दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 332, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३ वा.] प्रलय. २९७ बोलिला प्रकार । आतां विस्ताराचा संहार । तोही ऐका ॥ २० ॥ मुळा- पासून शेवटवरी । अवघा अंतरात्माचि करी । करी आणि विवरी । यथा- योग्य ॥ २१॥ पुढें संहार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला । इतुक्त्या उपरी झाला । समास पूर्ण ॥ २२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके उभारणीनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. प्रलय. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत । ऐसा समाचार साद्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥ शतवर्ष अनावृष्टी । तेणें जळेल हे सृष्टी । पर्वत माती ऐसी पृष्ठी² । भूमीची तडके ॥ २ ॥ बारा कळीं सूर्यमंडळा । किरणापासूनी निघती ज्वाळा । शत वर्षें भूगोळा । दहन होय ॥ ३ ॥ सिंदूरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरां³ । तो आहोंळोन⁴ सरारां । विष वमी ॥ ४ ॥ त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती । महापावकें⁵ भस्म होती । पाताळलोक ॥ ५ ॥ तेथें महा- भूतें खवळती । प्रलयवात सुटती । प्रलयपावक वाढती । चहूकडे ॥ ६ ॥ तेथें अक्रा रुद्र खवळले । बारां⁶ सूर्य कडाडिले । पावकमात्र एकवटिले । प्रलयकाळीं ॥ ७ ॥ वायु विजांचे तडाके । तेथें पृथ्वी अवघीच तडके । कठिनत्व अवघेंचि फांके । चहूकडे ॥ ८ ॥ तेथें मेरूची कोण गणना । कोण सांभाळील कोणा । चंद्र सूर्य तारागणा । मूस जाहली ॥ ९ ॥ पृथ्वीनें विरी⁷ सांडिली । अवघी धगधगायमान झाली । ब्रह्मांडभट्टी जळोन गेली । एकसरा ॥ १० ॥ जळानें विरी⁷ सांडिली । विशेष महावृष्टि झाली । तेणें पृथ्वी मिळाली । जळामध्यें ॥ ११ ॥ भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे । विरी सांडूनियां त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥ शेष कूर्म वराह गेला । पृथ्वीचा आधार तुटला । सैंधव सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३ ॥ तेथें प्रलयमेघ उचलले । कठिन घोरें गर्जिन्नले । अखंड १. नासतील. २. पृष्ठभाग. ३. शेषाला. ४. पोळून जाऊन ५. प्रलयाग्नीनें. ६. मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषा, हिरण्यगर्भ, मरीचि, आदित्य, सविता, अर्क, व भास्कर हे बारा सूर्य. ७. शक्ति, जिवटपणा.