दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 321, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८६ श्रीदासबोध. [ दशक वैराग्य नसतां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥ प्रत्ययज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी । तो जाणिजे महायोगी । ईश्वरी पुरुष ॥ १८ ॥ अष्टसिद्धींची उपेक्षा । करून घेतली योगदीक्षा । घरोघरीं मागें भिक्षा । महादेव ॥ १९ ॥ ईश्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी । म्हणोनियां सगटसरी । होत नाहीं ॥ २० ॥ उदासवृत्ति आणि विवेक । त्यासि शोधिती सकळ लोक । जे लालची मूर्ख रंक । ते दैन्यवाणे ॥ २१ ॥ जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्ट झाले । विचार करूं विसरले । विषयलोभी ॥ २२ ॥ भजन तरी आवडेना । पुरश्चरण सहसा घडेना । भल्यास त्यास पटेना । एक निमिष ॥ २३ ॥ वैराग्यें करून भ्रष्टेना । ज्ञान भजन सोडीना । व्युत्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥ कष्ट करितां शेत पिके । उंच वस्तु तत्काळ विके । जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥२५॥ येर तें अवघेंच मंदलें । दुराशेनें खोटें झालें । कानकोंडें ज्ञान केलें । भ्रष्टाकार ॥ २६ ॥ सकळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें । विषयत्यागाचीं लक्षणें । वोळखावीं ऐसीं ॥२७॥ सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव । विवेकाचा अभिप्राय । विवेकी जाणती ॥२८॥ शूरत्वविषयीं खडतर । त्यास मानिती लहान थोर । कामगार आणि अंगचोर । एक कैसा ॥ २९ ॥ त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे । पिंड ब्रह्मांड सकळ जाणे । यथायोग्य ॥ ३०॥ ऐसा जो सर्व जाणता । उत्तम लक्षणीं तो पुरता । तयाचेनि सार्थकता । सहजचि होय ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे द्वादशदशके विषयत्यागनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. काल. श्रीगणेशाय नमः ॥ मूळ माया जगदीश्वर । पुढें अष्टधेचा विचार । सृ- ष्टिकमें आकार । आकारला ॥ १ ॥ हें अवघेंच नसतां निर्मळ । जैसें ग- गन अंतराळ । निराकारीं काळ वेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥ उपाधीचा विस्तार झाला । तेणें काळ दिसोन आला । येन्हवीं पहातां काळाला । ठा- वचि नाहीं ॥ ३ ॥ एक चंचल एक निश्चळ । या वेगळा कोठें सकळ । चं- १. अनुभवी. २. वैराग्यशील. ३. शास्त्रज्ञानी. ४. विलासाचे; आकर्षक.