दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 320, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ वा.] विषयत्याग. २८५ बोलीं लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला । एक साहेब¹ नसतां कोणाला । मुशारा मागावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके सृष्टिकमानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. विषयत्याग. श्रीगणेशाय नमः ॥ न्यायनिष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें । मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥ बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवीत गेले । विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥ बोलणें एक चालणें एक । त्याचें नांव हीनविवेक² । येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥ विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं । ऐसें बोलणें ठायीं ठायीं । बरें पाहा ॥ ४ ॥ प्रपंची खाती जेविती । परमार्थी काय उपास करिती । उभयतां सारखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥ देह चालतां विषयत्यागी । ऐसा आहे कोण जगीं । त्याचा निर्वाह मजलागीं । देवें निरूपावा ॥ ६ ॥ विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा । ऐसें पाहतां गोवां । दिसतो कीं ॥ ७ ॥ ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता झाला । सावध होऊन मन घाला । एतद्विषयीं ॥ ८ ॥ वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग । प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥ मार्गे ज्ञानी होऊन गेले । तिहीं बहुत कष्ट केले । तरी मग विख्यात झाले । भूमंडळीं ॥ १० ॥ येरें मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न करितांचि मेलीं । कित्येक तीं भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥ वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं । शुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचें ॥ १२ ॥ ऐसे प्रकारिचे जन । आपणांस म्हणती सज्जन । पाहों जातां अनुमान³ । अवघेंच दिसे ॥ १३ ॥ जयास नाहीं अनुताप⁴ । हेंच एक पूर्व पाप । क्षणक्षणा विक्षेप⁵ । पराधिकपणें ॥ १४ ॥ मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जनां । खात्यास न खातें देखों शकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥ भाग्य पुरुष थोरथोर । त्यांस निंदिती दिवाळखोर । सांवास देखतां चोर । चरफडी जैसा ॥ १६ ॥ वैराग्या परतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य । १. धनी. २. विचारशून्य. ३. संशय. ४. वैराग्य. ५. मनाचें चांचल्य.