भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१३ वा.] प्रलय. २९७ बोलिला प्रकार । आतां विस्ताराचा संहार । तोही ऐका ॥ २० ॥ मुळा- पासून शेवटवरी । अवघा अंतरात्माचि करी । करी आणि विवरी । यथा- योग्य ॥ २१॥ पुढें संहार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला । इतुक्त्या उपरी झाला । समास पूर्ण ॥ २२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके उभारणीनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. प्रलय. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीस होईल अंत । भूतांस मांडेल कल्पांत । ऐसा समाचार साद्यंत । शास्त्रीं निरोपिला ॥ १ ॥ शतवर्ष अनावृष्टी । तेणें जळेल हे सृष्टी । पर्वत माती ऐसी पृष्ठी² । भूमीची तडके ॥ २ ॥ बारा कळीं सूर्यमंडळा । किरणापासूनी निघती ज्वाळा । शत वर्षें भूगोळा । दहन होय ॥ ३ ॥ सिंदूरवर्ण वसुंधरा । ज्वाळा लागती फणिवरां³ । तो आहोंळोन⁴ सरारां । विष वमी ॥ ४ ॥ त्या विषाच्या ज्वाळा निघती । तेणें पाताळें जळती । महापावकें⁵ भस्म होती । पाताळलोक ॥ ५ ॥ तेथें महा- भूतें खवळती । प्रलयवात सुटती । प्रलयपावक वाढती । चहूकडे ॥ ६ ॥ तेथें अक्रा रुद्र खवळले । बारां⁶ सूर्य कडाडिले । पावकमात्र एकवटिले । प्रलयकाळीं ॥ ७ ॥ वायु विजांचे तडाके । तेथें पृथ्वी अवघीच तडके । कठिनत्व अवघेंचि फांके । चहूकडे ॥ ८ ॥ तेथें मेरूची कोण गणना । कोण सांभाळील कोणा । चंद्र सूर्य तारागणा । मूस जाहली ॥ ९ ॥ पृथ्वीनें विरी⁷ सांडिली । अवघी धगधगायमान झाली । ब्रह्मांडभट्टी जळोन गेली । एकसरा ॥ १० ॥ जळानें विरी⁷ सांडिली । विशेष महावृष्टि झाली । तेणें पृथ्वी मिळाली । जळामध्यें ॥ ११ ॥ भाजला चुना जळीं विरे । तैसा पृथ्वीस धीर न धरे । विरी सांडूनियां त्वरें । जळीं मिळाली ॥ १२ ॥ शेष कूर्म वराह गेला । पृथ्वीचा आधार तुटला । सैंधव सांडून जळाला । मिळोन गेली ॥ १३ ॥ तेथें प्रलयमेघ उचलले । कठिन घोरें गर्जिन्नले । अखंड १. नासतील. २. पृष्ठभाग. ३. शेषाला. ४. पोळून जाऊन ५. प्रलयाग्नीनें. ६. मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषा, हिरण्यगर्भ, मरीचि, आदित्य, सविता, अर्क, व भास्कर हे बारा सूर्य. ७. शक्ति, जिवटपणा.

विजा कडकडिले । ध्वनि घोष ॥ १४ ॥ पर्वतप्राय पडती गारा । पर्वत उडती ऐसा वारा । निबिड तया अंधकारा । उपमाच नाहीं ॥ १५ ॥ सिंधु नद्या एकवटल्या । भेणें नभींहूनि रिचवल्या । संधी नाहीं धारा मिळाल्या अखंड पाणी ॥ १६ ॥ तेथें मत्स्य कूर्म सर्प पडती । पर्वतासारखे दिसती गर्जना होतां मिसळती । जळांत जळें ॥ १७ ॥ सप्त सिंधु आवरणीं गेले आवरण वेढे मोकळे झाले । जळरूप झालिया खवळले । प्रलयपावक ॥ १८ ॥ ब्रह्मांडा ऐसा तप्त लोहो । शोषी जलाचा समूहो । तैसें जळ झालें पाहो । अपूर्व मोठें ॥ १९ ॥ तेणें आटोन गेलें पाणी । असंभाव्य माजला वन्ही । तया वन्हीस केली झडपणी । प्रलयवातें ॥ २० ॥ दीपासी पालवें घातला । तैसा प्रलयपावक विझाला । पुढें वायु प्रबळला । असं- भाव्य ॥ २१ ॥ उदंड पोकळी थोडा वारा । तेणें वितळोन गेला सारा । पंचभूतांचा पसारा । आटोपला ॥ २२ ॥ महद्भूत मूळमाया । विस्मरणें वितुळे काया । पदार्थमात्र राहावया । ठाव नाहीं ॥ २३ ॥ दृश्य हलक- ल्लोळें नेलें । जड चंचळ वितुळलें । या उपरि शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रलयनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. काहाणी. श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक दोघे जण । पृथ्वी फिरती उदासीन । कालक्रमणे लागून । कथा आरंभिली ॥ १ ॥ श्रोता पुसे वक्तयासी । का- हणी सांगा बरवीसी । वक्ता म्हण श्रोतयांसी । सावध ऐका ॥ २ ॥ एक स्त्रीपुरुषें होतीं । उभयतांमध्ये बहु प्रीती । एकरूपेंचि वर्तती । भिन्न नाहीं ॥ ३ ॥ ऐसा कांहींएक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणी भला । सर्वविषयीं ॥ ४ ॥ पुढें त्यासही झाला कुमर् । तो पित्याहून आतुर । कांहीं तदर्थ चतुर । व्यापकपणें ॥ ५ ॥ तेणें व्याप उदंड केला । बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नाना प्रकारें ॥ ६ ॥ त्याचा १. ओतल्या. २. फुंकर. ३. हाहाकारें. ४. प्रकृति व पुरुष. ५. सत्वगुण; विष्णु. ६. रजोगुण; ब्रह्मा. ७. चंचल. ८. बापाच्या निमे. ९. कर्तृत्वानें.

पुत्र जो ज्येष्ठ¹. तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकतां नीट । संहार करी ॥ ७ ॥ पिता² उगाच बैसला । लेकें³ बहुत व्याप केला । सर्व जाणता भला । ज्येष्ठ पुत्र⁴ ॥ ८ ॥ नातू त्याचें अर्थ जाणे । पणतूं तो कांहींच नेणे । चुकतांचि संहारणें । महाक्रोधी ॥ ९ ॥ लेंकें सकळांचें पाळण करी । नातू मेळवी वरच्या⁵वरी । पणतूं चुकल्या संहार करी । अकस्मात ॥ १० ॥ नेम- स्तपणें वंश वाढला । विस्तार उदंडचि झाला । ऐसा बहुत काळ गेला । आनंदरूप ॥ ११ ॥ विस्तार वाढला गणवेना । वडिलांस कोणीच मानीना । परस्परें किंतु मना । बहुत पडिले ॥ १२ ॥ उदंड घरकलह लागला । तेणें कित्येक संहार झाला । विपर्त⁶ पडिलें थोर थोरांला । बेबंद जाहलें ॥ १३ ॥ नेणपणें भरीं भरले । मग ते अवघे संहारले । जैसे यादव निमाले । उन्मत्त- पणें ॥ १४ ॥ बाप लेंकें नातू पणतूं । सकळांचा झाला निःपातु । कन्यापुत्र हेतुमातू⁷ । अणुमात्र नाहीं ॥ १५ ॥ ऐसी काहाणी जो विवरला । तो जन्म- मृत्युपासून सुटला । श्रोता वक्ता धन्य झाला । प्रचीतीनें ॥ १६ ॥ ऐसी काहाणी अपूर्व जे ते । उदंड वेळ होते जाते । इतुकें बोलून गोसावी ते । निवांत जाहले ॥ १७ ॥ आमची काहाणी सरो । तुमचे अंतरीं भरो । ऐसें हें बोलणें विवरो । कोणी तरी ॥ १८ ॥ चुकत वाकत आठवलें । तितुकें संकाळित बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ १९ ॥ ऐसी काहाणी निरंतर । विवेकें ऐकती नर । दास म्हणे जगदुद्धार । तेचि करिती ॥ २० ॥ त्या जगदुद्धाराचें लक्षण । केलें पाहिजे विवरण । सार निवडावें निरूपण । यासी बोलिजे ॥ २१ ॥ निरूपणीं प्रत्ययें विवरावें । नाना तत्व- कोडें उकलावें । समजतां समजतां व्हावें । निःसंदेह ॥ २२ ॥ विवरोन पाहतां अष्टदेह । पुढें सहजाचि निःसंदेह । अखंड निरूपणें राहे । समाधान ॥ २३ ॥ तत्त्वांचा गलबला जेथें । निवांत कैसें असेल तेथें । या कारणें गुलि⁸- परतें । कोणी एकें असावें ॥ २४ ॥ ऐसा सूक्ष्म संवाद । केलाचि करावा विशद । पुढिले समासीं लघुबोध । सावध ऐका ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके काहाणीनिरूपणं नाम पंचम समासः ॥ ५ ॥ १. तमोगुण; शंकर. २. मूळ पुरुष. ३. सत्त्वगुण; विष्णु. ४. रजोगुण; ब्रम्हा. ५. पुनःपुन्हा. ६. वांकडें. ७. कन्यापुत्रांचा हेतु किंवा गोष्ट. ८. गलबल्यापासून दूर.

३०० श्रीदासबोध. [ दशक ६. लघुबोध. श्रीगणेशाय नमः ॥ जे जे बोलिजेती पंचतत्त्वें । त्यांचीं अभ्यासावीं नांवें । तदुपरी स्वानुभवें । रूपें जाणावीं ॥ १ ॥ यामध्यें शाश्वत कोण । आणि अशाश्वत कोण । ऐसें करावें विवरण । प्रत्ययाचें ॥ २ ॥ पंचभूतांचा विचार । नांव रूप सारासार । तोचि बोलिजेल निर्धार । सावध ऐका ॥३॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । नांवें बोलिलीं सावकाश । आतां रूपाचा विश्वास । श्रवण करावा ॥ ४ ॥ पृथ्वी म्हणिजे ते धरणी । आप म्हणिजे तें पाणी । तेज म्हणिजे अग्नि तरणी² । सतेजादिक ॥ ५ ॥ वायु म्हणिजे तो वारा । आकाश म्हणिजे पैस सारा । आतां शाश्वत तें विचारा । आपुले मनीं ॥ ६ ॥ एक शीत चांचपावें । म्हणिजे वर्म पडे ठावें । तैसें थोडया अनुभवें । बहुत जाणावें ॥ ७ ॥ पृथ्वी रचते आणि खचते । हें तों प्रत्य- यास येतें । नाना रचना होत जाते । सृष्टीमध्यें ॥ ८ ॥ म्हणोन रचतें तें खचतें । आप तेंहि आटोन जातें । तेजहि प्रगटोन विझतें । वारेंही न राहे ॥ ९ ॥ अवकाश नाममात्र आहे । तेंहि विचारितां न राहे । एवं पांच- भौतिक राहे । हें तों घडेना ॥ १० ॥ ऐसा पांच भूतांचा विस्तार । नाश- वंत हा निर्धार । शाश्वत आत्मा निराकार । सत्य जाणावा ॥ ११ ॥ तो आत्मा कोणास कळेना । ज्ञानेंविण आकळेना । म्हणोनिया संतजनां । वि- चारावें ॥ १२ ॥ विचारितां सज्जनांसी । ते म्हणती कीं अविनाशी । जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंच नये ॥ १३ ॥ निराकारीं भासे आकार । आणि आकारीं भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेकें ओळखावा ॥ १४ ॥ निराकार म्हणावा नित्य । आकार म्हणावा अनित्य । यासि बो- लिजे नित्यानित्य । विचारणा ॥ १५ ॥ सारीं भासे असार । आणि असारीं भासे सार । सारासार विचार । शोधून पाहतां ॥ १६ ॥ पांचभौतिक तें मा- यिक । परंतु भासे अनेक । आणि आत्मा एक । व्यापून असे ॥ १७ ॥ चहूं भूतांमध्ये गगन । तैसें गगनीं असे सघन³ । नेहैटून⁴ पाहतां अभिन्न⁵ । गगन आणि वस्तु ॥ १८॥ उपाधियोगेंचि आकाश । उपाधि नसतां निराभास । निरा-- १ शिंगणवाडी येथे शिवाजी महाराजांस श्रीसमर्थांनीं हा उपदेश केला, असें म्हणतात. २. सूर्य. ३. दाट. ४. बारकाईनें. ५. एकच.

१३ वा. ] प्रत्यय. ३०१ भास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥ आतां असो हे विवंचना । परंतु जें पाहतां नासेना । तगे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥ परमात्मा तो निराकार । जाणिजे हाचि विचारसार । आणि आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे ॥ २१ ॥ देहास अंत येतां । वायु जातो तत्वतां । लटिकें म्हणाल तरी आतां । श्वासोच्छ्वास धरावा ॥ २२ ॥ श्वास कोंडतां देह पडे । देह पडतां म्हणती मडें । मड्यास कर्तव्य न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥ देहावेगळा वायु न करी । वायुवेगळा देह न धरी । विचार पाहतां कांहींच न करी । एका वेगळें एक ॥ २४ ॥ उगेंच पाहतां मनुष्य दिसे । विचार घेतां कांहींच नसे । अभेदभक्तीचें लक्षण ऐसें । ओळखावें ॥ २५ ॥ कर्ता आपण ऐसें म्हणावें । तरी आपले इच्छेसारिखें व्हावें । इच्छेसारिखें न होतां मानावें । अवघेंचि वाव ॥ २६ ॥ म्हणोन कर्ता नव्हे कीं आपण । तेथें भोक्ता कैंचा कोण । हेंचि विचाराचें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥ अविचार आणि विचार । जैसा प्रकाश आणि अंधकार । विकार आणि निर्विकार । एक नव्हे कीं ॥ २८ ॥ जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच चालेना । खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥ प्रत्ययासि बोलिजे न्याय । अप्रत्यय तो अन्याय । जात्यंधास१ परीक्षा काय । नाना रत्नांची ॥ ३० ॥ म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणासि अनन्य । आत्मनिवेदनें मान्य । परम पुरुष ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके लघु- बोधनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. प्रत्यय. श्रीगणेशाय नमः ॥ निर्मळ निश्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश । आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥ आधीं पैस मग पदार्थ । प्रत्यक्ष पाहतां यथार्थ । प्रत्यक्षेविण पाहतां व्यर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥ ब्रह्म म्हणिजे तें निश्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचल । तयास दृष्टांत के- वळ । वायु जाणावा ॥ ३ ॥ घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटीं बिंब दृष्टांत आत्म्याचा । विवरितां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥ भूत म्हणिजे जि- १. जन्मांधास. २. देहसमर्पण केल्यानें.

३०२ श्रीदासबोध. [ दशक तुकें झालें । झालें तितुकें निमालें । चंचळ आलें आणि गेलें । ऐसें जाणावें ॥ ५ ॥ अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ । दोन्ही ज- ळोन तात्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥ ब्रह्म आकाश निश्चळ जाती । आत्मा वायु चंचळ जाती । परीक्षवंत परीक्षिती । खरें कीं खोटें ॥ ७ ॥ जड अ- नेक आत्मा एक । ऐसा आत्मानात्मविवेक । जगा वर्तवी जगन्नायक । तयास म्हणावें ॥ ८ ॥ जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वी वर्ते सर्वात्मा । अवघा मिळोन चंचळ आत्मा । निश्चळ नव्हे ॥ ९ ॥ निश्चळ तें परब्रह्म । तेथें नाहीं दृश्यभान । विमळ ब्रह्म तें निर्भ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥ आधीं आत्मानात्मविवेक थोर । मग सारासारविचार । सारासारविचारें संहार । प्रकृतीचा ॥ ११ ॥ विचारें प्रकृति संहारे । दृश्य असतांच वोसरे । अंत- रात्मा निर्गुणीं संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥ चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला । उतरल्या अर्थे उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥ अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो । अनुमानें संदेहीं पडतो । कांहीं एक ॥ १४ ॥ निःसंदेह अर्थ चालिला । तरी आत्मा निः- संदेहचि झाला । अनुमान अर्थे झाला । अनुमानरूपी ॥ १५ ॥ नवरसिकं अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि झाले । चाटपणें होऊन गेले । चाटाचि अवघे ॥ १६ ॥ जैसा जैसा पडे प्रसंग । तैसे गुहिऱ्यांचे रंग । या कारणें उत्तम मार्ग पाहोन । धरावा ॥ १७ ॥ उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाका- रचि झालें । लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥ पदार्थ- वर्णन आवघें । किती म्हणोन सांगावें । परंतु अंतरीं समजावें । होय कीं नव्हे ॥ १९ ॥ जें जें देखिलें आणि ऐकिलें । तें अंतरीं सदृढ बैसलें । हित अनहित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥ या कारणें सर्व सांडावें । एक दे- वास धुंडावें । तरी वर्म पडे ठावें । कांहीं एक ॥ २१ ॥ नाना सुखें देवें केलीं । लोकें तयास चुकलीं । ऐसीं चुकतांच मेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥ सर्व सांडून शोधा मजला । ऐसा देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ॥ २३ ॥ म्हणोनि नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती । मनीं सुखचि इच्छिती । परी तें कैंचें ॥ २४ ॥ उदंड सुख जया

१ . सरड्याचे. २. 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज'-गीता, अ. १८.

१३ वा.] कर्तूलक्षण. ३०३ लांगलें । वेडे तयास चुकले । सुख सुख म्हणतांच मेले । दुःख भोगीत ॥ २५ ॥ शाहण्यानें ऐसें न करावें । सुख होय तेंचि करावें । देवास धुं- डीत जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥ मुख्य देवचि ठायीं पडला । मग काय उणें तयाला । लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥ २७॥ विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख । यांत मानेल तें अवश्य । केलें पा- हिजे ॥ २८ ॥ कत्यांसि ओळखावें । यासि विवेक म्हणावें । विवक सां- डितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥ आतां असो हें बोलणें । कत्यांस ओळ- खणें । आपलें हित विचक्षणें २ । चुकों नये ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रत्ययनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. कर्तृलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । कोण कर्ता निश्चयेंसी । सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥ तंव बोलिले सभानायक । जे बोलिके एकाहून एक । या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर परिसावें ॥ २॥ एक म्हणती कर्ता देव । एक म्हणती कोण देव । आपुलाला अभिप्राय । सृष्टीमध्यें बोलती ॥ ३ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थे बोलती स्पष्ट । आपुलाली उपासना ३ श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४॥ कोणी एक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती ४ । एक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥ एक म्ह- णती कर्ता भैरव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती बरिदेव । एक म्हणती भगवती ॥ ६ ॥ एक म्हणती नरहरी । एक म्हणती बनशंकरी । एक म्हणती सर्व करी । नारायण ॥ ७ ॥ एक म्हणती श्रीराम कर्ता । एक म्ह- णती श्रीकृष्ण कर्ता । एक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥ एक म्हणती पांडुरंग । एक म्हणती श्रीरंग । एक म्हणती झोटिंग । सर्व करी ॥ ९ ॥ एक म्हणती मुंज्या कर्ता । एक म्हणती सूर्य कर्ता । एक म्हणती अग्नि कर्ता । सर्व कांहीं ॥ १० ॥ एक म्हणती लक्ष्मी करी । एक म्हणती मारुती करी । एक म्हणती धरित्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥ एक म्हणती तुकाई । एक म्हणती यमाई । एक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥ १. वृक्षाला फळें लागतात तसें. २. शहाण्यानें. ३. उपास्य दैवत. ४. गणपती.

एक म्हणती भार्गव कर्ता । एक म्हणती वामन कर्ता । एक म्हणती पर- मात्मा कर्ता । एकाचि आहे ॥ १३ ॥ एक म्हणती विरंणी कर्ता । एक म्ह- णती बस्र्वणी कर्ता । एक म्हणती रेवंणी कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥ एक म्हणती रवळैया कर्ता । एक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता । एक म्हणती व्यं- कटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥ एक म्हणती गुरु कर्ता । एक म्हणती दत्त कर्ता । एक म्हणती मुख्य कर्ता । वोढैया जगन्नाथ ॥ १६ ॥ एक म्हणती ब्रह्मा कर्ता । एक म्हणती विष्णु कर्ता । एक म्हणती महेश कर्ता । निश्च- येंसी ॥ १७ ॥ एक म्हणती पर्जन्य कर्ता । एक म्हणती वायु कर्ता । एक म्हणती करून अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥ एक म्हणती माया करी । एक म्हणती जीव करी । एक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥ एक म्हणती प्रयत्न करी । एक म्हणती स्वभाव करी । एक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥ ऐसा कत्यांचा विचार । पुसतां भरला बाजार । आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥ जिहीं जो देव मानिला । कर्ता म्ह- णती तयाला । ऐसा लोकांचा गलबला । बोसरेना ॥ २२ ॥ आपुलाल्या साभिमानें । निश्चय केला मनें । याचा विचार पाहणें । घडेचिना ॥ २३ ॥ बहुत लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार । परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । निश्चयें तोडावें अनुमान । प्रत्ययें मानावें प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥ जें जें कर्त्यानें केलें । तें तें त्या उपरी झालें । कर्त्या पूर्वी आढळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥ केलें तें पांच- भौतिक । आणि पांचभौतिक ब्रह्मादिक । तरी भूतांशीं पांचभौतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥ पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें । पां- चभौतिक स्वभावें । कर्त्यांत आलें ॥ २८ ॥ पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण । निर्विकारासि विकार कोण । लावूं शके ॥ २९ ॥ निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण झाल्यांत सांपडे । आतां कर्तव्यता कोणीकडे । पडे पाहा ॥ ३० ॥ लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण । म्हणोन हें प्रमाण । जें स्वभावेंचि जाहलें ॥ ३१ ॥ एक सगुण एक निर्गुण । कोठें लावूं कर्तेपण । या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥ सगुणें सगुण केलें । तरी


१. जैन लोकांचे देव. २. कोंकणांतील एक दैवत. ४. ओढ्या प्रांतांतील.

१३ वा. ] आत्मविवरण. ३०५ तें पूर्वींच आहे झालें । निर्गुणास कर्तव्य लाविलें । न वचे कदा ॥ ३३ ॥ येथें कर्ता दिसेना । प्रत्यय आणावा अनुमाना । दृश्य सत्यत्वें असेना । म्हणोनियां ॥ ३४ ॥ केलें तें अवघेंचि लटिकें । तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें । वक्ता म्हणे रे विवेकें । बरें पाहा ॥ ३५ ॥ बरें पाहातां प्रत्यय आला । तरी कां करावा गलबला । प्रचीत आलिया आपणाला । अंतर्यामीं ॥ ३६ ॥ आतां असो हें बोलणें । विवेकी तोचि हें जाणे । पूर्वपक्ष¹ लागे उडवणें । येन्हवीं अनिर्वाच्य ॥ ३७ ॥ तंव श्रोता करी प्रश्न । देहीं सुखदुःख भोक्ता कोण । पुढें हेंचि निरूपण । बोलिलें असे ॥ ३८ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके कर्तृलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥

९. आत्मविवरण. श्रीगणेशाय नमः ॥ आत्म्यास शरीरयोगें । उद्वेग चिंता करणें लागे । शरीरयोगें आत्मा तगे । हें तों प्रगटचि आहे ॥ १ ॥ देह अन्नाचिखाईना । तरी आत्मा कदापि तगेना । आत्म्याविण चेतना । देहास कैंची ॥ २ ॥ हें एका वेगळें एक । करूं जातां निरर्थक । उभययोगें कोणी एक । कार्य चाले ॥ ३ ॥ देहाला नाहीं चेतना । आत्म्यास पदार्थ उचलेना । स्वप्न- भोजनें भरेना । पोट कांहीं ॥ ४ ॥ आत्मा स्वप्न अवस्थेंत जातो । परंतु देहामध्येंहि असतो । निदसुरेपेंणें² खाजवितो । चमत्कार पाहा ॥ ५ ॥ अन्न- रसें वाढे शरीर । शरीराप्रमाणें विचार । वृद्धपणीं तदनंतर । दोन्ही लहा- नाळती³ ॥ ६ ॥ उन्मत्तें⁴ द्रव्यें देह खातो । देहयोगें आत्मा झुलतो । विस्म- रणें शुद्धि सांडितो । सकळ कांहीं ॥ ७ ॥ देहानें घेतलें विष । आत्मा जाय सावकाश । वाढणें मोडणें आत्म्यास । नेमस्त आहे ॥ ८ ॥ वाढणें मो- डणें जाणें येणें । सुखदुःख देहाचेनि गुणें । नाना प्रकारें भोगणें । आत्म- यासि घडे ॥ ९ ॥ वारूळ म्हणिजे पोकळ । मुंग्यांचे मार्गचि सकळ । तैसें- चि हें केवळ । शरीर जाणावें ॥ १० ॥ शरीर नाडीचा खेटा⁵ । नाडीमध्यें पोकळ वाटा । लहान थोर सगटा । दाटल्या नाडी ॥ ११ ॥ प्राणी अन्नोदक घेतो । त्यांचा अन्नरस होतो । त्यास वायु प्रवर्ततो । श्वासोच्छ्वासें ॥ १२ ॥

१. शंका. २. झोपेंत. ३. क्षीण होतात. ४. मादक पदार्थ. ५. खँचाखँच.

३०६ श्रीदासबोध. [ दशक नाडीद्वारा धांवे जीवनै । जीवनामध्ये खेले पवनै । त्या पवनासरिसा जाण । आत्माहि विचैरै ॥ १३ ॥ तृषेनें शोषलें शरीर । आत्म्यास कळे हा वि- चार । मग उठोन धांवे शरीर । उदकाकडे ॥ १४ ॥ उदक मागे शब्द बो- लवी । मार्ग पाहाेन शरीर चालवी । शरीर अवघेंच हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥ क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहाला उठवितो । अचावाचा बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥ बायकोस म्हणे झालें झालें । देह साँ- वळें करुनि आणिलें । पायांत भरोनं चालविलें । तांतडी तांतडी ॥ १७ ॥ त्यास पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरौन पात्र पाहिलें । हातांकरवीं आरंभिलें । आपोशन ॥१८॥ हातांकरवीं ग्रास उचलवी । मुखीं जाऊनि मुख पसरवी। दांतांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥१९॥ आपण जिव्हेमध्यें खेले। पाहतो परिमळ सोहळे । केश काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥ अळणी कळतां मीठ मागे । बावलेस म्हणे अगे कांगे । डोळे तापून पाहों लागे । रागें रागें ॥२१॥ गोडी लागतांच आनंदे । गोडी नसतां परम खेदे । वांकडी गोष्टी अंतरीं भेदे । आत्मयासी ॥ २२॥ नाना अन्नांची गोडी । नाना रसस्वाद निवडी । तिखट लागतांच मस्तक झाडी । आणि खोंकी ॥ २३ ॥ मिरपुडी घातली फार । कायसें करितें खापर । जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥ आज उदंड जेविला । सर्वैच तांब्या उछलिला । घळघळां घेऊं लागला । सावकाश ॥ २५॥ देहीं सुखदुःख भोक्ता । तो एक आत्माचि पाहतां । आत्म्याविण देह वृथा । मडें होय ॥ २६ ॥ मनाच्या अनंत वृत्ती । जाणणें तेचि आत्मस्थिती । त्रैलोकीं जितुक्या व्यक्ती । तदंतरीं आत्मा ॥ २७ ॥ जगामध्यें जगदात्मा । विश्वामध्यें विश्वात्मा । सर्व चालवी सर्वा- त्मा । नाना रूपें ॥ २८ ॥ हुंगे चाखे देखे ऐके । मृदु कठिण वोळखे । शीत उष्ण ठाउकें । तात्काळ होय ॥ २९ ॥ सावधपणें लाघैवी । बहुत करी उ- ठाठेवी । या धूर्तांच्या उर्गवी । धूर्ताच करी ॥ ३० ॥ वायूसरिसा परिमळु येतो । परी तो परिमळ वितळोन जातो । वायु धुळी घेऊन येतो । परी तोहि जाय ॥३१॥ शीत उष्ण वायूसरिसें । सुवासें अथवा कुवासें । असिजे परी सावकाशें । तगणें न घडे ॥ ३२ ॥ वायूसरिसे रोग येती । वायूस-


१. पाणी. २. वायु. ३. वावरतो. ४. आत्मस्वरूप. ५. चतुर. ६. उलगडा.

१३ वा. ] बोध. ३०७ रसीं भूतें धांवती । धूर आणि धुकट येती । वायूसवें ॥ ३३ ॥ वायूसवें कां- हींच जगेना । आत्म्यासवें वायु तगेना । आत्म्याची चपळता जाणा । अधि- क आहे ॥ ३४ ॥ वायु कठिणास अडतो । आत्मा कठिणास भेदून जातो । कठिण पाहीं तरी तो । छेद नाहीं ॥ ३५ ॥ वायु झडझडां वाजे । आत्मा कांहींच न वाजे । मौनेंचि अंतरीं समजे । विवरोन पाहतां ॥ ३६ ॥ शरी- रास बरें केलें । तें आत्मयासि पावलें । शरीरयोगें झालें । समाधान ॥ ३७ ॥ देहावेगळे उपाय नाना । करितां आत्म्यास पावेना । समाधान पावे वास- ना । देहाचेनी ॥ ३८ ॥ देहआत्म्यांचें कौतुक । पाहों जातां अनेक । देहा- वेगळी आडणुक । आत्म्यास होय ॥ ३९ ॥ एक असतां उदंड घडे । वेगळें पाहतां कांहींच न घडे । विवेक त्रैलोकीं पवाडे । देहात्मयोगें ॥ ४

३०८ श्रीदासबोध. [ दशक नव्हे काय । परी तें खोटें ॥ ११ ॥ पुण्यात्मा आणि पापात्मा । दोहोंकडे अंतरात्मा । साधु भोंदू सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥ अंतर एक तों खरें । परी सांगातें घेऊं नयेती माहारें । पंडित आणि चाट पोरें । एक कैसीं ॥ १३ ॥ मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडें । राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥ भागीरथीचें जळ आप । मोरी संवदेणी तेंहि आप । कुश्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥ या कारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध । वीतरागी² आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥ शूराहूनि मानिले लंडी³ । तरी युद्धप्रसंगीं नेकोंडी⁴ । श्रीमंत सांडूनि बेरंडी¹ । सेवि- तां कैसें ॥ १७ ॥ एका उदकें सकळ झालें । परी पाहोनि पाहिजे सेविलें । सगट अवघेंच सेविलें । तरी तें मूर्खपण ॥ १८ ॥ जीवनाचें झालें अन्न । अन्नाचें झालें वमन । परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९ ॥ तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदयीं धरावें । सत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २० ॥ उत्तमास उत्तम माने । कनिष्ठास तें न माने । म्हणोन करंटें देवानें । करून ठेविलें ॥ २१ ॥ सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरि- कथा पुराणश्रवण । नीतिन्यायें ॥ २२ ॥ वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक । हळूहळू पुण्यश्लोक⁶ । करीत जावें ॥ २३ ॥ मुलांचें चालीनें चालावें । मुलांच्या अनुमतें बोलावें । तैसें जनास शिकवावें । हळुहळू ॥ २४ ॥ मुख्य मनोगत राखणें । हीं चातुर्यांचीं लक्षणें । चतुर तो चतु- रांग⁷ जाणे । इतर ते वेडे ॥२५॥ वेड्यास वेडें म्हणूं नये । वर्म कदापि बोलूं नये । तरीच घडे दिग्विजय । निस्पृहासी ॥ २६ ॥ उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें यथासांग । प्राणिमात्रांचा अंतरंग⁸ । होऊन जावें ॥ २७ ॥ मनोगत राखोन जातां । परस्परें होय अवस्था⁵ । मनोगत तोडितां व्यवस्था⁹ । बरी नाहीं ॥ २८ ॥ या कारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोळोज येती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके बोधनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंबी ३००.


१. वस्त्र धुण्याचें धोब्याचें भांडें. २. वैराग्यशील. ३. भितरे. ४. घाण, फजिती. ५. आशामृत. ६. पवित्र कीर्तीचे. ७. सर्व अंगें. ८. जिवलग. ९. सोय.

१४ वा.] निस्पृहलक्षण. ३०९ दशक चौदावा. १. निस्पृहलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका निस्पृह शिकवण । युक्ति बुद्धि शहाणपण । जनें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें औषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचीत । तैसें माझें ॥ २ ॥ तात्काळाचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होय प्राप्ती । शब्द औषध तीव्र श्रोतीं । साक्षेपें से- वावें ॥ ३ ॥ निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडूं नये । वोळखीमध्यें ॥ ४ ॥ कांता दृष्टीस राखूं नये । गोडी मनास चाखवूं नये । धारिष्ट चळतां दाखवूं नये । गुह्य आपुलें ॥ ५ ॥ एके स्थळीं राहूं नये । कोंनकोंडें साहूं नये । द्रव्य द्वारा पाहूं नये । आळकेंपणें ॥ ६ ॥ आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्या द्रव्य घेऊं नये । उणा शब्द घेऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥ भिक्षेविषयीं लाजू नये । बहुत भिक्षा घेऊं नये । पुसतांहि देऊं नये । ओळखी आपुली ॥ ८ ॥ धड मलिण नेसूं नये । गोड अन्न खाऊं नये । दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥ भोगीं मन असूं नये । देहदुःखें त्रासं नये । पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥ वि- रक्ति गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये । ज्ञान मळिण होऊं नये । वि- वेकबळें ॥ ११ ॥ करुणाकीर्तन सोडूं नये । अंतरध्यान मोडूं नये । प्रेम- तंतु तोडूं नये । सगुणमूर्तींचा ॥ १२ ॥ पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये । समयीं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥ अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये । धिकारितां झुरों नये । कदाकाळीं ॥ १४ ॥ लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजू नये । खिजवितां खिजूं नये । विर- क्तपुरुषें ॥ १५ ॥ शुद्धमार्ग सांडूं नये । दुर्जनासि तंडूं नये । संबंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥ तपिळेंपण धरूं नये । भांडवितां भांडूं नये । उडवितां उडों नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥ हांसवितां हांसूं नये । बोलवितां बोलूं नये । चालवितां चालूं नये । क्षणक्षणां १. अनुभवाचें. २. लाजीरवाणें. ३. आशाळभूत होऊन. ४. तापटपणा.

३१०श्रीदासबोध.[ दशक

॥ १८ ॥ एक वेष धरूं नये । एक साज करूं नये । एक देशीं होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९॥ सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये । सभेमध्यें बैसूं नये । सर्वकाळ ॥२०॥ नेम भंगीं लावूं नये । भरंवसा कोणास देऊं नये । अंगीकार करूं नये । नेमेस्तपणाचा ॥ २१ ॥ १. नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये । परतंत्र होऊं नये । कांहीं केल्या ॥२२॥ स्वतंत्रता मोडूं नये । निरपेक्षा तोडूं नये । २ परापेक्ष होऊं नये । क्षणक्षणां ॥ २३ ॥ वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधिसुखें राहों नये । ३ ऐकांत मोडों देऊं नये । स्वरू- पस्थितीचा ॥ २४ ॥ ४ अनर्गळताँ धरूं नये । लोकनिंद्य तें करूं नये । कोठें तरी होऊं नये । आसक्त कदा ॥ २५ ॥ परंपरा तोडूं नये । उपासना मोडूं नये । ज्ञानमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥ कर्ममार्ग सांडूं नये । वै- राग्य मोडों देऊं नये । साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥ अति- वाद करूं नये । अनीति पोटीं धरूं नये । रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥ २८ ॥ न मानी त्यास सांगों नये । कंटाळवाणें बोलों नये । बहुसाल असों नये । एके स्थळीं ॥ २९ ॥ कांहीं उपाधि करूं नये । केली तरी धरूं नये । धरिली तरी सांपडूं नये । उपाधीमध्यें ॥ ३० ॥ थोरपणें असूं नये । महत्व धरून बैसूं नये । कांहीं मान इच्छूं नये । कोठें तरी ॥ ३१ ॥ साधे- पण सांडूं नये । सानपण मोडूं नये । बलात्कारें जोडूं नये । अभिमान अंगीं ॥ ३२ ॥ अधिकाराविण सांगूं नये । दाटून उपदेश देऊं नये । कानकोंडा करूं नये । परमार्थ आपला ॥ ३३ ॥ कठीण शब्द बोलूं नये । कठिन आज्ञा करूं नये । कठिनता धरूं नये । कोणे विषयीं ॥ ३४ ॥ कठिन वैराग्य सांडूं नये । कठिन अभ्यास मोडूं नये । कठिन धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ३५ ॥ आपण आसक्त होऊं नये । केल्याविण सांगूं नये । बहुसाल मागूं नये । शिष्यवर्गासी ॥३६॥ उद्धट शब्द बोलूं नये । इंद्रियस्मरण करूं नये । शाक्तमागें भरूं नये । मुक्तपणें कदा ॥ ३७ ॥ नीचकृत्यीं लाजों नये । वैभव होतां माजों नये । क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥ थोरपणें चुकों नये । न्याय नीती सांडूं नये । अप्रमाण वर्तू नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥ कळल्याविण बोलूं नये । अनुमानें निश्चय करूं नये । सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥ १. दुराग्रहाचा. २. परावलंबी. ३. एकाग्र चिंतन. ४. स्वैर वर्तन.

१४ वा. ] निस्पृहलक्षण. ३११ सावधपण सोडूं नये । व्यापकपण सांडूं नये । कदा सुख मानूं नये । नि- सुंकपणाचें ॥ ४१ ॥ विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थाआज्ञा करूं नये । केली तरी टाकूं नये । आपणांपुढें ॥ ४२ ॥ प्रसंगेंविण बोलूं नये । अन्वयॆं- विण गाऊं नये । विचारेंविण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३ ॥ परोप- कार सांडूं नये । परपीडा करूं नये । विकल्प पडों देऊं नये । कोणीएकासी ॥ ४४ ॥ संशयात्मक बोलूं नये । बहुत निश्चय करूं नये । निर्वाहेंविणें² धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४५ ॥ जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये । सांगेन ऐसें म्हणों नये । कोणी एकासी ॥ ४६ ॥ ज्ञानगर्व धरूं नये । स- हसा छळणा करूं नये । कोठें वाद घालूं नये । कोणीएकासी ॥ ४७ ॥ नेणपण सांडूं नये । महंतपण सोडूं नये । द्रव्यासाठीं हिंडूं नये । हरि- कीर्तन करीत ॥ ४८ ॥ स्वार्थबुद्धि जडों नये । कारभारीं पडों नये । कार्य- कर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥ कोणास भार घालूं नये । जड³ भिक्षा मागों नये । भिक्षेसाठीं सांगूं नये । परंपरा आपुली ॥ ५० ॥ सोयरिकींत पडों नये । मध्यवर्ती⁴ घडों नये । प्रपंचाची जडों नये । उपाधि अंगीं ॥ ५१ ॥ प्रपंच प्रैस्थीं⁵ जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये । पाहुण्यासारीसें घेऊं नये । आमंत्रण कदा ॥ ५२ ॥ श्राद्ध पक्ष सँटी⁶ सामासें⁷ । शांति फळ- शोभन बारसें । भोग राहणें बहुवसें⁸ । नवस व्रतें उद्यापनें ९ ॥ ५३ ॥ तेथें निस्पृहें जाऊं नये । त्यांचें अन्न खाऊं नये । येळिलवाणें १० करूं नये । स्वयें आपणां ॥ ५४ ॥ लग्नमुहूर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये । मोलें कीर्तन करूं नये । कोठें तरी ॥ ५५ ॥ आपली भिक्षा सांडूं नये । वांरें अन्न खाऊं नये । निस्पृहासि घडों नये । मोलें यात्रा ॥ ५६ ॥ मोलें सुकृत करूं नये । मोलें पुजारी होऊं नये । दिलें तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७॥ कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये । मठपति होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥ निस्पृहें अवघेंच करावें । परी आपण तेथें न सांप- डावें । परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥ प्रयत्नांविण राहों नये । आळस दृष्टीस आणूं नये । देह असतां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ १. आळसाचें. २. सोईवांचून. ३. फार. ४. मध्यस्थी. ५. बंडजावांत. ६. षष्ठी. ७. षाण्मासिक श्राद्ध. ८. भुतें अंगात खेळवणें. ९. व्रतसमाप्ति. १०. मिंधें.

३१२ श्रीदासबोध. [ दशक ६० ॥ उपाधीमध्यें पडों नये । उपाधि अंगीं जडों नये । भजनमार्ग मोडूं नये । निःसंगपणें ॥ ६१ ॥ बहु उपाधि धरूं नये । उपाधीविण कामा न ये । सगुण भक्ति सोडूं नये । १विभक्ति खोटी ॥ ६२ ॥ बहुसाल धांवों नये । बहु- साल राहों नये । बहु कष्ट करूं नये । २औसुदें खोटें ॥ ६३ ॥ बहुसाल बोलूं नये । अबोलणें कामा न ये । बहु अन्न जेवूं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥ बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडों नये । बहु नेम धरूं नये । बाष्कळ खोटें ॥ ६५॥ बहु जनीं असों नये । बहु अरण्य सेवूं नये । बहु देह पाळूं नये। आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥ बहु संग धरूं नये । संतसंग सोडूं नये । कर्मठपण कामा न ये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥ बहु लौकिक सांडूं नये । लोकांआधीन होऊं नये । बहु प्रीति कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥ बहु संशय धरूं नये । मुक्तमार्ग कामा न ये । बहु साधनीं पडों नये । स्वा- धनेंविण खोटें ॥ ६९ ॥ बहु विषय भोगूं नये । विषयत्याग करितां न ये । देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥ वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंविण कामा न ये । आत्मस्थिति बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥ मन उरों देऊं नये । मनेंविण कामा न ये । अलक्ष वस्तु लक्षितां न ये । लक्षेंविण खोटें ॥ ७२ ॥ मन बुद्धि अगोचर । बुद्धीविण अंधकार । जाणि- वेचा घडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥ ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंविण कामा न ये । अतर्क्य वस्तु तर्कूं नये । तकेंविण खोटें ॥ ७४ ॥ दृश्यस्मरण कामा न ये । विस्मरण पडों देऊं नये । कांहीं चर्चा करूं नये । केल्याविण न चले ॥ ७५ ॥ जगीं भेद कामा न ये । वर्णसंकर करूं नये । आपुल्ला धर्म बुडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥ आशाबद्ध बोलों नये । विवेकें- विण चालों नये । समाधान हालों नये । कांहीं केल्या ॥ ७७ ॥ ३अबद्ध पोथी लिहों नये । पोथीविण कामा न ये । अबद्ध कदा वाचूं नये । वाचि- ल्याविण खोटें ॥ ७८ ॥ निस्पृहें वक्तृत्व सोडूं नये । आशंका घेतां भांडों नये । श्रोतयाचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥ हे शिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें ४वोळंगिती । अंगीं बाणे महंती । अकस्मात ॥ ८० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके निस्पृहनिरूपण नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ १. अभक्तपणा. २. आयतें. ३. अव्यवस्थित. ४. प्राप्त होतात.

१४ वा.] भिक्षा. ३१३ २. भिक्षा. श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागीतली पाहिजे । भिक्षा । ओंभवती या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥ श्लोक ॥ भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहः ॥ सदसद्गृहभिक्षान्नं सोमपानं दिने दिने ॥ १ ॥ टीका ॥ भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला । प्रतिग्रहावेगळां झाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥ संतोसंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी जो भोजन । तेणें केलें अमृतपान । प्रतिदिनीं ॥ ३ ॥ ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा । ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥ दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं । निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होय ॥ ५ ॥ वार लावून बैसला । तरी तो पराधीन झाला । तैसीच नित्यावळीं । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥ आठां दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें झालें । प्राणी एकाएकीं चे- वले । नित्य नूतनतेपासूनी ॥ ७ ॥ नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें । तरीच भिक्षा मागतां बरवें । श्लाघ्यवाणें ॥ ८ ॥ अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेश । जिकडे तिकडे स्वदेश । लोकत्रयीं ॥ ९ ॥ भिक्षा मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजों नये । भिक्षा मागतां भागों नये । परिश्रमें ॥ १० ॥ भिक्षा आणि चमत्कार । चाकाटती ल- हान थोर । कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥ भिक्षा म्हणजे काम- धेनू । सदा फळ नव्हे सामान्य । भिक्षेस करी जो अमान्य । तो करंटा योगी ॥ १२ ॥ भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भ्रम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥ भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती । भिक्षेनें प्रगटे महंती । स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥ भिक्षेस नाहीं अडथळा । भिक्षाहारी तो मोकळा । भिक्षेकरितां सार्थक वेळा । काळ जातो ॥ १५ ॥ भिक्षा म्हणजे अमरवेल्ली । जिकडे तिकडे लगडली । अवकाळीं फलदायिनी झाली । निर्लज्जासी ॥ १६ ॥ पृथ्वीमध्यें देश नाना । १. 'ओं भवती भिक्षां देहि' (मातोश्री, भिक्षा घाला !) २. दान देण्याच्या दोषानें रहित. ३. चांगले वाईट. ४. धान्यादिक. ५. शंकर. ६. नित्य जेवणास गेल्यानें. ७. त्रासूं नये. ८. अद्भुत कृत्यें. ९. चकित होतात. १०. कल्पवृक्ष.

३१४ श्रीदासबोध. [ दशक फिरतां उपवासी मरेना । कोणे एके ठायीं जना । जड नव्हे ॥ १७ ॥ गोरेक्ष¹ वाणिज्य² कृषी³ । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी । विसंबों नये झोळीसी । कांहीं केल्या ॥ १८ ॥ भिक्षे ऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य नसतां अभाग्य । एकदेशी ॥ १९ ॥ कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्प- संतोषी असावें । बहुत आणितां घ्यावें । मुष्टि एक ॥ २० ॥ सुखरूप भिक्षा मागणें । ऐसीं निस्पृहतेचीं लक्षणें । मृदु वाग्विलास⁴ करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥ ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलों यथामती । भिक्षा वाचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतु- र्दशदशके भिक्षानिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. कवित्वलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ कवित्वशब्द सुमनमाळा⁵ । अर्थ परिमळ आगळा । तेणें संतषट्पदकुळा⁶ । आनंद होय ॥ १ ॥ ऐशी माळा अंतःकरणीं । गुंफून पूजा रामचरणीं । ओंकारतंतु अखंडपणीं । खंडोंचि नये ॥ २ ॥ परोपकाराकारणें । कवित्व अवश्य करणें । तया कवित्वाचीं लक्षणें । बोलि- जेती ॥ ३ ॥ जेणें घडे भगवद्भक्ती । जेणें घडे विरक्ती । ऐशिया कवित्वा- ची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥ क्रियेविण शब्दज्ञान । तया न मानिती सज्जन । म्हणोन देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥ देवाचेनि प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें । तें अत्यंत श्लाघ्यवाणें । या नांव प्रासा- दिक ॥ ६ ॥ धीट पाठ प्रासादिक । ऐसें बोलती अनेक । तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥ धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनास आलें । बळेंचि कवित्व रचिलें । या नांव धीट बोलिजे ॥ ८ ॥ पाठ म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर । तयासारिखें उत्तर । आपणहि केलें ॥ ९ ॥ शीघ्रचि कवित्व केलें । दृष्टीं पडलें तें वर्णिलें । भक्तीवांचून जें झालें । या नांव धीटपाठ ॥ १० ॥ कामिक रसिक शृंगारिक । वीर हा- स्य प्रस्ताविक । कौतुक विनोद अनेक । या नांव धीटपाठ ॥ ११ ॥ मन १. गोरक्षण. २. व्यापार. ३. शेती. ४. भाषण. ५. कवितेचे शब्दरूप फुलांच्या माळा. ६. साधुरूप भ्रमरसमुदायाला. ७. ओंकारस्मरणरूप तंतु. ८. स्तुतिपर.

१४ वा. ] कवित्वलक्षण. ३१५ झालें कामाकार १ । तैसेचि निघती उद्गार । धीटपाठें परपार २ । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥ व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती । तेथें केली जे व्युत्पत्ती । या नांव धीटपाठ ॥ १३ ॥ कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट । कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत्त ॥ १४ ॥ कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग । कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥१५॥ कावित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ । कवित्व नसावें कुटिल । लक्षूनियां ॥ १६ ॥ हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें । छंदभंग न करावें । मुद्राहनिं ३ ॥ १७ ॥ व्युत्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन । भक्ति ज्ञान वैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥ भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ढोंगमत । आवडीविण वक्तृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥ भक्ती- विण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद । प्रीतीविण संवाद । घडे केवीं ॥ २० ॥ असो धीटपाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेंचें पिसें । आतां प्रासादिकें ४ तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥ वैभव कांता कांचन । ज्यासि वाटे हें वमन । अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ जयास घडीनें घडी । भगवंतीं लागे आवडी । चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥ जो भग- वद्भजनांविण । जाऊं नेदी एक क्षण । सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगले ॥ २४ ॥ जया अंतरीं भगवंत । अचल राहिला निवांत । तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥ अंतरीं बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद । भक्तीविण अनुवाद । आणिक नाहीं ॥ २६ ॥ आवडी लागली अंतरीं । तैशीच वदे वैखरी ५ । भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचत ॥२७॥ भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान । शंका लज्जा जाते पळून । दुरी ठेली ॥२८॥ तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला । तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥ गात नाचत निःशंक । तयास कैंचे दिसती लोक । दृष्टीं त्रैलोक्यनायक । बसोनि ठेला ॥ ३० ॥ ऐसा भगवंतीं रंगला । आणिक कांहीं नलगे त्याला । स्वेच्छा वर्णू लागला । ध्यान कीर्ति प्रताप ॥३१॥ नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती । तयापुढें नरस्तुती । तृणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये १. विषयांत गुंग. २. पैल तीर. ३. लक्षणहीन. ४. ईश्वरप्रसादाचें. ५. वाणी.

४. दशक १६-२०: सप्त-कौतुक, सूक्ष्म-ज्ञान, विमल-ज्ञान एवं आत्म-साक्षात्कार उपसंहार

३१६ श्रीदासबोध. [ दशक संसारीं विरक्त । तया मानिती मुक्त । साधु जन ॥ ३३ ॥ त्याचे भक्तीचें कौतुक । त्या नांव प्रासादिक । सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥ ऐका कवित्वलक्षण । केलेंचि करूं निरूपण । जेणें निवे अंतःकरण । श्रोत- यांचें ॥ ३५ ॥ कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें रसाळ । कवित्व असावें प्रांजळें १ । अन्वयाचें ॥ ३६ ॥ कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थांगळें २ । कवित्व असावें वेगळें । अहंतेंसी ॥ ३७ ॥ कवित्व असावें कीर्तीवौड ३ । कवित्व असावें रम्य गोड । कवित्व असावें जाड । प्रतापविषयीं ॥ ३८ ॥ कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्पसूपें । कवित्व असावें प्रज्ञासंक्षेपें ४ । प्रबंधाचें ॥ ३९ ॥ मृदु मंजुळ कोमल । भव्य अद्भुत विशाल । गौढ्य माधुर्य ५ रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥ अक्षरबंध पद- बंध । नाना चातुर्य प्रबंध । नाना कौशल्यता छंदबंध । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥ नाना युक्ति नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी । नाना अर्थान्वयें साधीं । या नांव कवित्व ॥ ४२ ॥ नाना साहित्य ६ नाना दृष्टांत । नाना तर्क धातुमँत ७ । नाना संमति सिद्धांत । पूर्वपक्षेंसी ॥ ४३ ॥ नाना गति नाना व्युत्पत्ती । नाना मति नाना स्फूर्ती । नाना धारणा नाना धृती । या नांव कवित्व ॥ ४४ ॥ शंका आशंका प्रत्यंतरें ८ । नाना वाक्यें शास्त्राधारें । तुटे संशय निर्धारें । निर्धारितां ॥ ४५ ॥ नाना प्रसंग नाना विचार । नाना तत्त्वचर्चासार । नाना योग नाना विवरें ९ । या नांव कवित्व ॥४६॥ नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटनें । नाना संदेह फेडणें । या नांव कवित्व ॥४७॥ जेणें अनुताप उपजे । जेणें लौकिकें १० लाजे । जेणें ज्ञान उपजे । या नांव कवित्व ॥ ४८ ॥ जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ति हे मावळे । जेणें भक्तिमार्ग कळे । या नांव कवित्व ॥४९॥ जेणें देहबुद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे । जेणें भगवंत प्रगटे । या नांव कवित्व ॥ ५० ॥ जेणें सद्दस्तु भासे । जेणें भौस ११ हा निरसे । जेणें भिन्नत्वें १२ नासे । या नांव कवित्व ॥ ५१ ॥ जेणें सद्बुद्धि लागे । जेणें पाषांड भंगे । जेणें विवेक जागे । या १. स्पष्ट अर्थाचें. २. अर्थानें भरलेलें. ३. थोर कीर्तीचें. ४. बुद्धि खर्चून व प्रयत्न करून रचिलेलें. ५. गोडी. ६. अलंकार. ७. व्याकरणशुद्ध. ८. निरनिराळीं प्रमाणें. ९. स्पष्टीकरणें. १०. प्रापंचिक जन. ११. भासणारें जग. १२. भेदबुद्धि.