दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 323, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंभाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥ बरें आमचें काय गेलें । जें केलें तें फळास आलें । पेरिलें तें उगवलें । भोगती आतां ॥ २५॥ पुढेंहीू करी तो पावे । भक्ति- योगें भगवंत फावे । देवभक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥ कीर्ति करून मेले । उगेचि आले आणि गेले । शाहाणे होऊन अमले । काय सांगावें ॥ २७॥ येथील येथें अवघेंचि राहतें । ऐसें प्रत्ययास येतें । कोण काय घेऊनि जातें । सांगाना कां ॥ २८ ॥ ¹पैदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकाश । येणें करितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥ जगदीशपरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं । संसार करित असतांही । समाधान ॥ ३० ॥ मागां होते जन- कादिक । राज्य करितही अनेक । तैसेचि आतां ²पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥ राजा असतां मृत्यु आला । लक्ष कोटी कबूल झाला । तरी सो- डीना तयाला । मृत्यु कांहीं ॥ ३२ ॥ ऐसें पराधीन जिणें । यामध्यें दुखणें वाहणें । नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनी ॥ ३३ ॥ ³हाट भरला संसाराचा । नफा पहावा देवाचा । तरीच या कष्टाचा । परिहार होतो ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके कालनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. यत्नशिक्षा. श्रीगणेशाय नमः ॥ दुर्बळ ⁴नैचारी वोडगस्त । आळसी खादाड ऋण- ग्रस्त । मूर्खपणें अवघें अव्यवस्थ । कांहींच नाहीं ॥ १ ॥ खाया नाहीं जे- वाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं । आंथराया नाहीं पांघराया नाहीं । खोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥ सोयरें नाहीं धायरें नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं । पाहतां कोठें ओळख नाहीं । आश्रयेंविण परदेशी ॥ ३ ॥ तेणें कैसें करावें । काय जीवेसि धरावें । वांचावें कीं मरावें । कोणत्या प्रकारें ॥ ४ ॥ ऐसें कोणी एकें पुसिलें । कोणी एकें उत्तर दीधलें । श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां ॥ ५ ॥ लहान थोर काम नाहीं । केल्याविणें होत नाहीं । करंट्या सावध पाहीं । ⁵सदैव होसी ॥ ६ ॥ अंतरीं नाहीं सावधानता । यत्न ठाकेना पुरता । सुख संतोषाची वार्ता । येथें कैंची ॥ ७ ॥ म्हणोनि
१. सर्व वस्तूंबर. २. पुण्यवान् महात्मे. ३. बाजार. ४. दुर्वर्तनी. ५. भाग्यवान्.