज्ञान, आणि वैराग्य या सहा गुणांनीं युक्त. २. खालीं; संसारोत्पत्तीकडे. ३. दृश्य रूपास.