दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 333, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंविजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥ पर्वतप्राय पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा । निबिड तया अंधकारा । उपमाच नाहीं ॥ १५ ॥ सिंधु नद्या एकवटल्या । भेणें नभींहूनि रिचवल्या । संधी नाहीं धारा मिळाल्या अखंड पाणी ॥ १६ ॥ तेथें मत्स्य कूर्म सर्प पडती । पर्वतासारखे दिसती गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥ सप्त सिंधु आवरणीं गेले आवरण वेढे मोकळे झाले । जळरूप झालिया खवळले । प्रलयपावक ॥ १८ ॥ ब्रह्मांडा ऐसा तप्त लोहो । शोषी जलाचा समूहो । तैसें जळ झालें पाहो । अपूर्व मोठें ॥ १९ ॥ तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजला वन्ही । तया वन्हीस केली झडपणी । प्रलयवातें ॥ २० ॥ दीपासी पालवें घातला । तैसा प्रलयपावक विझाला । पुढें वायु प्रबळला । असं- भाव्य ॥ २१ ॥ उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा । पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥ महद्भूत मूळमाया । विस्मरणें वितुळे काया । पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥ दृश्य हलक- ल्लोळें नेलें । जड चंचळ वितुळलें । या उपरि शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रलयनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. काहाणी. श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन । कालक्रमणे लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥ श्रोता पुसे वक्तयासी । का- हणी सांगा बरवीसी । वक्ता म्हण श्रोतयांसी । सावध ऐका ॥ २ ॥ एक स्त्रीपुरुषें होतीं । उभयतांमध्ये बहु प्रीती । एकरूपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥ ऐसा कांहींएक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणी भला । सर्वविषयीं ॥ ४ ॥ पुढें त्यासही झाला कुमर् । तो पित्याहून आतुर । कांहीं तदर्थ चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥ तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥ त्याचा १. ओतल्या. २. फुंकर. ३. हाहाकारें. ४. प्रकृति व पुरुष. ५. सत्वगुण; विष्णु. ६. रजोगुण; ब्रह्मा. ७. चंचल. ८. बापाच्या निमे. ९. कर्तृत्वानें.