दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 322, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ वा.] काल. २८७ चळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥ आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास । त्या विलंबरूप काळास । जाणोन घ्यावें ॥ ५ ॥ सूर्याकरितां विलंब कळे¹ । गणना सकळांची आकळे । पळापासून निवडेले । युगपर्यंत ॥ ६ ॥ पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष² मास । षण्मास वर्ष युगास । ठाव जाहला ॥ ७ ॥ कृत त्रेत द्वापार केली । संख्या चालली भूमंडळीं । देवाचीं आयुष्यें आगळीं³ । शास्त्रीं निरूपिलीं ॥ ८ ॥ ते देवत्र- याची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट । दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥ मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना । कोण थोर कोण शहाणा । कैसा म्हणावा ॥ १० ॥ असो हें जाणत्याचीं कामें । नेणता उगाचि गुंते भ्रमें । प्रत्यय जाणोनि वर्में । ठायीं पाडावीं ॥ ११ ॥ उत्पत्तिकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संहारकाळ । आद्यंत अवघा काळ । विलंबरूप ॥ १२ ॥ जें जें जये प्रसंगीं झालें । तेथें काळाचें नांव पडलें । बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥ पर्जन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोशकाळ । सुखदुःख आनंदकाळ । प्रत्यय येतो ॥ १४ ॥ प्रातः- काळ मध्यान्हकाळ । सायंकाळ वसंतकाळ । पर्वकाळ कठिणकाळ । जा- णिजे लोकीं ॥ १५ ॥ जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृद्धापकाळ । अंतकाळ विषमकाळ । वेळरूपें ॥ १६ ॥ सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोष- काळ पुण्यकाळ । सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥ असतें एक वाटतें एक । त्याचें नांव हीनविवेक । नाना⁴ प्रवृत्तीचे⁵ लोक । प्र- वृत्ति जाणती ॥ १८ ॥ प्रवृत्ति चाले अधोमुखें । निवृत्ति धावें ऊर्ध्वमुखें । ऊर्ध्वमुखें नानामुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥ ब्रह्मांडरचना जेथूनि झाली । तेथें विवेकी दृष्टि घाली । विवरतां विवरतां लाधली । पूर्वापार स्थिति ॥ २० ॥ प्रपंचीं असोन परमार्थ पाहे । तो हे स्थितींतें लाहे । प्रारब्धयोगें- करून राहे । लोकांमध्ये ॥ २१ ॥ सकळांचें एकाचि मूळ । एक जाणते एक बाष्कळ । विवेकेंकरून तात्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥ तरीच जन्माचें सार्थक । भले पाहती उभयलोक । कारण मूळींचा विवेक । केला पाहिजे ॥ २३ ॥ विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान । त्यांचें ऐकतां १. ओळखते २. पंधरवडा. ३. अधिक. ४. निरनिराळी. ५. व्यवहाराचे.